आरोग्य

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बुरशीजन्य संसर्गांमध्ये वाढ

Dipali Naphade  |  Apr 28, 2022
increase-in-fungal-infections-during-summer-days-in-marathi

उन्हाळ्यात फक्त गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्याच वाढत नाही, तर बुरशीजन्य संसर्गही होतो. येत्या काही दिवसांत तापमानात वाढ झाल्याने बुरशीजन्य संसर्गाची प्रकरणेदेखील वाढू लागली आहेत. प्रत्येकाने या दिवसात अत्यंत काळजी घेणे, चांगल्या वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे, सैल सुती कपडे घालणे आणि डॉक्टरांच्या मदतीने त्वरीत उपचार घेणे आवश्यक असेल. दमट परिस्थितीसह तापमानात वाढ झाल्यामुळे बुरशीजन्य संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वातावरणातील बदल आणि दमट हवेमुळे आपल्या अंगावर घाम येतो. हा घाम त्वचेच्या माध्यमातून कपड्यात शिरतो. त्यामुळे त्वचेवर बुरशी येण्यास अनुकूल असे वातावरण तयार होण्यास मदत होते. 

बुरशी अर्थात इन्फेक्शन

त्वचेवर येणाऱ्या या बुरशीस वैद्यकीय भाषेत इन्फेक्शन असं म्हणतात. काही लोक या समस्येला गजकर्ण, सुरमा असंही म्हणतात.पायांमध्ये हुरशी संसर्ग, नखांना बुरशी संसर्ग, यीस्ट इन्फेक्शन आणि जननेंद्रियाच्या भागात पुरळ उठणे ही चिंतेची बाब असू शकते तसेच डर्माटोफाइट संसर्ग होण्याची शक्यता वाढते. हे सांसर्गिक बुरशीजन्य संक्रमण पायांवर (टिनिया पेडिस, किंवा ऍथलीटचे पाऊल) किंवा शरीरावर इतर कोठेही आढळतात जेथे घाम सहजपणे जमा होऊ शकतो, जसे की तुमच्या बगलेत किंवा स्तनांखाली (टिनिया कॉर्पोरिस). डर्माटोफाइट संसर्ग बोटांच्या नखांवर आणि पायाच्या नखांवर देखील दिसतात. या संक्रमणांमुळे प्रभावित भागात जास्त खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज येणे दिसून येतात. 

वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे दरवर्षी ही संख्या वाढतच आहे. वाढती उष्णता आणि दमट हवामानामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि उष्णतेचे पुरळ वाढतात. अशा दिवसांमध्ये मुलांना सैल सुती कपडे घालावे. घरातील खोल्यांमध्ये थंडावा राहील याची काळजी घ्या. उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्राचा वापर करु शकतात.  दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणे टाळा. मुलांनाही सनस्क्रीन वापरा. घराबाहेर पडण्यापूर्वी 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन न लावल्यास किंवा योग्य खबरदारी न घेतल्यास संवेदनशील त्वचा भाजण्याची शक्यता असते.

हायड्रेट होणे महत्त्वाचे 

डिहायड्रेशन आणि उष्माघाताची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. मुलांना वारंवार पाणी पाजून ते हायड्रेटेड राहते याची खात्री करा. तसेच मुलांना रोजच्या आहारात रसदार फळांचा समावेश करा. गॅस्ट्रोएन्टेरिटिस सारख्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी देत ​​असल्याची खात्री करा. उघड्या नळांचे किंवा अस्वच्छ स्त्रोतांचे पाणी टाळा देणे टाळा अशी प्रतिक्रिया  डॉ. तुषार पारीख, नवजात शिशू आणि बालरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, पुणे यांनी सांगितले. बुरशीजन्य त्वचेचे संक्रमण तुमच्या शरीरावर कुठेही दिसू शकते. सामान्यतः दिसणारी टिनिया व्हर्सीकलर ही अशी स्थिती आहे ज्यामुळे त्वचेवर फिकट किंवा गडद ठिपके आढळून येतात. हे त्वचेवरील बुरशीमुळे होते जे वेळीच नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. योनिमार्गातील यीस्टचा संसर्गाने योनीमार्गात जळजळ होते असल्याची माहिती  डॉ. प्रदीप अलाटे, बालरोगतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा पुणे यांनी दिली.

डॉक्टरांनी सुचवलेली औषधे, क्रीम किंवा लोशन वापरा आणि स्टिरॉइडयुक्त क्रीमचा वापर टाळा. डॉक्टरांनी दिलेला औषधांचा कोर्स पूर्ण करा, दररोज कपडे आणि अंतर्वस्त्र स्वच्छ धुवुन वापरा.  योग्य वैयक्तिक स्वच्छता राखा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर अँटीफंगल साबण आणि पावडर वापरा. शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात संसर्ग पसरू नये म्हणून हात स्वच्छ धुवा. एकमेकांचे टॉवेल किंवा कपडे वापरु नका कारण ते बुरशी संसर्ग पसरवू शकतात. दररोज मोजे बदला जेणेकरुन पायांचा संसर्ग होणार नाही डॉ. पारीख यांनी ठळकपणे सांगितले.

काय करू नये 

हे सर्व डॉ. अलाटे यांनी स्पष्ट केले असून तुम्हाला सर्वांना जास्तीत जास्त काळजी घेण्याचा, हायड्रेट राहण्याचा सल्लाही दिला आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य