मनोरंजन

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी येणार का नवा पाहुणा

Leenal Gawade  |  Apr 4, 2022
अंकिता लोखंडे होणार आई

मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच आई होणार अशी बातमी एका कार्यक्रमातून दिली आहे. काहीच महिन्यांपूर्वी तिने विकी जैनसोबत मोठ्या थाटामाटात लग्न केले. तिचे लग्न हे यंदाच्या वर्षातील सगळ्यात जास्त चर्चेत असलेले असे लग्न होते. या लग्नाचा थाट इतका होता की, आजही तिच्या लग्नातील कपड्यांपासून ते तिच्या पाहुण्यांच्या संख्येपर्यंत सगळ्याची चर्चा होते. नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा लग्न केले. पण आता त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार अशी गोड बातमी कळल्यापासून हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता नेमकं अंकिता आई होणार आहे का? हे जाणून घेऊया.

अंकिताने केला खुलासा

 अंकिताने लग्नानंतर अनेक रिॲलिटी शोजना हजेरी लावली आहे. तिने नुकतेच कंगनाच्या लॉकअप या रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली. या शोदरम्यानचा एक व्हिडिओ वायरल होताना दिसत आहे. आपल्या पवित्र रिश्ता 2 चे प्रमोशन करण्यासाठी गेलेल्या अंकिताने या दरम्यान आपले एक सिक्रेट सगळ्यांना सांगितले आहे. आता प्रोमोमध्ये सिक्रेट काय हे कळत नाही. पण तिने यामध्ये आई होणार असल्याचा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर तिने यामध्ये ही गोष्ट तिच्या नवऱ्यालाही अद्याप माहीत नसल्याचे देखील सांगितले आहे. आता ही गोष्ट तिच्या प्रेग्नंसीची आहे असे सांगितले जात आहे. पण त्याचा अद्याप खुलासा झालेला नाही. पण तरीही ती आई होणार ही गोष्ट तिच्या फॅन्ससाठी सुखावणारी आहे.

मस्करी की खरंच होणार आई

अनेकदा अशा रिॲलिटी शोजमध्ये मसाला आणण्यासाठी अशाच काही गोष्टींचा उपयोग प्रोमो म्हणून केला जातो. पण यावर कोणताही शिक्कामोर्तब दोघांकडूनही करण्यात आलेला नाही. शिवाय सेलिब्रिटी कधीही अशी बातमी इतक्या लवकर सांगत नाही. त्यामुळे ही कदाचित प्रेग्नंसीची बातमी नसावी अन्य काहीतरी असावे असा अंदाज व्यक्त  केला जात आहे. पण तरीही तिच्या फॅन्सना याची प्रतिक्षा आहे.

राजेशाही थाटात केले लग्न

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतपासून वेगळी झाल्यापासून ती फार चर्चेत नव्हती. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली. त्याच्या तपासासाठी तिने सोशल मीडियावर मोहीम राबवली. तिचा एक्स असूनदेखील तिने एक चांगला मित्र आणि सहकलाकार म्हणून त्याची बाजू सोशल मीडियावर चांगलीच उचलून धरली. इतकेच नाही तर तिचा नवरा विकी जैन याने देखील तिला या काळात खूप मानसिक मदत केली आणि पाठिंबा दिला. त्यामुळे या दोघांची जोडी आणि समजूतदारपणा खूप जणांना भावला. त्यांच्या लग्नाचा थाट तर पाहण्यासारखा होता. एखादे स्वप्नवत लग्न व्हावे असे त्या दोघांचे लग्न झाले. लग्नाला अनेक मोठ्या लोकांनी हजेरी लावली होती. 

भारती झाली आई

दरम्यान, लाफ्टरक्वीन भारती रविवारी आई झाली आहे. हर्ष लिंबाचियाने ही गोड बातमी शेअर केली असून तिला पूत्ररत्न झाले आहे. भारती आई होणार ही बातमी काही महिन्यांपूर्वी कळली होती. अगदी शेवटच्या काळापर्यंत ती काम करत होती. तिने तिची प्रेग्नंसी चांगलीच एन्जॉय केली होती. 

आता अंकिता ही बातमी कधी देईल याची प्रतिक्षा सगळ्यांनाच असेल. 

Read More From मनोरंजन