DIY लाईफ हॅक्स

भांड्यांच्या स्टँडला लागला असेल गंज तर वापरा सोप्या हॅक्स

Dipali Naphade  |  Nov 14, 2021
how-to-remove-rust-from-utensil-stand

घरात भांडी ठेवण्यासाठी प्रत्येकाकडे स्वयंपाकघरामध्ये एक खास स्टँड असतो. खरं तर स्टँड असणं नेहमीच चांगलं कारण एकाच ठिकाणी स्वयंपाकघरात व्यवस्थित भांडी लावली जातात आणि पटकन वेळेवर मिळणंही सोपं होतं. भांड्यांचा हा स्टँड महिलांना स्वच्छ ठेवणेही सोपं जातं. मात्र काही वेळा घाईघाईत स्टँडवर ओली भांडीही ठेवली जातात. त्यामुळे भांड्यांच्या या स्टँडला गंज चढतो. मात्र हा स्टँड आता फुकट गेला आणि नवा घ्यावा लागणार असं अजिबात मनात आणू नका. सतत पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे स्टँडला गंज लागणे हे अत्यंत कॉमन आहे. मात्र तुम्ही हा गंज घरच्या घरी काढूनही टाकू शकता. या लेखातून आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही भांड्यांच्या स्टँडवरील गंज काढून टाकू शकता.

सँडपेपरचा करा वापर

भांड्यांच्या स्टँडचा गंज काढायचा असल्यास, तुम्ही सँडपेपरचा वापर करू शकता. याच्या वापरामुळे अगदी न जाणारा डागही काही मिनिट्समध्ये तुम्ही काढून टाकू शकता. यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा गंज लागलेल्या ठिकाणी व्यवस्थित दोन वेळा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर गंज लागलेल्या ठिकाणी पाण्याचे काही थेंब तुम्ही घाला आणि सँडपेपर (Sandpaper) चा वापर करून साधारण 4-5 मिनिट्स गंज लागलेले ठिकाण घासा. तुम्हाला गंज निघून आलेला दिसून येईल. एकदा स्वच्छ करून गंज निघाला नाही तर तुम्ही तशीच प्रक्रिया पुन्हा करू शकता. कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानातून तुम्हाला सँडपेपर मिळवता येईल. तसंच स्वच्छ करताना स्टँडला स्क्रॅच येत नाही ना हे एकदा नक्की तपासून पाहा. 

बेकिंग सोडा आणि लिंबाचा करा वापर

बेकिंग सोडा हा प्रत्येकाच्या घरी असतोच. बेकिंग सोडा हा घराच्या सफासफाईसाठीही वापरला जातो. यातील एक्सफोलिएटिंग गुण गंज हटविण्यासाठी उपयोगी ठरतात. यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा लागेल. हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे तयार झालेले मिश्रण भांड्याच्या स्टँडला जिथे गंज आला आहे तिथे लावा आणि काही वेळ तसंच राहू द्या. साधारण 20 मिनिट्सनंतर क्लिनिंग ब्रशने स्वच्छ करा. तुम्हाला गंज दिसून येणार नाही. नेहमी गंज चढतो आहे वाटायला लागल्यावर या मिश्रणाचा नक्की वापर करून पाहात. हा सोपा उपाय आहे.

लिंबू, चुना आणि मिठाचा करा वापर 

तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल पण तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत की, लिंबाचा रस हा मिठातील क्रिस्टल सक्रिय करतो आणि त्यामुळे गंज लागला असेल तर तो निघून जाण्यास मदत मिळते. याशिवाय चुना गंज घालविण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे सर्वात पहिले तुम्ही लिंबू, चुना आणि मीठ यांचे एकत्र मिश्रण करून घ्या. ही तयार झालेली पेस्ट तुम्ही गंज लागलेल्या ठिकाणी लावा. काही वेळ तसंच ठेवा आणि त्यानंतर क्लिनिंग ब्रशने स्वच्छ रगडून साफ करा. गंज निघून जातो. 

व्हाईट व्हिनेगरचा करा वापर

सँडपेपर, बेकिंग सोडा, लिंबू, चुना याशिवाय तुम्ही भांड्यांच्या स्टँडचा गंज स्वच्छ करण्यासाठी व्हाईट व्हिनेगरचा वापर करू शकता. व्हाईट व्हिनेगरच्या मदतीने गंज अगदी सहजपणाने निघून जातो. यानंतर सर्वात पहिले तुम्ही एक मग पाणी घ्या आणि त्यात दोन ते तीन चमचे व्हाईट व्हिनेगर घाला आणि स्प्रे तयार करा. त्यानंतर हा स्प्रे ने गंज लागलेल्या ठिकाणी मारा आणि तसंच 10 मिनिट्स ठेवा. त्यानंतर क्लिनिंग ब्रशने सँडपेपरच्या मदतीने स्वच्छ करून घ्या. 

भांड्याच्या स्टँडला गंज लागला असेल तर या सोप्या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करून घ्या. तुम्हीही घरच्या घरी याचा वापर करून घेऊ शकता.

Read More From DIY लाईफ हॅक्स