बॉलीवूड

माझ्यासारखी दुसरी अभिनेत्री मिळणे नाही, कंगनाला प्रशांत भूषणने दिले असे उत्तर

Leenal Gawade  |  Feb 9, 2021
माझ्यासारखी दुसरी अभिनेत्री मिळणे नाही, कंगनाला प्रशांत भूषणने दिले असे उत्तर

देशातील प्रत्येक विषयावर आपली मतं मांडणारी कंगना काही ना काही कारणास्तव कायम चर्चेत असते. नेपोटिझम असो वा बॉलिवूडमधील कोणत्याही गोष्टी त्यावर कंगनाचे उत्तर हे ठरलेले असते. आता कंगना पुन्हा एकदा एका नव्याच गोष्टीमुळे कंगना रणौत चर्चेत आली आहे. कंगनाने यंदा तिच्या इन्स्टा पोस्टवर स्वत:ची इतकी तारीफ केली आहे. ज्यामुळे अनेकांना हसू आवरेनासे झाले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत तिने स्वत:लाच एक उत्तम अभिनेत्री म्हटले. तिच्या ट्विटरवर रिट्विटची झुंबड उडालेली असताना वरिष्ठ वकिल प्रशांत भूषण यांनी मात्र कंगनाची ट्विटरवरुन खिल्ली उडवली आहे. त्यांनीही एक व्हिडिओ पोस्ट करत अशी ‘झाशीची राणी’ अशी टीका केली आहे.

खुषखबर! ‘नागिन’ फेम अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म

चित्रपटातील भूमिकांचा केला व्हिडिओ शेअर

कंगनाने तिच्या इन्स्टावर नुकतीत एक  पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने तिचे ट्रान्सफॉर्मेशन टाकले आहे. थल्लयवी आणि धाकड या चित्रपटासाठी घेतलेली तिची मेहनत तिने दाखवली आहे. थल्लयवी या चित्रपटासाठी तिने वजन वाढवले होते. तर धाकड या चित्रपटासाठी तिने तिचे वजन पुन्हा कमी केले आहे. तिचे हे दोन बिग बजेट चित्रपट हे रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच तिने तिच्या प्रमोशनसाठी हा व्हिडिओ शेअर केला असावा असे दिसत आहे. पण तिने स्वत:ची अशा प्रकारे तारीफ करणे अनेकांना रुचलेले दिसत नाही. कारण तिच्या या व्हिडिओ शेअरींगनंतर  सगळ्या सोशल मीडियावर याचीच चर्चा होऊ लागली आहे.  अनेकांनी कंगनाची टीका केली आहे. 

प्रशांत भूषणने शेअर केला व्हिडिओ

प्रशांत भूषण यांनी कंगना रणौतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो कंगनाने ट्विट केल्यानंतर प्रशांत भूषण यांनी केला आहे. यामध्ये कंगना ही एका खोट्या घोड्यावर बसून घोडस्वारी करताना दिसत आहे. यावर त्यांनी अशी उत्तम अभिनेत्री अशी टीका प्रशांत भूषण यांनी केली आहे.कंगनाच्या फॅन्सनी प्रशांत भूषण यांच्यावर टीका केली आहे. पण कंगनाही गप्प राहणारी नाही कारण तिने प्रशांत भूषण यांनाही सडेतोड उत्तर दिले आहे. 

बागी 4 मध्ये टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत सारा अली खान

कंगना रणौतने दिले उत्तर

कंगनाने खोट्या घोड्यावर घोडस्वारी केली हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असला तरी देखील तिने आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत खऱ्या घोडस्वारीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.  ज्यामध्ये ती खऱ्या घोड्यावर घोडस्वारी करताना दिसत आहे. झाशीची राणी या चित्रपटासाठी तिने बरीच मेहनत घेतली होती. याचे व्हिडिओ तिने पोस्ट केले आहेत. जे पाहून तिने प्रशांत भूषण यांना अगदी योग्य उत्तर दिल्याचे दिसत आहे. 

दुबईत नाही ‘या’ ठिकाणी होणार सलमानच्या टायगर 3 चं शूटिंग

कंगना आणि तिची स्टायलिंग

सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीमधील कंगना ही मोस्ट स्टायलिस्ट अभिनेत्री आहे. तिचे एअरपोर्ट लुक हे फारच प्रसिद्ध असतात. अगदी साडीपासून ते वेस्टर्न अशा सगळ्या आऊटफिटमध्ये ती कायम परफेक्ट दिसते. कुरळे केस आणि उत्तम कपड्यांची निवड ही कंगनाची खरी ओळख आहे असे म्हणायला का

Read More From बॉलीवूड