आरोग्य

 सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी ज्युस घेता, एकदा वाचा

Leenal Gawade  |  Aug 9, 2022
फळांचे ज्युस उपाशी पोटी घेताय

  खूप जणांना आपला आहार हा कायम हेल्दी असावा अस वाटते. हेल्दी आहार असणे हे आरोग्यासाठी चांगलेच आहे हे काही नव्याने सांगायला नको. पण हेल्दी अशा गोष्टींचा आहारात समावेश करताना कध कधी आपण अशा काही चुका करतो की, त्याचे आपल्या शरीरावर विपरित असे परिणाम होऊ लागतात. खाण्याच्या या सवयी कितीही चांगल्या वाटत असल्या तरी देखील त्या शरीरासाठी अपायकारक आहेत. यापैकीच एक सवय म्हणजे सकाळी उठल्यावर ज्युस म्हणजेच फळांचा रस घेणे. खरंतरं फळांचा रस हा आरोग्यासाठी खूपच चांगला मानला जातो. असे असताना सकाळी उपाशी पोटी ज्युस (Fruit Juice) घेणे आरोग्यासाठी वाईट का? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

ज्युस असतो आरोग्यासाठी चांगला

खूप जणांना सकाळच्या वेळी चांगल्या गोष्टी घेण्याची सवय असते. त्यापैकी एक म्हणजे फळांचे रस. ज्यांना फळ खायचा कंटाळा असतो अशांसाठी फळांचा रस हा पुरेसा असतो. म्हणून अनेक जण ज्युस पितात. आपण खूप जाहिरातींमध्ये किंवा मालिकांमध्ये डायनिंग टेबलवर नाश्ता करताना आपण त्यांना ज्युस पिताना पाहतो. त्यामुळे ज्युस हा हेल्दी नाश्ताचा प्रकार आहे हे आपल्याला वाटते. पण फळांचा रस कधी प्यायला हवा हे देखील माहीत असायला हवे. योग्यवेळी रस घेतला तर त्याचा शरीराला नक्कीच फायदा होतो. पण चुकीच्या वेळी शरीरात रस गेला तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी संभावतात. 

सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी ज्युस घेतल्यामुळे काय होते?

फळांचे ज्युस

आता तुम्ही विचार करत असाल सकाळी उठून ज्युस घेतल्यामुळे तुम्हाला नेमकं होतं तरी काय?

  1. प्रत्येक फळामध्ये काही ना काही ॲसिड असतात. मुळात सकाळी उठल्यानंतर आपले पोट रिकामी असते. त्यामुळे हे ॲसिड काही जणांच्या शरीरात रिॲक्ट करु लागतात. त्यामुळे अशावेळी खूप जणांना ॲसिडीटीचा त्रास होऊ लागते.  
  2. अनेक ज्युस हे डिटॉक्स करणारे असतात. जसं की, खूप जण फळ आणि गाजर- बीट असा मिक्स ज्युस करुन पितात त्यामुळे होते असे की, यातील काही घटक तुमचे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करत असतात. जर तुम्ही उपाशी पोटी असे रस घेतला तर त्यामुळे काही काळासाठी तुम्हाला डोके जड झाल्यासारखे वाटेल. खूप जणांना भोवळ आल्यासारखीही होते. त्यामुळे असा ज्युस पिऊन तुम्ही लगेचच प्रवास करु शकत नाही. 
  3. ज्युस किंवा फळांचे रस हे पोटाच्या आरोग्यासाठी कितीही चांगले असले तरी देखील त्यांचे सेवन चुकीच्या वेळी झाले तर त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो. खूप जणांच्या पोटात असा रस घेतल्यानंतर जळजळ होऊ लागते. पण पोट साफ होत नाही अशा तक्रारीदेखील दिसून आलेल्या आहेत. 
  4. ज्यांना पोटाचे विकार अगदी पटकन होतात अशांसाठीही उपाशी पोटी ज्युस पिणे चांगले नाही. कारण अशा लोकांना अगदी पटकन ज्युस घेतल्यानंतर पोटदुखीचा त्रास होतो. खूप जणांचे ओटीपोट चांगलेच दुखून येते.

आता जर ज्युस घ्यायचा असेल तर तो तुम्हाला योग्यवेळी घेता आला पाहिजे. ज्युस घेण्याची योग्यवेळी ही नाश्त्यानंतर आहे. शिवाय रात्री झोपतानाही तुम्ही तो घेणे चांगले नाहीच.

Read More From आरोग्य