आजकाल टॅटू काढून घेण्याची क्रेझ सगळीकडेच निर्माण झाली आहे. ज्यामुळे कपल्स, किशोवयीन मुलं मुली, फॅशन इंडस्ट्रीमधील लोक, सेलिब्रेटीज शरीरावर निरनिराळ्या भागांवर टॅटू काढतात. टॅटूमुळे तुम्हाला एक कूल आणि हटके लुक मिळतो. मात्र कधी कधी तुम्ही जेव्हा पारंपरिक अथवा एथनिक लुक करता तेव्हा काही काळासाठी तुम्हाला हा टॅटू लपवता आलं तर बरं होईल असं वाटू लागतं. कारण तुमच्या ट्रेन्डी टॅटूमुळे तुमचा एथनिक लुक बिघडू शकतो. यासाठीच आम्ही तुम्हाला टॅटू मेकअपने लपवण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे काही काळासाठी तुमचा कायमस्वरूपी असलेला टॅटू पूर्णपणे झाकला जाईल. मेकअप काढल्याशिवाय या टॅटूचे नामोनिशाण कुणाला दिसणार नाही. जर तुम्हाला तुमचा कायमस्वरूपी टॅटू काही वेळासाठी पूर्णपणे झाकायचा असेल तर त्यासाठी मेकअपही बेस्टच करायला हवा. यासाठी या टिप्स जरूर फॉलो करा.
फुल कव्हरेज देणाऱ्या फाऊंडेशन आणि कन्सिलरचा वापर करा –
मेकअपने टॅटू लपवण्यासाठी नेहमी फुल कव्हरेज फाऊंडेशनचा वापर करा. कारण फुल कव्हरेज देणाऱ्या फाऊंडेशनमुळे तुमच्या त्वचेवर एक छान बेस तयार होतो ज्यामुळे तुम्हाला टॅटू लपवण्यासाठी अती कन्सिलर लावण्याची गरज लागत नाही. यासाठीच असं फाऊंडेशन मेकअप करताना निवडा जे फुल कव्हरेज देणारं, वेटलेस, तुमच्या स्कीनटोनला मॅच होणारं आणि जास्त काळ टिकणारं असायला हवं. त्याचप्रमाणे तुम्ही जे कन्सिलर वापरणार आहात तेही चांगल्या दर्जाचं आणि फुल कव्हरेज देणारच हवं त्यामुळे फक्त थोडंसं कन्सिलर लावून तुमचा टॅटू झाकला जाईल. तुम्ही कन्सिलर निवडाल ते वॉटरप्रूफही असेल याची काळजी घ्या. कारण घामामुळे ते खराब होणार नाही.
कलर करेक्टिंग रेयॉन योग्य पद्धतीने वापरा-
टॅटू लपवण्यासाठी कलर करेक्टर रयॉन तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरतील. ज्यामुळे तुमचा कोणताही टॅटू सहज लपवता येऊ शकतो. जर तुमच्या टॅटूमध्ये लाल रंगाच्या शाईचा वापर केलेला असेल तर तो लपवण्यासाठी तुम्हाला हिरव्या रंगाच्या कलर करेक्टरचा वापर करावा लागेल. करेक्टर लावल्यावर ते त्वचेमध्ये ब्लेंड करा आणि मगच तुमच्या त्वचेवर फाऊंडेशन आणि कन्सिलरचा वापर करा.
shutterstock
टॅटू लपवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा –
स्टेप 1 – कन्सिलर लावण्यापूर्वी त्वचेवर चांगलं प्रायमर लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतली जाईल आणि मेकअपमुळे त्वचेचं नुकसान होणार नाही. शिवाय मेकअप दिवसभर टिकण्यासाठी प्रायमर लावणं फायद्याचं ठरेल.
स्टेप 2 – प्रायमर लावल्यावर त्यावर करेक्टर लावा म्हणजे तुमचा टॅटू हलका आणि फिकट दिसू लागेल. त्यानंतर त्वचेवर फाऊंडेशन लावा आणि ते व्यवस्थित ब्लेंड करा. टॅटू काही काळासाठी लपवण्यासाठी फाऊंडेशन लावण्याची बेस्ट पद्धत म्हणजे ते हाताने लावणे आणि मग ते ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर करणे.
स्टेप 3 – कन्सिलरचा योग्य पद्धतीने वापर करा. फाऊंडेशन व्यवस्थित ब्लेंड झाल्यावर टॅटूवर कन्सिलर लावा. यासाठी तुमच्या त्वचेला मॅच होणारी शेड निवडा. फाऊंडेशनप्रमाणेच कन्सिलर लावण्यासाठीही ब्युटी ब्लेंडरचा वापर करा. ब्युटी ब्लेंडर डॅब करत तुम्ही कन्सिलर ब्लेड करू शकता. तुमचा टॅटू पूर्णपणे दिसेनासा होईपर्यंत त्यावर कन्सिलर लावा. जर तुम्ही फुल कव्हरेज प्रॉडक्टचा वापर केला तर ते जास्त लावण्याची गरज लागणार नाही.
स्टेप 5 – सेटिंग पावडरने मेकअप सेट करा. जर तुम्हाला मेकअप काढेपर्यंत तुमचा टॅटू दिसू नये असं वाटत असेल तर सेटिंग पावडर लावणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुमचे फाऊंडेशन आणि कन्सिलर व्यवस्थित सेट होईल.
स्टेप 6 – मेकअप सेटिंग स्प्रेने तुमचा मेकअप सेट केला तर तो कशामुळेही लवकर खराब होणार नाही. तुमचा टॅटू तुम्ही मेकअप काढेपर्यंत मुळीच दिसणार नाही.
स्टेप 7 – मेकअप व्यवस्थित काढा. ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दिवसभर जर तुम्ही मेकअप केला असेल तर तो व्यवस्थित काढला नाही तर तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. शिवाय तुमचा आवडता टॅटू तु्म्ही फार काळ लपवून ठेवू शकत नाही. टॅटू ही तुमची ओळख आहे तेव्हा मेकअप काढा आणि पुन्हा अंगावर टॅटू मिरवा. मेकअप काढण्यासाठी चांगल्या मेकअप रिमूव्हरचा वापर करा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
अप्परलिप्स करा आता घरच्या घरी, सोपी पद्धत
मेकअप करताना असा करा टिश्यू पेपरचा वापर
Tattoos: टॅटू काढताय… मग त्याआधी ही माहिती अवश्य वाचा (Cover Up Tattoo Design In Marathi)
Read More From Make Up Trends and Ideas
चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप | Face Makeup For Freckles In Marathi
Leenal Gawade
मेकअप न आवडणाऱ्या मुलींसाठी सोप्या मेकअप टिप्स (Simple Makeup Tips In Marathi)
Vaidehi Raje
एचडी मेकअप आणि एअरब्रश मेकअपमध्ये काय आहे नेमका फरक
Trupti Paradkar