कॉमेडियन कपिल शर्माचं नुसतं नाव घेतलं तरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होतं. ‘दी कपिल शर्मा’ हा शो पाहताना तर लोकांच्या हसून हसून पोटात दुखायला लागतं. कपिल शर्माचा स्वतःचा एक खास चाहता वर्ग आहे. कपिल शर्माने मागच्या वर्षी त्याची बालमैत्रीण गिन्नीसोबत विवाह केला होता आणि तीन महिन्यापूर्वीच हे दोघंही आईबाबा झाले आहेत. कपिलला अनायरा नावाची गोंडस मुलगी आहे. लॉकडाऊनमुळे घरातच असलेल्या कपिलने दुर्गाष्टमीनिमित्त घरातच त्याची मुलगी अनायराचं कन्यापूजन केलं. सोशल मीडियावर त्याने या प्रसंगाचे काही फोटो शेअर केले आहेत. अनायराच्या क्यूट फोटोजनां सध्या चाहत्यांचे भरपूर लाईक्स मिळत आहेत.
अनायराच्या क्यूट फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सूक
लॉकडाऊनमुळे दुर्गाष्टमीची पूजा करण्यासाठी यंदा कोणालाच घराबाहेर जाता आलेलं नाही. कपिल आणि गिन्नीदेखील सध्या लॉकडाऊनमुळे घरातच आहेत. ज्यामुळे या दोघांनीही घरातच दुर्गाष्टमीची पूजा केली. मात्र त्यांनी यावेळी दुर्गामातेच्या मुर्तीची पूजा न करता त्यांची मुलगी अनायरा हिचीच दुर्गेच्या रूपात पूजा केली. यासाठी त्यांनी त्यांच्या तीन महिन्यांच्या अनायराला पारंपरिक कपडे परिधान केले होते. गुलाबी आणि पिवळ्या रंगातील या गोंडस लेंहग्यामध्ये अनायरा खूपच क्यूट दिसत होती. त्यात या फोटोंमध्ये तिच्या डोक्यावर गुलाबी रंगाचा हेअर बेल्ट आणि त्यावर ओढणी दिली असल्यामुळे ती फारच गोड दिसत आहे. कपिल आणि गिन्नीने अनायराला मॅचिंग बांगड्या गातल्या होत्या आणि टिकलीदेखील लावली होती. त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनायरा मस्त हसत या पूजेचा आनंद घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनायराचे हे गोंडस फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामुळे घरात बसून कपिल शर्माच्या आयुष्यातील हा सुखद अनुभव त्याचे चाहते अनुभवत आहेत. कपिलने या आधीच कॉमेडियन आणि सहकलाकार भारती सिंहसोबत ही गोष्ट शेअर केली होती. त्याने इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून भारतीला सांगितलं होतं की तो या चैत्र नवरात्रीमध्ये त्यांच्या मुलीचं कन्यापूजन करणार आहे. यासाठी कपिलने अष्टमीला त्याच्या मुलीचे पाय धुतले आणि तिची पूजा केली. कपिलने या लाईव्हच्या माध्यमातून सर्व चाहत्यांना आवाहन केलं होतं की त्यांनी देखील लॉकडाऊनच्या काळात पूजेसाठी घराबाहेर पडू नये. घरातच आपल्या मुलीचं पूजन करून दूर्गाष्टमी साजरी करावी.
सामाजिक बांधिलकी जपत कपिलने केली लाखोंची मदत
सध्या सर्वच रोजगार बंद असल्यामुळे दररोज कमवून पोट भरणाऱ्या लोकांचे उत्पन्न पूर्ण बंद झाले आहे. शूटिंग देखील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रोज काम करून पोट भागवणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.. अशा लोकांसाठी बॉलीवूड इंटस्ट्रीमधील अनेक लोक मदतीसाठी धावून आले आहे. कपिल शर्मादेखील यात मुळीच मागे नाही. कपिलने यासाठी प्रधानमंत्री मदत निधीसाठी 50 लाखांची मदत केली आहे. कपिलने त्याच्या इंन्स्टाग्राम पोस्टवर याबाबत चाहत्यांसाठी एक पोस्टदेखील शेअर केली होती. ज्यात त्याने लिहीलं केलं आहे की, ‘ही वेळ आहे अशा लोकांसोबत उभं राहण्याची ज्यांना आज तुमची खरंच गरज आहे. यासाठीच कोरोना व्हायरसच्या विरूद्ध युद्ध लढण्यासाठी मी प्रधानमंत्री मदत निधीसाठी 50 लाखांची देणगी देत आहे. त्यासोबत तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही आपापल्या घरात सुरक्षित राहा’. या कृतीमुळे सर्वांना हसवून लोटपोट करणाऱ्या या कॉमेडीकिंगचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade