किचन हॅक्स

कॉफी पावडर कशी कराल अधिक काळ स्टोअर, सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Jan 18, 2022
कॉफी पावडर कशी कराल अधिक काळ स्टोअर, सोप्या टिप्स

आपल्याकडे भारतामध्ये चहा आणि कॉफी आवडणारे अर्थात #chailovers #coffeelovers खूपच आहेत. त्यामुळे तुम्हाला बाजारामध्ये ठिकठिकाणी चहा आणि कॉफीचे दुकाने आणि अगदी कॅफेही दिसून येतात. पण तुम्ही प्रत्येक वेळा बाहेर गेल्यावर महाग कॉफी अथवा चहा पिऊ शकत नाही. बाजारातील अनेक महाग ब्रँड्सची कॉफी खूपच चांगली लागते. मग अशावेळी तितली कॉफी पावडर आपण घरी घेऊन येतो. पण तशीच कॉफी कशी बनवायची आणि ती कॉफी पावडर कशी स्टोअर करायची याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. यामुळे तुम्हाला घरच्या घरी चांगल्या ब्रँडची कॉफीही पिता येते आणि सतत जास्त पैसा खर्च करावा लागत नाही. तसंच काही लोकांना घरचा चहा अथवा कॉफीच अधिक आवडतात. पण घरी कॉफी पावडर नीट स्टोअर करता येत नाही आणि ती हवेमुळे खराब होते असं अनेकांना वाटतं. पण कॉफी पावडर स्टोअर करायची एक पद्धत असते आणि याबाबतच आपण अधिक माहिती घेणार आहोत. 

फ्रिजमध्ये ठेवा 

हे वाचून तुम्हाला नक्की थोडं विचित्र वाटलं असेल पण हो तुम्ही काचेच्या बाटलीत कॉफी पावडर भरून ती फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे कॉफी पावडर ओलसर होणार नाही. तसंच बरेच महिने कॉफी पावडर टिकून ठेवण्यासाठी हा उपाय अधिक चांगला आहे. मात्र ज्या डब्यात अथवा ज्या बरणीमध्ये तुम्ही कॉफी पावडर ठेवणार आहात ते एअरटाईट असावे याची तुम्ही काळजी घ्यावी. 

अधिक वाचा – कॉफीमध्ये घाला एक चमचा तूप आणि बघा कमाल, चरबी होईल कमी

कॉफीची चव राहील तशीच 

कॉफी तुम्ही जारमध्ये ठेवण्याच्या आधी त्यामध्ये काही तांदळाचे दाणे टाका आणि त्यात कॉफी पावडर घाला आणि कॉफीचा स्वाद वाढवा. तुम्ही अनेक महिन्यांपर्यंत कॉफी पावडरचा वापर करू शकता आणि कॉफीचा स्वाद जसा आहे तसाच ठेऊ शकता. यामुळे कॉफीचा स्वाद बदलत नाही आणि तुम्हालाही योग्यरित्या कॉफी पावडर स्टोअर करता येते. 

कॉफीमध्ये पडणार नाही गुठळ्या 

अनेकदा असे होते की, कॉफी पावडर तुम्ही जेव्हा काचेच्या बाटलीत भरता तेव्हा त्यानंतर त्वरीत काही दिवसातच त्यामध्ये गाठ पडायला सुरूवात होते. कॉफी पाडवर जमू लागण्याची ही सुरूवात असते. तुम्हाला कॉफीमध्ये गाठी पडण्यापासून रोख लावता येणं जर जमत नसेल तर तुम्ही कॉफी पाडवर काचेच्या बाटलीतून बाहेर काढा. ही बरणी व्यवस्थित स्वच्छ करा आणि बाटलीच्या तळाशी तुम्ही एक टिश्यू पेपर ठेवा. आता त्यात 1 चमचा चहा पावडर टाका आणि मग वरून तुम्ही कॉफी पावडर टाका. असं केल्यामुळे कॉफीमध्ये गुठळ्या निर्माण होणार नाहीत. 

या पद्धतीने करा कॉफीचे पॅकिंग 

तुम्ही कॉफी जर फ्रीजमध्ये ठेवली नसेल तर तुम्ही कॉफी जार प्लास्टिकने बंद करून घ्या. इतकंच नाही तर कॉफी जारमध्ये तुम्ही चमचा ठेऊ नका. याशिवाय तुम्ही कॉफी काढताना कोरड्या चमच्याचा अथवा लाकडी चमचा वापरा. यामुळे कॉफी खराब होणार नाही आणि अधिक काळ टिकण्यास मदत होईल. 

हंगामानुसार कॉफी करा स्टोअर 

coffee jar

ऋतू कोणताही असो कॉफी पावडर जर योग्यरित्या स्टोअर केली नाही तर तुम्ही वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कॉफी पावडर स्टोअर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरा. जसं उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही कॉफी पावडरच्या डब्यात खडीसाखरेचे तुकडे टाका. हिवाळ्याच्या दिवसात कॉफी पावडरच्या डब्यात तुम्ही सुंठ घाला तर पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही कमळाच्या बी चा वापर करू शकता. असं केल्यामुळे कॉफी खराब होत नाही आणि त्याच्या गुठळ्याही होत नाहीत.

या 5 किचन हॅक्सचा वापर करून तुम्ही कॉफी पावडर अधिक काळ स्टोअर करू शकता. या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्हाला कॉफी खराब होण्यापासून वाचवता येते.  

Read More From किचन हॅक्स