DIY लाईफ हॅक्स

सोन्याच्या दागिन्यांची निवड करताना या गोष्टी ठेवाव्या लक्षात

Leenal Gawade  |  Oct 14, 2021
सोन्याच्या दागिन्यांची निवड

सणासुदीचे दिवस सुरु झाले किंवा लग्न कार्य  जवळ आली की अनेक जण सोन्याचे दागिने घडवतात. सोन्याचा सध्याचा भाव पाहता सगळ्यांनाच सोन्याचे दागिने सगळ्यांनाच पटकन करता येतील असे मुळीच नाही.  एखादा दागिना घडवल्यानंतर तो आवडला नाही तर मोडणे म्हणजे सोन्यावरील घट आणि पुन्हा त्याची घडणावळ देण्याचा अधिक खर्च करणे आलेच सोन्याचे दागिने घडवण्याचा विचार तुम्ही करत असाल तर  काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.  त्या कोणत्या ते जाणून घेऊया.

दागिन्याचा प्रकार

एखाद्या घरात मुलगी असली की, तिचे पालक अगदी लहानपणापासून तिच्यासाठी सोनं खरेदी करतात. सोन्याचे दागिने खरेदी करताना तुम्ही शक्यतो सोन्याचे कॉईन खरेदी करा. कारण आधीपासून दागिने खऱेदी केले तर पुढे जाऊन तुम्ही त्याचा वापर कराल असे मुळीच होणार नाही. त्यामुळे ते दागिने पुन्हा मोडणे आणि करणे यामध्ये फारच पैसे वाया जातात. त्यामुळे सुुरुवातीला आधी कॉईन किंवा वळ खरेदी करा. ज्यावेळी दागिने घालण्याची वेळ येईल त्यावेळी मात्र तुम्ही दागिन्याचा प्रकार विचार करुन करा. शक्यतो एक गळ्यालगतचा हार, कानातले, बांगड्या अशा काही गोष्टींची तुम्ही हमखास खरेदी करा. हे तुम्हाला वापरता येतात.

 दागिन्याचा वापर

Instagram

खूप दागिने खरेदी केले म्हणजे त्याचा वापर होईल असे अजिबात होत नाही. कारण हल्ली अनेक जण इमिटेशन ज्वेलरीचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे होते असे की सोन्याचे दागिने म्हणावे तितके वापरले जात नाही. त्यामुळे दागिन्याचा वापर तुम्ही किती करता याचा विचार करुन मगच तुम्ही दागिन्याची खरेदी करा. काही जणांना रोज सोन घालायला आवडत नाही. ते फार क्वचित किंवा अगदी सणालाच असे हार वापरत असतील तर तुम्ही दागिने करताना फार विचार करा. कारण स्त्रीधन म्हणून दागिने असण्यापेक्षा कॉईन असण जास्त परवडते. एखाद्या मुलीकडे अगदी हमखास नथ हा दागिना असावा लागतो. त्यामुळे हा दागिना अगदी हमखास करा. जे वापरत नसलेले दागिने तुम्ही करत असाल तर ते अजिबात करु नका.

पारंपरिक बांगड्यांच्या एव्हरग्रीन डिझाईन्स

दागिन्याची डिझाईन

फॅशन ही कालांतराने बदलत असते. आज चालत असलेला प्रकार दुसऱ्या दिवशी चालेल असे सांगता येत नाही. त्यामुळे कोणताही दागिना निवडताना खूप लेटेस्ट असे दागिने निवडू नका. कारण हल्ली व्हाईट गोल्ड किंवा असे काही दागिने असतात ते कालांतराने फार जुने दिसू लागतात. त्यामुळे असे दागिने निवडताना खूप जास्त काळजी घ्या.  फार किचकट अशा डिझाईन्स निवडू नका. कारण असे डिझाईन्स नंतर अजिबात चांगले दिसत नाही. त्यांची स्वच्छता जमत नाही. इतकेच नाही तर या डिझाईन्सचे प्रकार तुम्हाला नंतर त्रासदायक ठरु शकतात. 

आता सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात 

इमिटेशन ज्वेलरीची अशी घ्या काळजी

Read More From DIY लाईफ हॅक्स