रोज रोज त्याच मालिका पाहून कंटाळला असाल तर तुमच्या भेटीला एक नवी मालिका येणार आहे. प्रेमाचा रंग बहरवणारी ही मालिका म्हणजे ‘जिवलगा’. मराठीमध्ये फारच कमी वेळा लिमिटेड एपिसोड स्वरुपात अशा मालिका येतात. त्यापैकीच एक म्हणजे जिवलगा. अमृता खानविलकर, स्वप्निल जोशी, मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यातील प्रेमाची ही थोडी वेगळी कहाणी प्रेक्षकांना या निमित्ताने पाहायला मिळाली. पण आता पुन्हा एकदा या मालिकेचा आनंद घरबसल्या सगळ्यांना घेता येणार आहे. स्टार प्रवाह या वाहिनीने प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी अभिनेत्री अडकतेय विवाहबंधनात, लग्नविधीला सुरूवात
शूटिंग झाले ठप्प
‘जिवलगा’ ही मालिका येऊन आता दोन वर्ष होऊन गेली आहे. पण तरीही ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली आहे. या मालिकेचा शेवट झाल्यानंतर अनेकांना चुटपुटले होते. आता या लॉकडाऊनच्या काळात अनेक मराठी मालिकांचे शूटिंग थांबले आहे. महाराष्ट्रात तर पूर्णपणे शूटिंग बंद केल्यामुळे अनेक मालिका ठप्प झाल्या आहेत. अशामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन हे मुळीच थांबायला नको. यासाठीच लोकाग्रहास्तव ही मालिका पुन्हा एकदा दाखवण्याचा निर्णय मालिकेकडून घेण्यात आला आहे. ही मालिका 2 मे पासून पुन्हा एकदा सुरु होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मालिका पाहिली नसेल तर अनोख्या प्रेमासाठी तुम्ही नक्कीच ही मालिका पाहायला हवी.
मालिकांना बसतोय फटका
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचा फटका हा मालिकांना बसू लागला आहे. मालिकांच्या शूटिंगला आधी थोड्या फार प्रमाणात परवानगी देण्यात आली होती. पण आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या सगळ्या मालिकांचे शूटिंग बंद झाल्यामुळे अनेकांनी यातून सावरण्यासाठी मालिकांचे सेट हे महाराष्ट्राबाहेर नेण्यात आले आहेत. अनेक मराठी मालिकांनी यावर तोडगा काढून गोवा, कर्नाटक या ठिकाणी आपल्या मालिकांचे सेट हलवले आहे. त्यामुळे अविरत मनोरंजन करण्यासाठी त्यांनी हे विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे अनेक मालिकांचे सेट हे आता बदलेले दिसत आहेत.
प्रतिक बब्बर झाला भावुक, ह्रदयावर कोरला स्मिता पाटीलचा टॅटू
मालिकांच्या ट्रॅकमध्ये बदल
अनेक नियमांमुळे ज्याप्रमाणे मालिकांचे सेट बदलण्यात आले आहेत. अगदी त्याचप्रमाणे मालिकांनी सुरु असलेला आपला ट्रॅकही बदलेला आहे. मूळ ट्रॅकला सोडून खूप मालिकांनी बगल देत मालिकांमध्ये अनेक बदल केलेले जाणवत आहेत. पण तरीही मनोरंजन थांबायला नको यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यावेळी पहिल्यांदा कोरोनाची लाट आली त्यावेळी मालिकांना परवानगी दिल्यानंतर अनेकांनी ऑनलाईन पद्धतीने सेलिब्रिटींचे इंटरव्हयू घेतले. इतकेच नाही तर अनेक मालिका या ऑनलान- ऑनलाईन या पद्धतीने शूट करण्यात आले आहेत.
लॉकडाऊन वाढला
1 मे पासून पुन्हा सगळे सुरळीत होईल अशी अपेक्षा सगळ्यांना होती पण असे काही झालेले दिसत नाही. कारण आता लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे काही काळ ही परिस्थिती अशीच राहणार असे दिसत आहे.
सध्या तुम्ही तरी ‘जिवलगा’ मालिकेचा आनंद घ्या.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade