DIY लाईफ हॅक्स

लहान वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी खूप कपडे धुण्यासाठी करा ही युक्ती 

Vaidehi Raje  |  Jul 18, 2022
Washing Machine Tips

कपडे धुणे हे खूप वेळखाऊ आणि किचकट काम आहे आणि कपडे धुवायला आवडणारी क्वचितच कोणी व्यक्ती असेल. वॉशिंग मशीनच्या आगमनाने कपडे धुणे आणि सुकणे खूप सोपे झाले आहे. पण वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक असो की सेमी ऑटो, कपडे धुण्याचे काही नियम आहेत जे बहुतेकांना माहीत नाहीत. अशा परिस्थितीत कपडे खराब होतात आणि दोष मशीनवर जातो. पण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचे कपडे देखील चमकतील आणि मशीन देखील तुम्हाला दीर्घकाळ साथ देईल. ज्यांच्याकडे वॉशिंग मशिन नाही, त्यांना माहितच असेल की एकाच व्यक्तीला घरातल्या सर्वांचे कपडे धुण्यात किती त्रास होतो. तसेच, एखाद्याकडे लहान वॉशिंग मशीन असेल तर त्यांनाही भरपूर कपडे मशीनमध्ये कसे धुवावेत हा प्रश्न पडतो. तसेच लहान वॉशिंग मशीनमध्ये जड कपडेही धुता येत नाहीत. बहुतेक घरांमध्ये जास्त कपडे धुवायला पडले की दोन ते तीन वेळा कपडे धुवावे लागतात. जर तुमच्याकडचे वॉशिंग मशीनदेखील लहान असेल आणि धुवायला भरपूर कपडे असतील तर अशावेळी कमी पाण्यात व कमी वीज वापरून जास्तीत जास्त कपडे स्वच्छ कसे धुवावेत हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. 

मशीनमध्ये जास्त पाणी भरू नका

जर तुमचे वॉशिंग मशीन फार मोठे नसेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याची पाणी साठवण्याची क्षमता देखील कमी असेल. त्यामुळे त्यात जास्त पाणी ओतण्याचा प्रयत्न करू नका. मशीनमध्ये जास्त पाणी भरले तर जेवढे कपडे तुमच्या मशीनमध्ये मावू शकतात तेवढे मावणार नाहीत. त्यात आवश्यक पातळीइतकेच पाणी भरा.

खूप जड कपडे एकत्र धुवू नका 

Washing Machine Tips And Tricks

जर तुम्ही एकाच वेळी खूप जड कपडे धुवायला टाकले तर मशीनमध्ये  जास्त कपडे मावणार नाहीत. एका वॉश लोडमध्ये खूप जड कपडे एकत्र ठेवले तर लहान कपड्यांसाठी जास्त वेळा मशीन चालवावे लागेल. त्यामुळे प्रत्येक लोडमध्ये एक किंवा दोन जड कपडे धुवायला टाका. तुम्ही अशा प्रकारे क्रमवारी लावल्यास, कपडे लवकर आणि स्वच्छ धुतलें जातील आणि तुम्हाला मशीन पुन्हा पुन्हा चालवावे लागणार नाही. तसेच पांढऱ्या कपड्यांबरोबर रंगीत कपडे धुवायला टाकू नका. 

जास्त डिटर्जंट घालू नका

बहुतेक लोकांना असे वाटते की अधिक डिटर्जंट वापरल्याने त्यांचे कपडे स्वच्छ धुतले जातील..पण लहान वॉशिंग मशीनमध्ये फोम खूप जास्त वर येतो आणि जर असे जास्त वेळा झाले तर मशीनच्या वरच्या भागात साबणाचा थर बसू लागतो. कपडे धुण्यावरही त्याचा परिणाम होतो.

या गोष्टी करणे टाळा 

Washing Machine Tips And Tricks

वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आपल्या काही चुकीच्या सवयीचा वॉशिंग मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि कपडेही लवकर खराब होतात. कपडे धुवायला टाकताना जीन्स किंवा शर्टच्या खिशात काहीही ठेवू नका. प्लास्टिक, टिश्यू, चाव्या, नाणी अशा गोष्टी अडकल्यामुळे वॉशिंग मशीन खराब होऊ शकते. तसेच वॉशिंग मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे व पाणी देखील भरू नका. कपडे धुवून झाल्यानंतर वॉशिंग मशिनमध्ये ओले कपडे जास्त वेळ ठेवू नका. वॉशिंग मशीनच्या शेवटच्या सायकलमध्ये आपण अनेकदा फॅब्रिक कंडिशनर घालतो. पण जर तुम्ही फॅब्रिक कंडिशनर थेट फॅब्रिकवर लावले तर फॅब्रिकचे तंतू खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते प्रथम डायल्युट करूनच वापरावे. 

तर या काही गोष्टी आहे ज्या वॉशिंग मशीन वापरताना आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स