मांड्या, जाघांमध्ये आणि योनी मार्गावर असलेले केस कोणालाच आवडत नाहीत. अनेक जण या टिकाणी असलेले केस अगदी आवर्जून काढतात. पण ते योग्य पद्धतीने काढले गेले नाही तर मात्र केसतोडीचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने रेझर वापरतात. जे नीट वापरले नाही तर त्यामुळे कट येण्याची शक्यता असते. इतकेच नाही केस काढल्यानंतर केस काढलेल्या ठिकाणीही पुळी येऊ शकते. अशावेळी प्रायव्हेट पार्टमध्ये येणाऱ्या केसतोडीने तुम्ही हैराण असाल आणि त्यासाठी तुम्हाला काही साधे सोपे उपाय हवे असतील किंवा काळजी कशी घ्यायची हे कळत नसेल तर जाणून घेऊया सोपे उपाय
शेव्हिंग करताना
प्रायव्हेट पार्टचे शेव्हिंग हे सगळ्यात जास्त कठीण असते. याचे कारण असे की, या पार्टमध्ये शेव्हिंग करताना रेझर लागण्याची शक्यता जास्त असते. इतकेच नाही तर हा भाग इतका नाजूक असतो त्यामुळे तुम्ही जे रेझर वापरता ते रेझर जर जास्त धारदार असेल तर ते त्वचेला जास्त घासले जाते. त्यामुळे केसांची मूळ ही दुखावू लागतात. त्याचा परिणाम असा होतो की, त्या पोअर्समध्ये घाण साचून तेथे पुळी येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही शेव्हिंग करताना तो भाग थोडा ओला करुन शक्य असेल तर शेव्हिंग क्रिम लावून तुम्ही त्या भागात शेव्ह करायला घ्या.
करा मॉश्चराईज
कोणत्याही भागाचे शेव्हिंग करुन झाल्यानंतर त्या भागाची जळजळ होणे साहजिक आहे. कारण आपण ते कापून काढत असतो. असे करताना ब्लेड हे त्या भागाला लागत असतात. काही जणांना केस खूप जास्त असतात. त्यांना केस काढताना खूप जास्त त्रास होतो. कारण त्यांना खूप जास्त वेळ केस काढायला लागतो. तुम्हालाही भरपूर केस असतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी अधिक जळजळ होत असेल तर तुम्ही सगळे झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने अंग पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्यावर योग्य मॉश्चरायझर लावा. त्यामुळे तुम्हाला थंडावा मिळण्यास मदत होईल.
सतत पुसू नका
खूप जण आंघोळ केल्यानंतर प्रायव्हेट पार्ट अक्षरश: रगडून काढतात. त्यामुळे होते असे की, त्या ठिकाणी असलेल्या पोअर्सना दुखापत होते. पुढील केस येताना ही दुखापत पुळीमध्ये रुपांतरीत होते. जी अधिक त्रासदायक असते. त्यामुळे तुम्ही सतत अंग खसाखसा पुसू नका. अगदी सावकाशीने तुम्ही अंग पुसा. केसतोड आला असेल आणि तो फुटला तर त्याला स्वच्छ कोरडे पुसून तुम्ही त्याला क्रिम लावा. त्यामुळेही त्याचा त्रास कमी होतो.
आता प्रायव्हेट पार्टमध्ये असा त्रास होत असेल तर तुम्ही नक्की अशी काळजी घ्या