बॉलीवूड

ईशान खट्टर साकारणार मेजर ध्यानचंद, त्यासाठी घेणार अत्यंत कठीण ट्रेनिंग

Vaidehi Raje  |  Apr 7, 2022
dhyan chand biopic

दोन वर्षांपूर्वी, निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी हॉकी लिजण्ड मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांपैकी एकाची अधिकृत घोषणा केली होती. अभिषेक चौबे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच अनन्या पांडे बरोबरच्या तीन वर्षांच्या नात्यातून विभक्त झाल्यामुळे धडक फेम अभिनेता ईशान खट्टर सध्या चर्चेत होता. माजिद माजिदीच्या बियॉन्ड द क्लाउड्समधून पदार्पण करणारा ईशान मेजर ध्यानचंद यांची भूमिका पडद्यावर साकारणार आहे. 

वर्षाच्या अखेरीस सुरु होणार चित्रीकरण 

नुकतेच या चित्रपटासंदर्भात काही अपडेट आले आहेत. पिंकविलाच्या नवीन रिपोर्टनुसार, हा चित्रपट नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये फ्लोअरवर जाईल. “चित्रपटनिर्माते लवकरच शूटिंगसाठी काही तारखा निश्चित करतील. अभिषेक सध्या त्याच्या सुरु असणाऱ्या प्रोजेक्टचे काम आधी पूर्ण करेल आणि मग या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनला सुरुवात करेल,” असा रिपोर्ट पिंकविलानी दिला आहे.अभिषेक चौबे सध्या कोंकणा सेन शर्मा आणि मनोज बाजपेयी यांच्या सूप या चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहेत. मेजर ध्यानचंद यांच्या बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी काही महिने आधीपासूनच ईशान या भूमिकेसाठी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करणार आहे.त्याचे हे ट्रेनिंग अत्यंत कठीण असणार आहे. सध्या या चित्रपटाच्या अंतिम स्क्रिप्टवर काम सुरू आहे. इंडस्ट्रीत अशी चर्चा सुरु आहे की ध्यानचंद बायोपिक या वर्षाच्या अखेरीस फ्लोरवर जाण्यासाठी सज्ज आहे आणि ईशानला या भूमिकेसाठी कठोर प्रशिक्षण दिले जाईल. 

Major Dhyan Chand

सूत्रांच्या मते  नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये चित्रपटाची टीम शूटिंगला सुरूवात करेल.  1500+ गोल, 3 ऑलिम्पिक सुवर्णपदके, भारताच्या अभिमानाची आणि ध्येय गाठण्यासाठी मेजर ध्यानचंद यांनी केलेल्या संघर्षाची कथा या चित्रपटात बघायला मिळेल. मेजर ध्यानचंद यांना फील्ड हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक मानले जाते आणि हॉकीचा पहिला सुपरस्टार म्हणून गौरवले जाते. 1928 ऍमस्टरडॅम ऑलिम्पिक, 1932 लॉस एंजेलिस ऑलिंपिक आणि 1936 बर्लिन ऑलिंपिकमध्ये भारताने हॉकीमध्ये सलग तीन ऑलिंपिक सुवर्णपदके जिंकण्यामागे मेजर ध्यानचंद यांचे मोठे योगदान होते.  मेजर ध्यानचंद हे त्यांच्या अविश्वसनीय ड्रिब्लिंग आणि स्कोअरिंग कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. आता या बायोपिकच्या निमित्ताने नव्या पिढीलाही त्यांच्याबद्दल माहिती होईल. 

ईशानने यापूर्वीही अनेक वेगळ्या विषयांवरील चित्रपटांत केले काम 

Ishaan Khattar

धडक मधून घराघरांत पोहोचलेल्या ईशानची ओळख केवळ धडक पुरतीच मर्यादित नाही. शाहिद कपूरचा धाकटा भाऊ यालीकडेही ईशानची एक स्वतःची वेगळी ओळख आहे. त्याने यापूर्वीही अभिषेक चौबे यांच्याबरोबर काम केले आहे. त्याने उडता पंजाब या चित्रपटासाठी अभिषेक चौबे यांचा सहाय्यक म्हणून काम केले होते. या चित्रपटात ईशानचा मोठा भाऊ शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत झळकला होता. या व्यतिरीक्त ईशान मागच्या वर्षी ऍडम मॅकेच्या डोंट लुक अप या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत झळकला होता. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो, जेनिफर लॉरेन्स,  मेरील स्ट्रीप आणि टिमोथी चालमेट यांसारखे हॉलिवूडमधील दिग्गज कलाकार होते. 

सध्या ईशान रॉनी स्क्रूवाला यांच्यासोबत पिप्पा नावाचा आणखी एक चित्रपट करत आहे. या चित्रपटात ईशान बरोबर मृणाल ठाकूर आणि प्रियांशू पैन्युली देखील आहेत. तसेच ईशान कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत गुरमीत सिंगच्या फोन भूत या चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड