लवकरच बॉलीवूडची क्वीन म्हणजेच कंगना रणौत तामिळनाडूच्या पूर्व मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका निभावताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाला तब्ब्ल 24 करोड मानधन देण्यात आल्याचं तुम्ही ऐकलं असेलच. या मानधनाच्या आकड्यामुळे कंगना आता बॉलीवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. सूत्रानुसार, कंगना रणौतला जयललिता यांच्या भूमिकेसाठी सर्वात योग्य अभिनेत्री मानलं जात आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, कंगना जयललिता यांचा लुक कसा साकारणार?
साधारणतः बायोपिक चित्रपट हे कोणत्याही दिग्गज व्यक्तिमत्त्वांवरच बनवण्यात येतात आणि प्रेक्षक त्या अभिनेत्यामार्फतच त्या व्यक्तिमत्त्वांशी कनेक्ट करतात. त्यामुळे त्या व्यक्तिमत्त्वाचा हूबेहूब लुक अडॉप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. याचा अंदाज तुम्ही संजय दत्तच्या बायोपिक चित्रपटावरूनच लावू शकता. सूत्रानुसार, या चित्रपटावेळी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ठरवलं होतं की, संजय दत्तचा लुक अडॉप्ट करता आला नाहीतर ते हा चित्रपट बनवणार नाहीत.
कंगना रणौतच्या अपियरन्सबाबत बोलायचं झाल्यास ती स्लिम आहे. जयललिताही सुरूवातीच्या काळात स्लिम होत्या. पण नंतर मात्र जयललिता यांचं वजन वाढलं. आता कंगना हे कसं करणार हे बघावं लागेल. कारण जयललिता यांच्यासारखं दिसण्यासाठी कंगनाला वजन वाढावावं लागेल किंवा मग सिंथेटीक मेकअपची मदत घ्यावी लागेल. पण याबाबत अजून कोणताही खुलासा झालेला नाही. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये मेकअप ट्रीक्सच्या मदतीने विविध लुक अडॉप्ट करण्यात आले आहेत.
कंगनाचा हा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आहे. या भूमिकेसाठी कंगना तयारी करण्यास सुरूवातही केली आहे. सूत्रानुसार, कंगना रणौतने या चित्रपटासाठी तामिळ शिकायला सुरूवात केली आहे. हा चित्रपट तामिळ आणि हिंदीमध्ये शूट करण्यात येणार आहे. जर कंगना तामिळ शिकू शकली नाहीतर या चित्रपटाचं डबिंग करण्यात येईल.
1991 ते 2016 या काळात 5 वेळा जयललिलता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यांचं निधन 5 डिसेंबर 2016 ला झालं. त्यांच्या निधनाला अजून काहीच वर्षांचा काळ झाल्याने त्यांची छवी आजही तिथल्या लोकांच्या मनात कायम आहे.
त्यामुळे कंगनाला या भूमिकेसाठी खूप मेहनत घ्यावी लागणार हे मात्र नक्की.
हेही वाचा –
आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली – कंगना रणौत
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje