हिंदी चित्रपटसृष्टीत जेव्हाही एखादा चित्रपट बनतो तेव्हा त्याच्या शीर्षकाबद्दल वेगवेगळे प्रयोग केले जातात. सलमान खानच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याची नावे सतत बदलत असतात. सलमान खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. या ईदला भाईजानचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. आता प्रतीक्षा आहे ती सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाची, ज्याला भरपूर लाइमलाइट मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान त्याच्या ‘कभी ईद कभी दिवाली’’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉलिवूडच्या भाईजानचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अलीकडेच सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाचे नाव पुन्हा एकदा बदलण्यात आल्याचे वृत्त आहे. सलमान खानच्या या चित्रपटाला पुन्हा आधीचेच नाव देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे नाव बदलण्याचा सलमान आधीच विचार करत होता.
आता ‘भाईजान’ म्हणून प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’चे शूटिंग नुकतेच सुरू झाले आहे. शूटिंग सुरू झाल्यापासून कधी चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये तर कधी शूटिंग शेड्यूलमध्ये बदल केले जात आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत होणाऱ्या चर्चेनुसार आणि सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान त्याच्या चित्रपटाचे नाव बदलून भाईजान ठेवण्याचा विचार करत आहे. या चित्रपटाचे नाव आधी भाईजान असेच ठरले होते परंतु काही महिन्यांपूर्वी त्याचे नाव बदलून ‘कभी ईद कभी दिवाली’ असे ठेवण्यात आले होते. चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवालाकडून सलमान खानकडे गेल्यापासूनच चित्रपटाचे नाव बदलण्याची योजना आखली जात असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे नाव बदलण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
चित्रपटाच्या कास्टिंगमध्येही झाले बदल
सलमान खानने या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतल्यापासून चित्रपटामध्ये बदल केले जात आहेत. चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सलमान खानने आधीच मोठा बदल केला आहे.रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने आयुष शर्मा आणि जहिर इक्बाल यांच्याऐवजी आता जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांची चित्रपटासाठी निवड केली आहे. काही क्रिएटिव्ह मतभेदांमुळे आयुषने ‘भाईजान’ सोडला आहे.गेल्या वर्षी सलमान खानने जाहीर केले होते की तो बजरंगी भाईजानचाही सीक्वल बनवणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
धमक्या येत असूनही सलमान हैद्राबादला रवाना
5 जून रोजी धमकीचे पत्र मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या धोक्याच्या वेळी देखील सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच अभिनेता त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार होणाऱ्या ‘भाईजान’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादहून मुंबईला रवाना झाला आहे. हैद्राबादला त्याचे शुटिंगचे 25 दिवसांचे वेळापत्रक आहे.
चित्रपट कधी येणार?
सलमान खान व्यतिरिक्त ‘भाईजान’मध्ये पूजा हेगडे आणि तेलुगू अभिनेता व्यंकटेश दग्गुबती यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.याशिवाय या चित्रपटात राघव जुयाल आणि मालविका शर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पंजाबची कतरिना कैफ शहनाज गिलही सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली ‘मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
हा चित्रपट 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje