आरोग्य

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी असा करा तुमचा मोबाईल स्वच्छ

Trupti Paradkar  |  Mar 30, 2020
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी असा करा तुमचा मोबाईल स्वच्छ

 

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. कोरोना विषाणू एखाद्या गोष्टींवर नऊ ते दहा सहज दिवस टिकू शकतात असं म्हटलं जात आहे. म्हणूनच आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तूला वेळीच निर्जंतूक करण्याची गरज आहे. दिवसभरात आपण सर्वात जास्त हाताळतो ती वस्तू म्हणजे ‘मोबाईल फोन’ शिवाय आपण फोनवर सतत बोलत असल्यामुळे हातासोबत मोबाईलचा स्पर्श कान आणि चेहऱ्यावरही होत असतो. सहाजिकच फोनच्या माध्यमातून कोणताही जीवजंतू तुमच्या त्वचेच्या संपर्कात येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच सुरक्षेसाठी हात धुण्यासोबतच वारंवार तुमच्या मोबाईल फोनला निर्जंतूक करण्याची गरज आहे. 

Shutterstock

मोबाईल फोन स्वच्छ आणि निर्जंतूक करणं का आहे गरजेचे

 

घरात असताना अथवा घराबाहेर जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी जाताना तुम्ही मोबाईलचा सतत वापर करता. या काळात नकळत तुम्ही घराबाहेरील दरवाजे, कड्याकुलूप, वाणसामान, भाजी आणि फळे, दुधाच्या पिशव्या, पैशांची नाणी आणि नोटा  अशा कितीतरी गोष्टींना हात लावता. या गोष्टी या आधी अनेकांच्या हातातून तुमच्या हातापर्यंत आलेल्या असतात. तेच हात तुम्ही मोबाईल फोनचा वापर करण्यासाठी पुन्हा मोबाईल फोनला लावता. आजकाल मोबाईल फोनशिवाय जगणं माणसाला जवळजवळ अशक्यच झालेलं आहे. याचप्रमाणे अनेक लोकांना चक्क टॉयलेट सीटवर बसतानाही मोबाईल फोन हाताळण्याची सवय असते. ज्यामुळे अशा अनेक कारणांमुळे तुमचा मोबाईल अस्वच्छ होण्याची शक्यता आहे. म्हणूनच तो कसा स्वच्छ करायचा हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. 

Shutterstock

असा करा तुमचा मोबाईल फोन स्वच्छ –

 

एका संशोधनानुसार टॉयलेट सीटपेक्षा जास्त जीवजंतू तुमच्या मोबाईलफोनवर पोसले जातात. मोबाईलचे दुष्परिणामही अनेक आहेत. म्हणूनच तुमच्या मोबाईलची स्वच्छता कशी करावी हे जाणून घेणं सद्यपरिस्थितीत अत्यंत गरजेचं झालं आहे.

Shutterstock

 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या. 

अधिक वाचा –

Read More From आरोग्य