आरोग्य

नुकतीच गर्भधारणा झाली असेल तर अशी घ्या काळजी

Leenal Gawade  |  Dec 24, 2021
नुकतीच गर्भधारणा झाली असेल तर

 गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे. गर्भधारणा झाले हे कळले तरी देखील त्याचा आनंद त्या स्त्रीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला होत असतो. पण पूर्वीच्या काळी गर्भधारणा झाली की, काही गोष्टी या हमखास पाळल्या जात होत्या. या कल्पना फार बुरसट अशा वाटत असल्या तरी त्यामध्ये काही अंशी तथ्य असणे हे स्वाभाविक होते. तुमचीही नुकतीच गर्भधारणा झाली असेल तर गर्भाची आणि तुमची काळजी घेणे फार गरजेचे असते. थोडे जुने समज-गैरसमज आणि काही वैज्ञानिक गोष्टी यांचे भान ठेवून नेमकी कोणती काळजी घ्यायची ते जाणून घेऊया.

बाळंतपण आणि नंतरची काळजी

काही महिने सांगू नका

तुम्हाला गर्भधारणा झाली तरी देखील तुम्ही त्याबाबत काही काळ न सांगितलेले बरे असते. पूर्वीच्या काळी आजी किंवा इतर लोकं ही इतरांना काहीही सांगू नका या विषयी बोलत असतं. पण आता आपणच कधीकधी सिक्रेट न ठेवता सोशल मीडियावर सगळे काही सांगून टाकतो. पण त्याची काहीही गरज नाही. कारण पहिले काही महिने हे फार काळजी घेण्यासारखे असतात. गर्भधारणा झाली तरी देखील बाळाची ठराविक वाढ होईपर्यंत तुम्ही कोणाला सांगू नका. हेच अधिक चांगले. इतरांना सांगून आपली उर्जा घालविण्यापेक्षा तुम्ही काही खास गोष्टींची काळजी घ्यायला अजिबात विसरु नका. 

आहाराची काळजी घ्या

बाळाची घ्या काळजी

गर्भधारणा झाली असे कळाले की. खूप जणांचा उत्साह वाढतो. त्यांना काय करावे आणि काय करु नये असे होऊन जाते. त्यामुळे अशावेळी हेल्दी खाण्याचा नादात बरेचदा चुकीच्या गोष्टी खाल्ल्या जातात त्यामुळे तु्म्ही असे करण्यापेक्षा तुम्ही रोजचा पण नियमित आहार घ्या. जेवणाच्या वेळा चुकवू नका. जेवणाच्या वेळा आणि कामाच्या वेळा यांचे भान ठेवा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होत नाही.

जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते (Stages Of Pregnancy In Marathi)

व्यायाम

खूप जण या दिवसात खूपच आळशी होऊन जातात किंवा अधिक काम करु लागातत. दोन्ही गोष्टी या आरोग्यासाठी तशा हानिकारकच म्हणाव्या लागतील. कारण गर्भधारणेच्या वेळी अतिशय सुस्त असूनही चालत नाही. त्यामुळे शरीर सुजण्याची शक्यता जास्त असते. व्यायाम हा कितीही चांगला असे म्हटले तरी देखील व्यायाम हा काही जणांसाठी त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे तुम्ही कोणाचा तरी सल्ला घेतल्याशिवाय आणि मार्गदर्शक असल्यासच व्यायाम करावा. काही जणांची गर्भधारणा ही अत्यंत नाजूक अशी असते. त्यामुळे त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. 

वाचनाची आवड लावा

हल्ली फोन बाहेर कोणाचेही विश्व नाही. काही झाले तरी फोन हातात असतो. अनेक गरोदर बायका तासनंतास फोनवर असतात. त्यामुळे डोळ्यांना तर त्रास होतोच शिवाय आपल्या बाळावरील गर्भसंस्कार देखील चांगले होत नाही. त्या ऐवजी शक्य असेल तितके तुम्ही वाचयाला हवे. तुम्ही जितके वाचाल तितके तुमच्यासाठी नक्कीच चांगले असते. त्यामुळे तुम्ही वाचनाची सवय लावून घ्या. पुस्तकं वाचताना चांगली अशी पुस्तके वाचावीत. त्यामुळे मन शांत राहण्यास मदत मिळते. 

आता गर्भधारणा झाली असेल तर या काही गोष्टी लक्षात घेऊन नक्कीच काळजी घ्या.

Read More From आरोग्य