मेकअप

मास्कमुळे खराब होत असेल लिपस्टिक तर करा हे उपाय

Trupti Paradkar  |  Aug 20, 2021
मास्कमुळे खराब होत असेल लिपस्टिक तर करा हे उपाय

कोविडच्या काळात आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी काही नियम पाळणं बंधनकारक आहे. सगळीकडे अनलॉक होत असलं तरी अजूनही धोका टळलेला नाही. कोविडच्या तिसऱ्या लाटेची भीती वाटणं स्वाभाविक आहे. यावर एकच उपाय म्हणजे लवकर लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणं आणि  सुरक्षेचे कडक नियम पाळणं. बाहेर जाताना डबल मास्क लावणं हे काही दिवस नक्कीच पाळावं लागणार आहे. कोविडच्या या नियमांमुळे जीवनशैलीत काही बदल नक्कीच झाले आहे. मेकअप आणि लिपस्टिक तर जणू वापरल्याच जात नाही आहेत.  वास्तविक प्रत्येकवेळी बाहेर जाताना अगदी  फार मेकअप नाही केला तरी प्रत्येकीला लिपस्टिक लावण्याची नक्कीच सवय होती. लिपस्टिक हा प्रत्येक स्त्रीचा  जिव्हाळ्याचा विषय  असल्यामुळे तिच्या ड्रेसिंग डेबल, मेकअप किट, पर्समध्ये विविध रंगाच्या शेड असायच्या. मात्र आता मास्कमध्ये या लिपस्टिकचा वापर हळू हळू कमी होत चालला आहे. पण तुम्हाला लिपस्टिक लावणं आवडत असेल तर तुम्ही मास्कमध्येही लिपस्टिक लावू शकता. मात्र मास्कमुळे ती खराब होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला यासाठी फॉलो कराव्या लागतील. 

आयमेकअपची ही ट्रिक मास्कमध्येही येईल कामी

मास्कमध्ये लिपस्टिक लावताना काय काळजी घ्याल

मास्कमुळे तुमची लिपस्टिक खराब होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या लिपस्टिक कलेक्शनमध्ये काही बदल करावे लागतील. जसं की, ग्लॉसी आणि क्रिमी टेक्चरच्या लिपस्टिक ऐवजी लिप टिंटची निवड करा. कारण एकतर हे लिपटिंट लावणं खूप सोपं आहे. विशेष म्हणजे हे लिपकलर तुम्ही लिपस्टिक, ब्लश अथवा आय मेकअपसाठीदेखील वापरू शकता. या लिपस्टिक इतक्या छान कॉम्पॅक्ट पॅकिंगमध्ये असतात की त्या तुम्ही सहज तुमच्या पर्समध्ये कॅरी करू शकता. ज्यामुळे एकाच लिप कलरने तुम्ही तुमचा  संपूर्ण मेकअप कोणत्याही वेळी आणि कुठेही करू शकता. 

एखादी खास लिपस्टिक अशी करा सेट

लिप टिंट नसेल तर मॅट फिनिशची लिक्विड लिपस्टिक लावा. कारण ही लिपस्टिक एकदा सुकली की मेकअप रिमूव्हरने काढल्याशिवाय मुळीच निघत नाहीत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखाद्या खास शेडची, तुमची आवडती ग्लॉसी अथवा क्रिमी लिपस्टिक वापरायची असेलच तर तुम्ही ती लावल्यावर तिच्यावर ट्रान्सलुसंट पावडर लावू शकता. ज्यामुळे तुमच्या लिपस्टिकला मॅट फिनिश मिळेल आणि ती पटकन सेट होईल. अशी सेट झाल्यावर लिपस्टिक पसरणार नाही आणि तुमच्या मास्कला  लागणार नाही. मास्क लावूनही असा टिकवता येईल मेकअप, मेकअप हॅक्स

ओठ हायड्रेट असणं आहे गरजेचं 

ओठांवर लिपस्टिक लावताना एक काळजी घ्यायलाच हवी ती म्हणजे ओठ हायड्रेट ठेवणं. नाहीतर ओठ कोरडे आणि निस्तेज होतील. यासाठीच लिपस्टिक लावण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनीटे आधी तुमच्या ओठांवर लिप बाम लावा ज्यामुळे तुमचे ओठ हायड्रेट राहतील आणि कोरडे दिसणार नाहीत. यासोबतच चेहऱ्यावर मास्क नसताना, रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर ओठांची निगा राखा आणि लिप बामने ओठांना मऊपणा द्या. ज्यामुळे मास्कमध्येही तुम्ही बिनधास्त लिपस्टिक वापरू शकता. 

लिप लायनर लावण्यास विसरू नका 

लिप बाम सेट झाल्यावर सर्वात आधी ओठांना लिप लायनर लावा. कारण लिप लायनरमुळे तुमच्या ओठांना छान शेप मिळेल. लिप लायनर लावून मग लिपस्टिक लावल्यामुळे ती जास्त लावावी लागत नाही. ज्याममुळे तुमची लिपस्टिक पसरणार नाही. मास्कमध्ये लिपस्टिक लावण्याची ही एक सोपी ट्रिक आहे. शिवाय लिपस्टिक लावताना आणखी एक नियम पाळा तो म्हणजे तुमच्या बोटांनी लिप कलर ओठांवर पसरवा. ज्यामुळे तुमच्या ओठांवर अतिरिक्त लिप कलर राहणार नाही आणि लिपस्टिक जास्त काळ टिकेल. पावसाळ्यासाठी निवडा या खास शेडच्या लिपस्टिक दिसा खास

Read More From मेकअप