Fitness

वजन कमी करण्यासाठी करा अशा प्रकारे मधाचा वापर, सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Jul 14, 2020
वजन कमी करण्यासाठी करा अशा प्रकारे मधाचा वापर, सोप्या टिप्स

आपली सध्याची लाईफस्टाईल खूपच खराब आहे. बऱ्याचदा कामाच्या नादात जेवणाकडेही लक्ष राहात नाही. मग अशावेळी पटापट वजन वाढतं. वजन वाढल्यानंतर व्यायाम करायलाही वेळ नसतो. मग अशावेळी आपण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. जेवण कमी करतो. पण त्याहीपेक्षा सोपा उपाय म्हणजे आपण नियमित मधाचा वापर करावा. मधाचा योग्य वापर केल्याने वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. या लेखात आम्ही तुम्हाला मधाचा कसा वापर करावा याच्या सोप्या टिप्स देत आहोत. मध हा वजन कमी करण्यासाठी आणि शरीरासाठी उत्तम पर्याय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र याचा रोजच्या आयुष्यात कसा वापर करायचा हे मात्र सर्वांना माहीत नाही. त्यामुळे याचा वजन कमी  करण्यासाठी कसा फायदा करून घ्यायचा ते आपण या लेखातून जाणून घेऊया. मधामध्ये असे अँटिऑक्सिडंट्स असतात जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. मधाचा कोणत्या प्रकारे वापर करता येतो पाहूया. 

दालचिनी आणि मध

Shutterstock

1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध घाला आणि ½ चमचा दालचिनी पावडर मिक्स करून घ्या. हे पाणी तुम्ही सकाळी प्या. 

फायदा 

– दालचिनी आणि मधाचे सेवन केल्याने वजन कमी होते असे शोधात सिद्ध झाले आहे 

– उच्च पातळीची शुगर असल्यास फॅट्सचे स्टोरेज वाढते. त्यामुळे वजन वाढते, मात्र दालचिनीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे वजन कमी करण्यास मदत होते

मध आणि पुदीना

Shutterstock

2 टीस्पून मध घेऊन त्यात 1 टीस्पून पुदिन्याचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही नियमित प्या. यामुळे वजन कमी होते. 

फायदा 

– पुदीन्याचे सेवन करण्याने मेजाबॉलिजम वाढते 

– मधातील अँटिऑक्सिडंट्स हे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते

वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स

तुळस आणि मध

Shutterstock

1 ग्लास पाण्यात थोडीशी तुळशीची पानं घ्या आणि ते पाणी उकळा. पाणी अर्धे झाल्यावर ते गॅसवरून खाली घ्या.  रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही हे पाणी प्यायल्यास चरबी कमी होण्यास मदत मिळते. 

– 2 टीस्पून तुळशीच्या रसामध्ये 2 चमचे मध मिसळून पाणी प्या, वजन कमी होते

– हवं असल्यास, तुम्ही उकळत्या पाण्यात पुदीन्याची पानं आणि लिंबाचा रसही मिक्स करू शकता

फायदा 

– तुळशीचा रस अनेक आजारांपासून सुटका मिळवून देतो 

– तुळशीमध्ये कमी कॅलरी असते आणि पोषक तत्वही असतात. तसंच रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्ल्यानेही वजन कमी होते

– तुळशीचा रस हा पचनसंंबंधी समस्या दूर करतो. पचनसंबंधी समस्या दूर झाल्यावर आपोआपच वजन कमी होते

पुदीना आणि तुळशीच्या आईस क्यूबने बनवा अधिक तजेलदार त्वचा

लसूण आणि मध

Shutterstock

लसणीच्या 8-10 पाकळ्या सोलून घ्या आणि एका जारमध्ये  ठेवा. रोज सकाळी 1-1 पाकळी खाल्ली तरी वजन कमी होण्यास मदत होते. तसंच 2-3 लसणाची पेस्ट करून घ्या आणि त्यात रोज सकाळी मध मिसळून खाल्ला तर वजन कमी होते. 

फायदा 

– लसूण आणि मध एकत्र खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते 

– शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे

– पचनसंबंधी आजार बरे करण्यासाठीही याचा उपयोग होतो  

रोज सकाळी लसूण आणि मध खाल्ल्यामुळे होतात हे अप्रतिम फायदे

मध आणि लिंबू

Shutterstock

1 ग्लास कोमट पाण्यात 2 चमचे मध घ्या आणि स्वादानुसार लिंबाचा रस मिक्स करून रोज रिकाम्या पोटी सकाळी उठून प्या. यामुळे वजन कमी होते 

फायदा 

– नियमित स्वरूपात तुम्ही लिंबू आणि मधाचे पाणी प्यायल्यास, पचनक्रिया चांगली होते आणि बद्धकोष्ठ होत नाही 

– लिव्हर स्वच्छ राखण्यास मदत मिळते 

– नियमित स्वरूपात हे पाणी प्यायल्यास, त्वचेवर नैसर्गिक चमक राहाते 

 

जिरे आणि मध

Shutterstock

1 ग्लास पाण्यात 1 टीस्पून जिरे  घाला आणि रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठून हे पाणी उकळून घ्या आणि थंड झाल्यावर त्यात 2 चमचे मध मिसळून ते पाणी प्या. 

फायदा 

– यामध्ये अजिबातच कॅलरी नसतात

– जिरे आणि मधाचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिजम चांगले होते 

– जिरे आणि मधाच्या पाण्यात असे तत्व असते जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर डिटॉक्स करायला मदत करते

जिऱ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर, शरीरासाठी आहे डिटॉक्स

दूध आणि मध

Shutterstock

रात्री झोपण्याआधी 1 ग्लास कोमट पाण्यात 2 टीस्पून मध मिसळून प्या.  यामुळे चरबी कमी होते.

फायदा 

– दूध आणि मध मिसळून प्यायल्याने अनिद्रा समस्या असल्यास दूर होते आणि चांगली झोप लागते 

– दुधामध्ये मध घालून प्यायल्यास स्टॅमिना वाढण्यास मदत मिळते 

Read More From Fitness