कोरोना काळ सुरु झाल्यापासून आपण एकच गोष्ट सतत ऐकत आहोत ती म्हणजे इम्युनिटी वाढवण्याची. रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्हाला कोरोनाच काय कोणताही आजार होऊ शकत नाही. त्यासाठी आहार हा नेहमी चौकस आणि चांगला असायला हवा. आहारात अन्य गोष्टींचा समावेश करताना तुम्ही नियमित तूपाचे सेवन करणे हे फारच फायद्याचे ठरते. तुपाच्या सेवनामुळे शरीरात प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय आरोग्यासंदर्भातील अनेक तक्रारी दूर करायला मदत करते. चला तर जाणून घेऊया इम्युनिटी वाढण्यासाठी तुपाचा समावेश नेमका कसा करावा ते.
तुपाचे फायदे
प्रत्येकाच्या घरात तूप असतेच. पण सगळेच तूप आवडीने खात नाही. काही जणांना तुपाचा वास आलेला अजिबात चालत नाही तर काही जणांना तुपाशिवाय चालत नाही. तुपामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात .शरीराला पोषक असणारे अर्थात शरीराला योग्य पोषण देणारे असे कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, विटामिन डी, विटामिन ए आणि अँटिव्हायरल घटक असतात. जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
अधिक काळ तूप टिकविण्याच्या सोप्या टिप्स, स्वाद राहील टिकून
तुपाचा करा समावेश
जर तुम्हाला तूप अजिबात आवडत नसेल तर तुम्ही तूप थेट खाऊ नका. अशांसाठी तुपात वळलेले लाडू हा देखील एक चांगला पर्याय आहे. तुपात वळलेले लाडू तुम्ही खाल्ले तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. जर तुम्हाला थेट तूप खायला आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुपाचा समावेश करु शकता. तुपासोबत तुमच्या पोटात अनेक घटक जातात. जे तुम्हाला फायद्याचे ठरतात. याशिवाय तुम्ही किमान दिवसातून एक तरी चमचा तूप खायला हवे.
तुपाची द्या फोडणी
तेलाऐवजी तुम्ही तुपाची फोडणी दिली तर जेवण अधिक चविष्ट आणि रुचकर लागते असे जेवण तुम्ही रोज जेवलात तर तुम्हाला तूपाचे अधिक फायदे मिळतात. व्हेज असो वा नॉन-व्हेज अगदी कोणत्याही प्रकारातील जेवण बनवण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करु शकता. तुम्ही तूपाची फोडणी दिली तर पदार्थाची चवही चांगली लागते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा तुपाची फोडणी दिलेले पदार्थ खा जे तुम्हाला अधिक फायदेशीर ठरतात. त्यामुळे पोटात अधिकाधिक तूप जाते. त्यामुळे जीरा राईस, चिकन, शिरा, उपमा, डाळीची फोडणी देण्यासाठी जास्तीत जास्त तुपाचा वापर करा. ज्यामुळे तुमच्या शरीरात जास्तीत जास्त तूप जाईल.
व्यायामानंतर कधीही खाऊ नका हे पदार्थ सुटेल पोट
दिवसातून खा एक चमचा तूप
जर तुम्हाला तूप अगदी कोणत्याही स्वरुपात आवडत असेल तर तुम्ही एक चमचा तूप खाण्यास काहीच हरकत नाही. सरळ एक चमचा तूप तुम्ही दिवसातून कधीही एकदा जेव्हा आवडेल तेव्हा खा किंवा जेवताना तुम्ही कधीही वरण भातावर घालून तूपाचे सेवन करा. जर हे तूप घरी कडवलेले असेल तर नक्कीच ते अधिक पौष्टिक असते. त्यामुळे तुम्ही दिवसातून शक्य असेल तेव्हा एक चमचा तूप खा.
आता इ्म्युनिटीची काळजी करण्यापेक्षा तुपाचे सेवन करा आणि प्रतिकारशक्ती वाढवा.