आरोग्य

उष्माघाताचा त्रास जाणवत असेल तर करा सोपे बदल

Leenal Gawade  |  May 9, 2022
उष्माघात

 मे महिना सुरु झाल्यापासून अनेकांची काहिली होऊ लागली आहे. खूप ठिकाणी तापमानाचा पारा इतका वाढला आहे की, अगदी नकोसे होऊन गेले आहे. मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातही नेहमीपेक्षा अधिक उकाडा जाणू लागला आहे. या उन्हाळ्यात उष्माघाताचा (Heatstroke)  त्रास अनेकांना होतो. अत्यंत गरम होणे, घामोळे येणे असे अनेक त्रास होऊ लागतात. इतकेच नाही तर उष्माघाताने एखाद्याचा जीव जाऊ शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का? हो हे अगदी खरे आहे. या दिवसात अनेक गावांमध्ये तापमान इतके वाढते की, त्याचा परिणाम हा एखाद्याचा जीव जाणे इतका होऊ शकतो. तुम्हालाही उष्माघाताची भीती वाटत असेल तर तुम्ही काही सोपे बदल आणि उपाय केले तर तुम्हाला त्याचा त्रास अजिबात होणार नाही.

उष्माघात म्हणजे काय? 

आता सगळ्यात आधी नुसतं गरम होतं म्हणजे त्याला उष्माघात म्हणावे का? तर अजिबात नाही. उष्माघात हा वातावरणात कमालीची गरमी वाढली म्हणजे तापमान 40 च्या पुढे गेल्यावर होतो. अशापद्धतीने उन आणि वातावरणात गरम वाढले की, त्यालाच उष्माघात म्हणतात. त्यामुळे 33 अंश तापमान असेल तर याचा असा अर्थ नाही की, उष्माघात झाला आहे. 

उष्माघाताचा परिणाम 

उष्माघात झाला की, त्याचा परिणाम लगेचच आपल्या शरीरावर होऊ लागतो. काही त्रास तुम्हाला या उकाड्यात जाणव लागले की, समजून जावे तुम्हाला हा त्रास झाला आहे. 

  1. चक्कर येणे 
  2. मळमळणे 
  3. अन्न कमी जाणे
  4. रक्तदाब वाढणे
  5. हात- पाय सून्न होणे 

अशी काही लक्षणे आपल्याला दिसून येतात 

असा करा बचाव

उष्माघाताचा त्रास झाल्यावर काय करावे हे देखील माहीत असायला हवे. कारण ही फार घाबरण्यासारखी गोष्ट नाही. ती थोडी काळजी घेऊन आराम पडतो. 

  1. या दिवसात तुम्ही पाणी प्याल तितके कमी त्यामुळे पाणी पित राहा. 
  2. घरात खूपच गरम होत असेल तर थंडपाण्याचे आंघोळ करा. त्यामुळेही तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. 
  3. खूप जणांच्या घराचे पत्रे हे सिंमेंटचे असतात.जे खूप जास्त तापतात. अशावेळी तुम्ही त्यावर स्प्रिंकर लावून घ्या. त्यामुळे थंडावा राहील. 
  4. एखाद्यावेळी उष्णतेने एखाद्याला चक्कर आली तर घाबरुन न जाता. त्याला घाम येत असेल तर त्याला रुग्णालयात सरळ न्यावे. 

आता उष्माघात झाला की, तुम्हाला या काही गोष्टी नक्की कामी येतील.

Read More From आरोग्य