DIY लाईफ हॅक्स

पावसाळ्यात कपड्यांवर लागलेले बुरशीचे डाग कसे काढावे

Trupti Paradkar  |  Jul 20, 2022
पावसाळ्यात कपड्यांवर लागलेले बुरशीचे डाग कसे काढावे

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. वातावरणात अचानक वाढलेला ओलावा जीवजंतूंसाठी पोषक असतो. बुरशीचं प्रमाण या काळात जास्त असतं. पावसाळ्यात धुतलेले ओले कपडे लवकर सुकत नाहीत आणि घराबाहेर पडल्यावर सुके कपडे ओले होतात. सहाजिकच ओल्या कपड्यांना सुकवण्यासाठी नवनवीन युक्ती शोधावी लागते. जर कपडे नीट सुकले नाहीत तर ओलाव्यामुळे त्यांना बुरशी पकडते. बुरशीमुळे कपड्यांवर काळसर डाग दिसू लागतात. एकदा कपड्यांवर बुरशी लागली की ती सहज धुवून अथवा डिटर्जेंटने स्वच्छ होत नाही. ज्यामुळे चांगले महागडे कपडे खराब होऊ शकतात. यासाठीच अशा वेळी पावसाळ्यात कपड्यांवरील हे बुरशीचे डाग काढण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स तसंच वाचा या आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi), बेकिंग सोड्याचे हे ‘25’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Benefits Of Baking Soda In Marathi),

कपड्यांवरील बुरशीचे डाग काढण्यासाठी टिप्स

तुमच्याही कपड्यांवर ओलाव्यामुळे बुरशीचे डाग लागले असतील तर काळजी करू नका. कारण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही घरीच हे डाग काढून टाकू शकता.

लिंबू आणि मीठाचा करा वापर

स्वच्छतेसाठी लिंबू नेहमीच वरदान ठरतो. कारण लिंबामध्ये क्लिंझिंग इफेक्ट्स असतात. एखादा कठीण डाग काढण्यासाठी तुम्ही लिंबाचा नक्कीच वापर करू शकता. यासाठी लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करा, फंगस लागलेल्या ठिकाणी लिंबाचे मिश्रण काही वेळ लावून ठेवा. रगडून तो डाग काढा आणि कोमट पाण्याने कापड धुवून टाका.

कोमट पाण्यात कपडे धुवा

पावसाळ्यात जर तुम्हाला कपड्यांना फंगसचे डाग लागू नये असं वाटत असेल तर कोमट पाण्याने कपडे धुवा. आजकाल वॉशिंग मशीनमध्येही हे फंक्शन असतं. शिवाय असं केल्याने तुमचे कपडे डिसइंफेक्टदेखील होतात. कारण कोमट पाण्यात जीवजंतू नष्ट होतात.

बेकिंग सोडा वापरा 

फंगसचे डाग कपड्यांवरून काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे बेकिंग सोडा वापरणे. यासाठी फंगस लागलेल्या डागाकडील भाग भिजवा आणि त्यावर बेकिंग सोडा लावा. अर्धा तासाने ते कापड ब्रशने घासून स्वच्छ करा आणि कोमट पाण्यात विसळा. 

बोरेक्स पावडर वापरा

बोरेक्स पावडर हे असं एक केमिकल आहे ज्यामुळे कपड्यांवरील फंगसचे डाग निघून जातात. यासाठी कपडे धुताना तुमच्या डिटर्जेंटसोबत या पावडरचा वापर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स