आरोग्य

वजन कमी करायचं आहे, मग हे अॅक्युप्रेशर पॉईंट आहेत फायदेशीर

Trupti Paradkar  |  Jun 16, 2021
वजन कमी करायचं आहे, मग हे अॅक्युप्रेशर पॉईंट आहेत फायदेशीर

 

 

आधुनिक जीवनशैलीमध्ये वाढणारं वजन समस्या अनेकांना सतावत असते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही जीमला जाणं सुरू करता, निरनिराळ्या प्रकारचे डाएट करता. पण बरेचदा अनेक उपाय करूनही वजनावर हवा तसा परिणाम दिसून येत नाही. पण जर योग्य  आहार आणि व्यायमासोबत काही पारंपरिक थेरपीची मदत घेतली तर नक्कीच फायदा होऊ शकतो. अॅक्युप्रेशर ही अशी एक उपचार पद्धती आहे जिचा आजवर अनेकांना चांगला फायदा झालेला आहे. तज्ञ्जांच्या मते जर शरीरातील ठरविक भागावरील पॉईंट योग्य प्रेशर देऊन दाबले तर शरीरातील काही ग्रंथी उत्तेजित होतात. ज्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी कोणते अॅक्युप्रेशर पॉईंट दाबावे.

वजन कमी करण्यासाठी अॅक्युप्रेशर पॉईंट

 

शरीरावरील हे अॅक्युप्रेशर पॉईंट दाबून तुम्ही करू शकता तुमचे वजन कमी

पायाच्या टाचा

 

जेव्हा तुम्ही अनवाणी चालता तेव्हा तुमच्या पायामधील आणि टाचांवरील काही प्रेशर पॉईंट दाबले जातात. यासाठीच अनवाणी चालण्यामुळे तुम्हाला फ्रेश आणि उत्साही वाटू लागतं. वजन कमी करण्यासाठी हा अॅक्युप्रेशर पॉईंट फायदेशीर ठरेल. ह पॉईंट टाचेवर बाहेरच्या दिशेने असतो. यासाठी रोज हा पॉईंट अथवा टाच तुमच्या अंगठ्याने दाबा. टाचेला तेलाने मालिश केल्यामुळेही तुमच्या वजनावर चांगला परिणाम होईल.

बेंबी

 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही बेंबीच्या वर चांर इंच असलेला अॅक्युप्रेशर पॉईंट दाबू शकता. हा पॉईंट प्रेस केल्यामुळे तुमच्या पोटावरील आणि कंबरेकडील चरबी कमीम होते. यासाठी बेंबीच्या थोडं वर दोन बोटांच्या मदतीने प्रेशर द्या. मात्र पोटावर अतिरिक्त दाब येणार नाही याची  काळजी हे करताना घ्यायला हवी. जर तुम्हाला दाब देण्याचे तंत्र माहीत नसेल तर तुम्ही बेंबी आणि बेंबीच्या आजूबाजूला तेलाने मालिश करू शकता.

कान

 

कानामध्ये असे अनेक अॅक्युप्रेशर पॉईंट आहेत जे दाबल्यास तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो. कानाची पाळी दोन बोटांनी दाबल्यास हा पॉईंट अॅक्टिव्हेट होतो. यामुळे तुमची भुक नियंत्रित राहण्यास मदत होते. अती भुक लागल्यामुळे तुम्ही अपथ्यकारक पदार्थ खात नाही आणि तुमचे वजन नियंत्रित राहते.

अंगठा

 

हाता पायाच्या बोटांमध्येही अनेक अॅक्यु प्रेशर पॉईंट असतात. अंगठा आणि अनामिकेच्या मध्ये असलेला पॉईंट तुमच्या शरीरातील ग्रंथीचे कार्य उत्तेजित करतात. ज्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते आणि तुमच्या वजनावर चांगला परिणाम होतो. वजन कमी करण्यासाठी दिवसभरात दोन ते तीन वेळा हलका दाब देत तु्म्हाला तो अॅक्टिव्हेट करायचा आहे. या भागावर हलका मसाज करत तुम्ही प्रेशर पॉईंट अॅक्टिव्हेट करू शकता.

नाकाच्या खाली

 

नाकाच्या खाली आणि ओठांच्या वर असलेला पॉईंट वजन कमी करण्यासाठी जास्त परिणामकारक आहे.  या पॉईंटला शुईगो स्पॉट असं म्हणतात. हा पॉईंट अॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला नाकाच्या शेंड्यापासून दाबत दाबत ओठांच्या वरच्या भागापर्यंत जायचं आहे. वजन कमी  करण्यासाठी हा एक चांगला आणि परिणामकार उपाय ठरू शकतो. 

 

अॅक्युप्रेशर पॉईंटवर दाब देताना एक गोष्ट लक्षात ठेवा जरी ही परिणामकारक थेरपी असली तरी योग्य ठिकाणी योग्य दाब मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे हे कौशल्य तुम्हाला एखाद्या तज्ञ्ज व्यक्तीकडून शिकून घ्यायला हवे. एक्युप्रेशर करताना चुकीचा दाब दिल्यास विपरित परिणाम भोगावे लागू शकतात. आजकाल याचे शास्त्रशुद्ध तंत्र शिकवले जाते त्यामुळे तज्ञ्जांच्या मदतीने ते शिकून घ्या आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न  करा. 

फोटोसौजन्य – इनस्टाग्राम

अधिक वाचा –

वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हा डाएट प्लॅन

रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खाल तर व्हाल लठ्ठ

लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

Read More From आरोग्य