मनोरंजन

कंगना पुन्हा बरळली, आता म्हणते ‘नरेंद्र मोदी राजीनामा द्या’

Leenal Gawade  |  Apr 27, 2021
कंगना पुन्हा बरळली, आता म्हणते ‘नरेंद्र मोदी राजीनामा द्या’

बिनधास्त बोल कंगना कधी काय बोलेल? याचा काही नेम नाही. तिच्या अभिनयापेक्षा बिनधास्त आणि बोल्ड स्टेटमेंटमुळेच ती हल्ली जास्त लक्षात राहिली आहे. कधी नेपोटिझमवर शरसंधान कधी पालिकेवर हल्ला अशा गोष्टी ती सतत करत असते. पण आता देशाच्या उच्च पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच तिने टार्गेट केले आहे.मोदींकडून तिने राजीनाम्याची मागणी केली आहे. पण ही राजीनाम्याची मागणी तिने का केली? याचे कारण जाणून घेणे फारच गरजेचे आहे. कारण तिने केलेल्या या ट्विटनंतर सगळ्या ट्रोलर्सनी तिला चांगलचं झापलं आहे. जाणून घेऊया कंगनाचा हा नवा पराक्रम

माझा होशील ना’ मालिकेत कोरोनामुळे वळण, सिंधू वहिनीभोवती फिरतेय मालिका

केलं ट्विट आणि सुरु झाली टिवटिवाट

देशात सध्या कोरोनाजन्य परिस्थिती असताना पुन्हा एकदा राजकारणाने डोकं वर काढलेलं आहे. नवनवी प्रकरण या काळात बाहेर येऊ लागली आहेत. त्यात भर म्हणून की काय कंगनाने एक ट्विट केलं आणि सगळा गदारोळच माजला. तिने तिच्या ट्विटमध्ये चक्क पंतप्रधानांनाचा राजीनामा काय मागितला आणि लोकांनी तिचा चांगलेच झोडपायला घेतले. पण असे का झाले? तर कंगनाने केलेले ट्विट पुढील प्रमाणे 

 ‘मोदींजींना देशाचे नेतृत्व कसे करायचे माहीत नाही, कंगनाला अभिनय माहीत नाही, सचिनला फलंदाजी माहीत नाही,  लता दीदींना गाणे कसे गायचे माहीत नही.  पण या चिंधी ट्रोलर्सना सगळे काही माहीत आहे. मोदीजी तुम्ही राजीनामा द्या आणि या ट्रोलर्सपैकी एका विष्णू अवताराला पंतप्रधानपदी विराजमन करा’.
खरंतरं कंगनाने हे ट्विट प्रत्यक्ष मोदींजींना राजीनामा ट्विट करण्यासाठी केलेले नाही. तर मोदीजीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या ट्रोलर्ससाठी खास केले आहे हे तर आता सगळ्यांच्या लक्षात आले असेल.

अभिनेत्री मयुरी देशमुखचा दुसऱ्या लग्नाबाबत निर्णय, दिले उत्तर

ट्रोलर्सनीही दिले उत्तर

आता ट्रोलर्सला चिंधी असा शब्द उच्चारल्यानंतर तिला कायम ट्रोल करणाऱ्यांनी अगदी नेहमीप्रमाणे तिला ट्रोल करायला आणि उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. तिचा उल्लेख खूप जणांना चमचेगिरी करणारी असा केला आहे. अनेकांनी तिला इतर कोणाचीही बाजू  घेण्यापेक्षा तू देशासाठी काय केले? असा प्रश्न केला आहे. जो प्रश्न तिला खूपच लोकांनी विचारला आहे.  खूप जणांनी तिला ट्विटरवर येऊन केवळ ट्विट करण्याच्या गोष्टीवरही चांगलेच खडसावले आहे. ज्यामुळेच आता सगळीकडे कंगनाची चर्चा होऊ लागली आहे. 

लॉकडाऊन गाजवला

एकीकडे देशात कडक लॉकडाऊन असताना कंगनाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणे काही थांबवले नाही. कंगनाने जून महिन्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात खूप जणांन चांगलेच फैलावर घेतले होते. नेपोटिझमचा मुद्दा तिने चांगलाच उचलला होता. करण जोहर आणि काही मातब्बर लोकांवर तिने सुशांतच्या आत्महत्याप्रकरणासाठी दोषी ठरवले होते. कंगनाने तेव्हा अनेक व्हिडिओ करत फिल्म इंडस्ड्रीमधील वास्तवसत्य मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गेल्यावर्षी ती चांगलीच लक्षात राहिली. वरचेवर कंगना असे दोन- चार ट्विट करुन कायमच चर्चेत राहते. तिच्या अभिनयावरुन तिला कायम ट्रोल करणाऱ्यांना तर ती यामाध्यमातून चांगलीच चपराक देते. 

तर एकूणच प्रकरण इतके गंभीर नाही. कारण कंगनाने एका वेगळ्या कारणासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. बाकी सगळं सध्या आलंबेल आहे. 

नव्या चित्रपटासाठी मोनालिसा बागलचा Fit & Fine लुक

Read More From मनोरंजन