आजही आपल्याकडे अनेक ठिकाणी महिलांसाठी योग्य असे टॉयलेट नाहीत. सार्वजनिक शौचालयाचा विचार केला तर अशा ठिकाणी जाण्याची सोय नसते. अपुरे पाणी, अस्वच्छता या सगळ्या कारणामुळे महिलांना टॉयलेटला जाताना खूप विचार करावा लागतो. कारण हायजिन ही गोष्ट पाळली गेली नाही तर महिलांना गुप्तांगाच्या ठिकाणी एलर्जी, रॅशेश किंवा फोड येण्याची शक्यता असते. महिलांच्या त्वचेप्रमाणाचे त्यांच्या प्रायव्हेट पार्टच्या त्वचेची काळजी घेणे देखील तितकेचे गरजेचे आहे. याचसाठी तयार करण्यात आले आहेत ते म्हणजे इंटिमेट वाईप्स. आता तुम्ही म्हणाल या वाईप्सची गरज तरी काय? चला जाणून घेऊया इंटिमेट वाईप्स कसे कामी येतात ते.
प्रवासातील स्वच्छता
ज्यावेळी आपण लांबचा प्रवास करत असतो अशावेळी महिलांना सगळीकडेच स्वच्छ टॉयलेट मिळेल असे सांगता येत नाही. कमोड किंवा इंडियन असे कोणतेही टॉयलेट असले तरी देखील त्या ठिकाणी स्वच्छता नसते. अशावेळी आपल्या योनीमध्ये इन्फेक्शन होऊ नये आणि लांबच्या प्रवासात आपल्या पँटी भिजून राहता कामा नये यासाठी वाईप्स उत्तम असतात.त्यामुळे लघवीचा वास येत नाही. शिवाय ती जागा कोरडी राहिल्यामुळे पँटीजदेखील खराब होत नाहीत. प्रवासात प्रत्येक महिलेने त्यासाठी हे वाईप्स अगदी हमखास कॅरी करायला हवेत.
त्वचा करते मॉश्चराईज
आपण चेहऱ्याची इतकी काळजी घेतो की, आपल्याला त्या जागेची तितकी काळजी घ्यावीशी अजिबात वाटत नाही. अनेकदा आपल्या योनीकडील जागा आणि मांड्याच्या आतला भाग हा ड्राय झालेला असतो. आपण मॉईश्चरायझर लावायलाही त्या ठिकाणी जात नाही. अशावेळी हे वाईप्स तुम्हाला चांगलेच कामी येतात. कारण त्यामुळे तेथे हायड्रेशन मिळते. त्यात असलेल्या इसेन्शिअल ऑईल्सच्या वापरामुळे तेथील त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. ड्रायनेसमुळे येणारे रॅशेशदेखील येत नाहीत.
त्वचेचा पीएच बॅलेन्स राखतात
शरीराराचा हा भाग कधीही मोकळा नसतो. तो सतत आत असतो तरी देखील इतर शरीराच्या तुलनेत त्याचा रंग हा थोडा अधिक काळवंडलेला असतो. इंटिमेट वाईप्सचा वापर केल्यामुळे त्याचा पीएच बॅलन्स राखण्यास मदत मिळते. मासिक पाळी आणि हार्मोनल बदलामुळे आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलाचा परिणाम म्हणून की काय आपल्या त्वचेमध्ये फरक पडत राहतो. ही जागा अधिक ॲसिडिक असते. त्यातील अल्केलाईनचे प्रमाण कमी करण्याचे काम इंटिमेट वाईप्स करतात.
जळजळ करते कमी
खूप वेळा आपल्याला योनी मार्गाकडे अचानक खाज येऊ लागते. ही खाज काही केल्या कमी होत नाही. जीम किंवा खूप चालल्यामुळे या ठिकाणी घामही खूप येतो. खूप घाम आल्यामुळे आणि घर्षणामुळे या ठिकाणी खूप जळजळ होत राहते. ही जळजळ कमी करण्याचे काम इंटिमेट वाईप्स करतात. इंटिमेट वाईप्स घेऊन तुम्ही तो योनी मार्गावर फिरवला की, कमालीचा थंडावा मिळतो.
पिरेड्समध्येही येतात कामी
मासिकपाळीच्या काळात आपण कुठे बाहेर जात असू तर अशा वेळात आपल्याला खूप वेळा चिकचिक लागत राहते. त्यातून आराम मिळवायचा असेल तर आपल्याला इंटिमेट वाईप्सचा वापर करता येतो. योनीची जागा स्वच्छ पुसून काढली की तो चिकचिकपणा जाणवत नाही. आरामच मिळतो. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास पिरेड्समध्ये ते कॅरी करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल.
आता इंडिटमेट वाईप्सचे फायदे जाणून घेत त्याचा वापर करायला अजिबात विसरु नका.