पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ स्टार जॉनी डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड यांच्यातील हाय-प्रोफाइल मानहानीच्या खटल्यात ज्युरीने बुधवारी निकाल दिला. हा निकाल जॉनी डेपच्या बाजूने देण्यात आला आहे. सात सदस्यीय व्हर्जिनिया ज्युरीला असे आढळून आले की अभिनेत्री अंबर हर्डने तिचा माजी पती जॉनी डेप विरुद्ध गैरवर्तनाचे बदनामीकारक दावे केले होते, ज्याच्या बदल्यात तिला $15 दशलक्ष नुकसान भरपाई देण्यात आली होती.
जॉनी आणि अंबर असे आले एकत्र
2009 मध्ये एका चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर दोघांनीही आपापल्या पार्टनरपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दोघांनी 2011 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर जॉनी आणि अंबरने 2015 मध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. लग्नानंतर एकाच वर्षात 2016 मध्ये जॉनी आणि अंबरमध्ये भांडण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्या वर्षी मे महिन्यात अंबर तिच्या चेहऱ्यावर जखम घेऊन कोर्टात पोहोचली आणि डेपला तिच्यापासून दूर राहण्याचे आदेश देण्याची विनंती कोर्टाला केली. अंबरने दावा केला होता की जॉनीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता आणि डेपने रागाच्या भरात फोन तिच्या चेहऱ्यावर फेकला होता आणि तिच्या चेहऱ्याला झालेल्या दुखापतीचे स्पष्टीकरण दिले होते. पण जॉनीच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावत अंबरने आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप केला आहे.
शेवटी घटस्फोट झाला
या प्रकरणानंतर दोघांनी एकत्रितपणे वेगळे होण्याची घोषणा केली. 2017 मध्ये दोघांमधील घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली. अंबर हर्डला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून जॉनी डेपकडून $7 दशलक्ष मिळाले, जे तिने चिल्ड्रन्स हॉस्पिटलला दान केल्याचा दावा केला. जॉनी डेपपासून विभक्त झाल्यानंतर एका वर्षानंतर, अंबर हर्डने वॉशिंग्टन पोस्टमध्ये घरगुती हिंसाचार आणि स्त्रियांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करणारा लेख लिहिला. यामध्ये अंबरने जॉनीचे नाव न लिहिता सांगितले की, महिलांना त्रास देणारे लोक कसे वाचतात. जगाने याचा संबंध जॉनीशी जोडला ज्याचा फटका त्याला सहन करावा लागला. या वादानंतर डिस्नेने जॉनीला ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ या बहुचर्चित चित्रपटातून काढून टाकण्याची घोषणा केली.
जॉनी डेपने मानहानीचा खटला दाखल केला
वॉशिंग्टन पोस्टमध्ये 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या या लेखासाठी जॉनीने अंबर हर्डविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. जॉनीच्या वकिलाने दाखल केलेल्या याचिकेत दावा करण्यात आला आहे की, अंबर स्वत:साठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी खोटे आरोप करत आहे, ही फसवणूक आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाने जगभर मथळे निर्माण केले. न्यायालयीन खटल्यांदरम्यान, अंबरने साक्ष दिली की डेप तिला मारहाण करत असे. एवढेच नाही तर तिने डेपवर घरगुती हिंसाचार तसेच लैंगिक हिंसाचाराचे आरोप केले. हे आरोप खोटे सिद्ध झाले. डेपनेही हर्डवर अनेक गंभीर आरोप केले. खरं तर जॉनीलाच अंबरकडून शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला हे सत्य पुढे आले.
अखेर जॉनी जिंकला
जॉनी डेपने या दीर्घकाळ चाललेल्या हाय-प्रोफाइल कायदेशीर लढाईत विजय मिळवला आहे. या कायदेशीर लढाईत एकामागून एक अनेक धक्कादायक खुलासे झाले. ज्युरीने अंबर हर्डला मानहानीसाठी दोषी ठरवले आणि ती जॉनी डेपची बदनामी करत असल्याचा निर्णय दिला. यासोबतच अंबरला जॉनीला 15 मिलियन डॉलर नुकसानभरपाई देण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे, ज्युरीने डेपला मानहानीच्या काही प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आणि त्याला अंबर हर्डला $2 दशलक्ष नुकसान भरपाई देण्यास सांगितले. निकाल त्याच्या बाजूने आल्यानंतर डेपने आनंद व्यक्त केला आणि म्हटले की ज्युरीने माझे जीवन मला परत दिले आहे. सत्याचा कधीही पराभव होत नाही. माझे नवीन आयुष्य सुरू होणार आहे. निकाल काहीही लागला असता, पण सत्य समोर आणणे हा या खटल्याचा उद्देश होता आणि त्यामुळेच मला लढण्याचे बळ मिळाले.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade