Jewellery

काचेच्या बांगड्यांची कशी घ्यावी काळजी, जास्त टिकण्यासाठी सोप्या टिप्स

Trupti Paradkar  |  Sep 1, 2021
how to take care of glass bangles

लग्न कार्य, सण समारंभ जवळ आले की नटण्या थटण्याची चांगली संधीच महिलांना मिळते.  साडी, एथनिक ड्रेस आणि विविध प्रकारच्या दागदागिन्यांची खरेदी सुरू होते. दागदागिन्यांची हौस बांगड्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तुम्हाला जर रंगबेरंगी काचेच्या बांगड्या घालायला आवडत असतील. तर तुम्ही खास फेस्टिव्ह सीझनसाठी तुमच्या वॉर्डरोबमध्ये खास काचेच्या बांगड्यांचे कलेक्शन ठेवू शकता. काचेच्या बांगड्याचा ट्रेंड नसला तरी त्या पारंपरिक पेहरावासोबत चांगल्या वाटतात. लग्नात महाराष्ट्रीयन नववधूसाठी खास हिरव्या बांगड्यांचा चूडा भरला जातो. नऊवारी वर काचेच्या बांगड्या खुलून दिसतात. मात्र काचेच्या बांगड्या वापरायच्या तर त्या टिकवण्यासाठी काही खास टिप्स तुम्हाला फॉलो करायला हव्या. कारण काचेच्या बांगड्यांची जास्त निगा राखण्याची गरज असते. कारण छोट्याशा धक्क्यानेही काचेच्या बांगड्या तडकू शकतात. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत काचेच्या बांगड्या  कशा टिकवाव्या.

काचेच्या बांगड्यांची  कशी घ्यावी काळजी 

आजकाल काचेच्या जास्त वापरल्या दिसत नाहीत. मात्र महाराष्ट्रीयन लग्नात नववधू आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांना हिरवा चूडा घालण्याची पद्धत आहे. शिवाय सतत रंगीत काचेच्या बांगड्यांचे नवनवीन ट्रेंड येतच असतात.  तुम्ही एखाद्या साडी अथवा एथनिक ड्रेसवर या बांगड्या नक्कीच घालू शकता.  यासाठी त्या टिकवण्यासाठी करा या टिप्स

हवाबंद बॉक्समध्ये बांगड्या ठेवा

आता पर्यंत तुम्ही एकलं असेल की हवाबंद डब्ब्यात खाऊ नरम होऊ नये यासाठी ठेवला जातो.  पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही तुमच्या काचेच्या बांगड्यासुद्धा हवाबंद बॉक्समध्ये ठेवू शकता. जर तुमच्याकडे काचेच्या बांगड्या असतील तर तुम्ही ते हवाबंद असलेल्या एखाद्या बॉक्समध्ये ठेवू शकता. लग्नानंतर घालायची असेल ‘जोडवी’, तर जाणून घ्या ट्रेंडिंग डिझाईन्स

पेपर आणि टीश्यू पेपरमध्ये बांगड्या गुंडाळा 

काचेच्या बांगड्या पूर्वी विकत देताना वर्तमान पेपरात गुंडाळून दिल्या जात असे. वर्तमान पत्र अथवा टीश्यू पेपरमध्ये काचेच्या बांगड्या ठेवल्यामुळे त्यांना धक्का लागत नाही. आधी टीश्यू पेपरमध्ये बांगड्या गुंडाळा आणि मग ते वर्तमान पत्रात गुंडाळा. ज्यामुळे तुमच्या बांगड्या जास्त काळ टिकतील. 

कापडात गुंडाळून ठेवा

पेपरप्रमाणे तुम्ही काचेच्या बांगड्या तुम्ही गुंडाळून ठेवा. जर तुमच्या काचेच्या बांगड्यांवर वर्क केलेलं असेल ते तसंच टिकावं यासाठी बांगड्या कापडात गुंडाळून ठेवणं जास्त सोयीचं ठरू शकतं.

बटरपेपरमध्ये गुंडाळून बांगड्या ठेवा

काचेच्या बांगड्या बटर पेपरमध्ये गुंडाळून ठेवणं हा देखील काचेच्या  बांगड्या टिकवण्याचा एक चांगला पर्याय आहे. अशा बांगड्या एखाद्या बॉक्समध्ये ठेवून तुम्ही प्रवासात कॅरी देखील करू शकता.  लग्नात नक्की ट्राय करा या लेटेस्ट बांगड्यांच्या डिझाईन्स

ज्वैलरी बॉक्स वापरा

बाजारात ज्वैलरीमध्ये खास बांगड्यासाठी डिझाईन केलेले बॉक्स मिळतात. अशा बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या काचेच्या बांगड्या ठेवू शकता. कारण हे बॉक्स जरी महाग असले तरी ते बांगड्या तुटणार नाहीत यासाठी खास डिझाईन केलेले असतात. काचेच्या बांगड्यांसाठी तुम्ही यापैकी एखादा बॉक्स ठेवू शकता.ऋतू कोणताही असो ‘या’ गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या

Read More From Jewellery