Fitness

कोरोनासंदर्भातील या भाकीतांवर कधीही ठेवू नका विश्वास

Leenal Gawade  |  May 12, 2021
कोरोनासंदर्भातील या भाकीतांवर कधीही ठेवू नका विश्वास

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाशी आपण झुंज देत आहोत. या दोन वर्षांमध्ये अनेकांना कोरोना झाला. त्यातून ते बरेही झाले. तर काहींना मात्र या आजाराने घाबरवून सोडले. त्यामुळे कोरोना हा आजार काय आहे ? तो कशामुळे होते? त्याची लक्षणे काय ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. काही जणांनी कोरोनाला फार गांभीर्याने घेतले आहे.तर काहींनी कोरोनाला फार हलक्यात घेतले आहे. कोरोना काळात अनेक अशा गोष्टी समोर आल्या की, खूप जणांना त्या गोष्टीने घाबरुनही टाकले. कोरोना काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक खोट्या अफवा आणि चुकीचे घरगुती इलाज आतापर्यंत खूप जणांनी केले आहेत. पण आता कोरोनाशी लढा देणारी लस आली आहे. लस घेणे हा यावर एक उत्तम पर्याय आहे. पण तरीदेखील कोरोनासंदर्भात काही भाकीत ही अजूनही सगळीकडे लोकांचा गोंधळ वाढवत आहे. कोरोनासंदर्भात आम्ही असे काही भाकीत शोधून काढले आहेत. ज्याची सत्यता काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया.

कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ज्ञांचा इशारा

Instagram

भाकीत क्रमांक 1. – कोव्हिडची लस घेणे असुरक्षित आहे 

सत्य: कोव्हिडशी लढा देण्यासाठी कोवॅक्सिन आणि कोव्हिडशिल्ड नावाचे दोन वॅक्सिन आले आहेत. तब्बल 1 वर्षापासून ही वॅक्सिन तयार केली जात आहे. या या दोन्ही कंपन्याची वॅक्सिन्स ही टेस्ट केलेली आहेत. आधीच्या पेशंट्सवर त्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच ती सगळ्यांसाठी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आली आहे. सुरुवातीला 60 वयापेक्षा अधिक व्यक्तिंना ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना या आजाराची शक्यता अधिक आहे.त्यामुळे हे वॅक्सिन सगळ्यात आधी ज्येष्ठ नागरीकांना देण्यात आले. हळुहळू ही लस प्रत्येक वयोगटातील लोकांना दिली जाणार आहे. ही लक्ष सुरक्षित असून कोणत्याही भाकीतांमुळे ती घेणं टाळू नका. 

भाकीत क्रमांक 2 : लस घेतल्यानंतर कसे तरी वाटू लागते

कोणतीही लस घेतल्यानंतर शरीरात अँटी बॉडीज तयार होतात. पण त्या तयार होण्याआधी प्रत्येकाला थोडासा त्रास होतो. काहींना लसीचा कोणताही परिणाम जाणवत नाही. त्यांचे आयुष्य जसे आहे तसे सुरळीत राहते. तर काहींना उल्टी, मळमळ, ताप येणे असे काही त्रास होऊ लागतात.  लस घेतल्यानंतरच  कोरोना होतो अशा काही केसेस निदर्शनास आल्यामुळे लोक घाबरुन लस घ्यायला बघत नाही. पण लस घेतल्यानंतर कोरोनाची दाहकता कमी होते. त्यामुळे होणारा त्रास हा निम्म्याहून कमी होतो. शिवाय तुमचे शरीर सुदृढ होण्यासही मदत मिळते.  त्यामुळे जरी कोणाला त्रास झाला असेल तरी देखील तुम्ही फार विचार करु नका आणि लस वेळेवर घ्या. 

कमी पाणी प्याल तर संभवतात हे त्रास

भाकीत क्रमांक 3 : लस घेतल्यामुळे मुलं होणार नाहीत

लसीसंदर्भातील एक भाकीत म्हणजे ही लस घेतल्यानंतर वंध्यत्व येते. त्यामुळे मुलं होत नाहीत. त्यामुळे तरुणांनी ही लस घेऊ नये असा काही अफवा बाहेर पसरत आहे. पण यामध्ये काहीही तथ्य नाही. लस घेतल्यानंतर मुलं होत नाहीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. जर तुम्ही 18 ते 44 या गटातील असाल आणि तुम्हाला याची भीती वाटत असेल तर तुम्ही एकदा तरी डॉक्टरांशी बोला त्यामुळे तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल. 

भाकीत क्रमांक 4 : गरोदर महिलांनी लस घेऊ नये.

गरोदर महिलांनी लस घेतल्यामुळे त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावर होते असे म्हटले जाते. पण यामध्ये काहीही तथ्य नाही. गरोदर महिलांनी किंवा अंगावरील दूध पाजणाऱ्या महिलानी देखील लस घेण्यास काहीच हरकत नाही. ही लस घेतल्यानंतर त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. 

त्यामुळे लसीसंदर्भातील ही भाकीत तुम्ही ऐकली असतील तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि सगळ्यात आधी लस घ्या. 

गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

 

 

Read More From Fitness