त्वचेची काळजी

Stretch Marks : प्रेगन्सीनंतर स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय

Trupti Paradkar  |  Mar 11, 2019
Stretch Marks : प्रेगन्सीनंतर स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय

आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी एक खास क्षण असतो. मात्र आई होण्यासाठी त्या स्त्रीला अनेक टप्प्यातून जावं लागतं. गरोदरपण, गरोदरपणातील शारीरिक समस्या, बाळंतपण या प्रवासात तिला अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. गरोदरपणात स्त्रीयांच वजन वाढतं तर बाळंतपणानंतर वेडलॉस केल्यावर शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. बाळंतपणानंतर महिलांच्या पोट, कंबर, स्तन आणि मांड्यावर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. बाजारात या स्ट्रेच मार्क्सवर क्रीम उपलब्ध असतात. मात्र त्याने तुम्हाला हवा तसा परिणाम मिळत नाही. शेवटी कंटाळून महिला त्या स्ट्रेच मार्क्ससह जगण्यास सुरूवात करतात. सहाजिकच या स्ट्रेच मार्क्समुळे प्रेगन्सीनंतर महिला त्यांना हवे तसे फॅशनेबल कपडे घालणं कमी करतात. शिवाय स्टेच मार्क्स लपविण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही या स्ट्रेच मार्क्सपासून कायमची सुटका करून घेऊ शकता.

1. व्हिटॅमिन ई आणि एरंडेल तेल

एका भांड्यात दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल आणि पाव चमता एरंडेल तेल मिसळा. या मिश्रणाला तुमच्या स्ट्रेच मार्क्स झालेल्या भागांवर लावा आणि काही वेळ मसाज करा. तेल त्वचेत मुरेपर्यंत मसाज करा.  रात्री झोपताना आणि सकाळी अंघोळीआधी हे तेल अवश्य लावा. दीड ते दोन महिन्यांमध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल.

2. कोरफड जेल आणि बदामाचे तेल

एक चमचा कोरफडाचं जेलमध्ये काही थेंब बदामाचे तेल टाका. हे मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावा. नियमित या मिश्रणाचा मसाज केल्यास काहीच दिवसात तुमचे स्ट्रेच मार्क्स कमी दिसू लागतील.

3.साखर, लिंबू आणि बदाम तेल

एका वाटीत एक चमचा साखर, अर्धा लिंबाचा रस आणि काही थेंब बदामाचे तेल एकत्र करा. साखर या मिश्रणात विरघळेपर्यंत मिक्स करा. साखर जास्त वाटत असेल तर लिंबाच्या रसाचे प्रमाण वाढवा. हे मिश्रण स्ट्रेट मार्क्सवर लावून पाच ते दहा मिनीटे मसाज करा. त्यानंतर अंघोळ करा ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटू लागेल. शिवाय काही दिवस नियमित हा प्रयोग केल्यास तुमच्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्स कमी दिसू लागतील.

4. कोरफड जेल आणि नारळाचे तेल

वाचा – स्ट्रेच मार्क्सपासून मिळवा सुटका घरगुती उपाय करून

कोरफडाचे जेल आणि नारळाचे तेल एकत्र करा. एका पॅनमध्ये हे मिश्रण घ्या आणि ते मंद गॅसवर गरम करा. मिश्रण करपणार नाही याची काळजी घ्या. कोमट केलेले हे मिश्रण एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. हे मिश्रण नियमित तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर लावा. या मिश्रणामुळे तुमचे स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होऊ लागतील.

5. कोकोबटर

कोकोबटर त्वचेसाठी अगदी उत्तम असते. कारण कोकोबटरमुळे तुमची त्वचा हायड्रेट आणि मॉश्चराईझ राहते. नियमित कोको बटर लावल्यास काहीच दिवसात तुम्हाला स्ट्रेच मार्क्स कमी झालेले दिसून येतील.

यासोबतच आहारात काही विशेष बदल केल्यासदेखील तुमचे स्ट्रेच मार्स्क कमी होऊ शकतात. शरीराचे योग्य पोषण झाले तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतो. यासाठी आहारातील प्रोटीन्सचे प्रमाण वाढवा. दूध आणि दूधाचे पदार्थ, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांचा आहारात समावेश करा. नियमित व्यायाम आणि योगासने करा ज्यामुळे तुमचे शरीर पुन्हा सुडौल दिसू लागेल. त्वचेची आणि शरीराची योग्य निगा राखल्यामुळे तुमच्या शरीरावरील बाळंतपणाच्या या खुणा हळूहळू नक्कीच कमी होतील.

फोटोसौजन्य – शटर स्टॉक

Read More From त्वचेची काळजी