मनोरंजन

जान्हवी कपूरला नाही व्हायचं आई श्रीदेवीसारखं सुपरस्टार

Leenal Gawade  |  Jan 15, 2020
जान्हवी कपूरला नाही व्हायचं आई श्रीदेवीसारखं सुपरस्टार

सुपरस्टार श्री देवी यांची मुलगी जान्हवी कपूर आईच्या पावलावर पावलं ठेवत हिंदी चित्रपटसृष्टीत आली. आईप्रमाणेच सुंदर असलेली जान्हवी भविष्यात इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार म्हणून नावारुपाला येईल अशी चर्चा होती. पण तिचा पहिलाच चित्रपट आणि तिचा अभिनय पाहता तिची आईशी होणारी तुलना आपसुकच कमी झाली. श्री देवी आणि जान्हवी यांची सतत तुलना केली जाते. पण आईप्रमाणे मला सुपरस्टार व्हायचे नाही असे जान्हवी कपूरने एका मुलाखतीत म्हटले आहे. पण या मागेही काही कारणं असल्याचे तिने सांगितले आहे. जाणून घेऊया नेमकं जान्हवी कपूरला आईसारखं सुपरस्टार का व्हायचं नाही ते.

2020 मध्ये ट्विटरवर या अभिनेत्रींचं वर्चस्व

मी तिथे पोहचू शकत नाही

एका मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूर म्हणाली की, श्री देवींचा एक चाहता वर्ग आहे. त्यांनी उत्तम अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. मी त्यांची मुलगी असले तरी मी वेगळी आहे. माझ्यामध्ये माझ्या आईप्रमाणे मेहनत आणि अभिनयाचे गुण आले असले तरी मला त्यांच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ आहे. त्यामुळे मला आता या घडीला सुपरस्टार होण्याचे वेध नाहीत तर मला आता काम करायचे आहे. मला माझ्या कामांकडे अधिक लक्ष द्यायचे आहे.

अभिनयाची चुणूक दाखवण्यात अपयशी

मराठीतील सैराट या चित्रपटाचा रिमेक ‘धडक’ या करण जोहर निर्मित चित्रपटातून जान्हवी कपूरने पदार्पण केलं. मोठा चित्रपट, मोठा बॅनर असूनही जान्हवीचे सौंदर्य पाहताना तिचा अभिनय तितकासा खुलून आला असे अजिबात वाटले नाही. उलट त्या चित्रपटातून तिच्यावर टीकाच जास्त झाली. नुकतीच ती ‘घोस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सवरील सिरिजमध्ये दिसली पण त्यातही तिचा अभिनय इतका काही चांगला होता असे म्हणता येणार नाही. तिच्या अभिनयात जिवंतपणा नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच तिला प्रेक्षकांची म्हणावी तशी पसंती मिळालेली नाही. 

‘कसौटी’ची प्रेरणाही अडकणार लवकरच विवाहबंधनात, एरिका फर्नांडिसचे शेअर केली पोस्ट

सध्या 6 चित्रपटांमध्ये करत आहे काम

Instagram

अभिनयाच्या बाबतीत जान्हवी फार चांगली नसली तरी सध्या तिच्या खात्यात अनेक चांगले चित्रपट आहे. करण जोहरच्या ‘तख्त’, ‘दोस्ताना 2’, ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय तिच्या हातात अजून तीन चित्रपट आहेत. ज्यात ती मोठ्या स्टारकास्टसोबत काम करताना दिसणार आहे. 

सारा आणि जान्हवीची होते तुलना

सारा अली खान म्हणजे सैफ अली खानची मुलगी आणि जान्हवी कपूर म्हणजे साक्षात श्री देवी यांची मुलगी.. जान्हवी चित्रपटात येण्याआधी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले. तर सारा अली खानने तिच्या केदारनाथ या पहिल्या चित्रपटात अभिनयाची चुणूक दाखवली. वयाने दोघी सारख्या असूनही अभिनयाच्या बाबतीत सारा काकणभर चांगली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा वाद सतत होत असतो. 

आता राहिला प्रश्न जान्हवी सुपरस्टार होण्याचा तर अजून ती त्या पदापासून फारच लांब आहे. तिला चित्रपटांसाठी खूप मेहनत घ्यायची आहे.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From मनोरंजन