त्वचेची काळजी

मेकअप काढण्यासाठी वापरा हे बेस्ट मेकअप वाईप्स

Leenal Gawade  |  Aug 9, 2021
मेकअप वाईप्स निवडताना

मेकअप केल्यानंतर तो चेहऱ्यावरुन काढणे फारच गरजेचे असते. मेकअप हा तसाच राहिला तर तो त्वचेच्या आत जाऊन त्वचा डॅमेज करण्याचे काम करतो. त्वचा आतून खराब झाल्यानंतर त्यावर कितीही चांगला मेकअप लावला तर तो म्हणावा तितका खुलून दिसत नाही. खूप जणांना मेकअप करायला आवडतो पण तो मेकअप काढण्यासाठी नेमके काय वापरावे? हे कधीच कळत नाही. हल्ली मेकअप वाईप्स हा प्रकार सगळीकडे मिळू लागला आहे. हे असे वाईप्स मेकअप काढण्यासाठी एक सोपा पर्याय आहे. तुम्हीही मेकअप करत असाल आणि तुम्हाला हात घाण न करता मेकअप काढण्यासाठी काही चांगले व्हाईप्स हवे असतील तर तुम्ही मेकअप वाईप्स निवडताना नेमकं काय करायला हवं ते जाणून घेऊया.

क्लिन्झिंग एजंट

कोणताही मेकअप वाईप्स निवडताना त्या मेकअप वाईप्समध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेणे देखील गरजेचे आहे. तुमच्या मेकअप वाईप्समध्ये चांगले क्लिन्झिंग एजंटस आहेत दे पाहून घ्या. तुमच्या चेहऱ्याला शोभतील असे क्लिन्झिंग एजंट त्यामध्ये असेल तर तुमचा चेहरा चांगल्या ठेवण्यासाठी ते अधिक मदत करतील. त्यामुळे तुम्ही क्लिन्झिंग एजंट कोणता आहे हे देखील पाहून घ्या मगच असे वाईप्स निवडा.

मॉश्चरायझिंग एजंट

कोणत्याही मेकअप काढणाऱ्या मेकअप वाईप्समध्ये आणखी एक घटक असायला हवा तो म्हणजे मॉश्चरायझिंग एजंट असायला हवे. ज्या मेकअप वाईप्समध्ये मॉश्चरायझिंग एजंट आणि इसेन्शिअल ऑईल्स असतातत. अशा वाईप्समुळे मेकअप काढल्यानंतर चेहरा हा अधिक चांगला राहण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही मॉश्चरायझिंग एजंट असलेले  वाईप्स निवडा. जर तुमचा चेहरा कोरडा असेल तर तर तुम्हाला असे मॉश्चरायझिंग एजंट चेहरा चांगल्या ठेवण्यास मदत करतात. 

नॅचरल्स ऑईल्स

चेहऱ्यावरील जिद्दी मेकअप नुसता रगडून जात नाही. तर त्यासाठी योग्य तेलांचा समावेश असावा लागतो. अनेक मेकअप वाईप्समध्ये असे इसेन्शिअल ऑईल्स असतात की, त्यामुळे असे मेकअप वाईप्स निवडा. मेकअप वाईप्समध्ये व्हिटॅमिन E,  टी ट्रि ऑईल्स असे काही घटक असतात. जे तुमच्या चेहऱ्यावरुन मेकअप तर काढतातच पण त्या व्यतिरिक्त चेहऱ्याला मेकअपमुळे रॅशेश येण्याची शक्यता असते. असे रॅशेश मुळीच येत नाही. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये हे घटक आहेत की नाही ते देखील पाहा. 

चेहरा स्वच्छ करताना 

मेकअप लावलेला चेहरा स्वच्छ करताना तुम्हाला मेकअप काढणे फार गरजचेचे असते. मेकअप काढण्यासाठी या वाईप्सचा उपयोग फारच फायद्याचा ठरतो. 

चेहऱ्यावर मेकअप वाईप्स फिरवून घ्या. त्याने जितका सहज आणि हलक्या हाताने मेकअप काढता येतो तेवढा मेकअप काढा. मेकअप काढण्यासाठी कधी कधी एकाहून अधिक मकअप व्हाईप्स वापरु शकता. असे केल्यामुळे स्वच्छताही राखली जाईल. 

त्यानंतर तुम्ही चेहरा चांगला फेसवॉश करुन घ्या. 

आता मेकअप वाईप्स निवडताना तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा.

कांद्याचा रस आहे त्वचेसाठीही फायदेशीर, कसा कराल उपयोग

चेहऱ्याची चमक वाढवतील या क्रिम्स, नक्की करा ट्राय

पायाच्या टाचा झाल्या असतील काळ्या तर करा हे उपाय

Read More From त्वचेची काळजी