सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? प्रत्येकालाच आपण सुंदर असावं असं वाटतं. चेहऱ्यावर आपण सुंदर दिसण्यासाठी अनेकदा मेकअपचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? हायलायटर हा चेहऱ्यावरील मेकअप लुकचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार करण्यासाठी तुम्ही हायलायटरचा (highlighter) योग्य वापर करून घेऊ शकता. हायलायटरमुळे तुमचा लुक अधिक ग्लॅमरस होतो. पण नक्की या हायलायटरचा चेहऱ्यावर कसा उपयोग करायचा हे प्रत्येकाला माहीत नसते. हायलायटरचा वापर करण्याची सोपी पद्धत आहे. हेच आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुम्हीदेखील याचा उपयोग करून अधिक सुंदर दिसा. चेहऱ्यावर तुम्ही हायलायटरचा वापर करू शकता. अशा 5 जागा आहेत जिथे तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. या जागांवर कसा उपयोग करून घेता येईल ते पाहूया.
नाक
बऱ्याच जणांना आपल्या नाकाबद्दल अढी असते. काही जणांचे नाक लांबच असते तर काही जणांचे नाक बसके असते. तुम्हालाही तुमच्या नाकाचा आकार व्यवस्थित दाखवायचा असेल तर तुम्ही हायलायटरचा उपयोग करा. नाकावर योग्य प्रमाणात नाकाचे सौंदर्य खुलविण्यासाठी तुम्ही हायलायटर लावा आणि ते बोटांनी मिक्स करून नीट पसरवून घ्या. यामुळे तुम्ही तुमच्या नाकाची लांबी आणि रूंदी व्यवस्थित दर्शवू शकता. तुमचे नाक अगदी व्यवस्थित टोकदार दर्शविण्यासाठीही तुम्हाला हायलायटरचा वापर करून घेता येतो.
भुवयांच्या खालचा भाग
जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा लहान डोळे असणाऱ्या व्यक्तींच्या भुवयांचा खालचा भाग लला जात. मग अशावेळी तुम्ही भुवयांच्या खालचा भाग व्यवस्थित दर्शविण्यासाठी हायलायटरचा वापर करावा. तुम्ही बोटांच्या मदतीने भुवयांच्या खालच्या भागा हायलायटर लावावे. तसंच हायलायटर लावल्याने तुम्ही त्यावर केलेला डोळ्यांचा मेकअप अधिक चांगला उठून दिसतो.
गालांच्या हाडावर अर्थात चिकबोन्सवर
तुम्हाला तुमचे गाल चमकदार आणि अधिक चांगले दाखवायचे असतील तर तुम्ही गालांच्या हाडावर अर्थात चिकबोन्सवर तुमच्या हातांच्या बोटांनी हायलायटरचा वापर करावा. हे व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर घाम आल्यानंतर ते फुटणार नाही अर्थात पसरणार नाही.
ओठांवर हायलायटर
आता तुम्हाला प्रश्न पडेल की ओठांवर हायलायटर लावायची काय गरज आहे? पण लिपस्टिक लावायच्या आधी ओठांवर हायलायटर लावणे उत्तम ठरते. अगदी हलकेसे हायलायटर तुम्ही ओठांच्या मध्यभागी वापरा. यामुळे तुमचे ओठ अधिक सुंदर दिसतात. तसंच तुमच्या ओठांचा आकार उठून दिसतो. तुम्ही व्यवस्थित मेकअप करत असाल तर तुम्ही हायलायटरचा वापर ओठांसाठी नक्कीच करा आणि फरक पाहा.
हनुवटीवर हायलायटर
हनुवटीवर तुम्ही डायरेक्ट हायलायटर लावण्यापेक्षा आपल्या बोटांनी हायलायटर लावा आणि हलकेसे टॅप करून तुम्ही ते पसरवा. तुम्हाला हायलाटरचा वापर हनुवटीवर केल्यानंतर हनुवटीचा भाग अत्यंत सुंदर दिसतो. तसंच चेहऱ्याला एक वेगळा लुक मिळतो. ज्यामुळे तुम्ही तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालू शकता.
लक्षात ठेवा – तुम्ही चेहऱ्याला हायलायटर लावण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्या. तसंच जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरील मेकअप काढाल तेव्हा चेहऱ्याला गुलाबपाणी लावा. चेहऱ्यावरील पूर्ण कॉस्मेटिक्स निघून जावे आणि चेहऱ्यावर मुरूमं येऊ नयेत यासाठी हा उत्तम उपाय आहे. हायलायटर हे नियमित वापरणार असाल तर तुम्ही नक्की गुलाबपाण्याचा उपयोग करून तुमची त्वचा अधिक सुंदर आणि नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक