मनोरंजन

पुन्हा एकदा कपिल शर्मा शो घेणार प्रेक्षकांचा निरोप

Leenal Gawade  |  Jun 7, 2022
कपिल शर्मा शो

तुम्ही The Kapil Sharma शो चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. प्रेक्षकांना लोटपोट हसवणारी ही मालिका आता बंद होणार आहे. या संदर्भातील ऑफिशिअल घोषणा करण्यात आली असून या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या मालिकेत आतापर्यंत अनेकांना हजेरी लावून चार चाँद लावले आहेत. पण आता ही मालिका बंद होण्यामागे नेमके कारण काय? असा विचार करत असाल तर त्याचे कारण देखील समोर आले आहे. प्रेक्षकांच्या एवढ्या जवळची मालिका नेमकं का निरोप घेणार आहे याचा विचार करत असाल तर नक्की घ्या याची माहिती

या कारणासाठी कपिल शर्मा शो होणार बंद

कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा सर्वात लाडका असा शो आहे. या शोमध्ये येऊन अनेक सेलिब्रिटी त्यांचे चित्रपट या शोमध्ये येऊन प्रमोट करतात. लोकांचे मनोरंजन आणि चित्रपटांची माहिती यामुळे हा शो चांगलाच प्रसिद्ध झाला होता. या शोने मधल्या काळातही ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा हा शो ब्रेक घेणार आहे. म्हणजेच हा शो बंद होणार नाही तर एक ब्रेक घेणार आहे. त्यामुळे आता किती काळासाठी हा शो बंद होणार यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. पण काही काळासाठी तुम्हाला कपिल्सच्या या शोचे जुने एपिसोड पाहावे लागणार आहेत. 

कपिल जाणार दौऱ्यावर

 कपिल शो हा बंद किंवा ब्रेक घेत असला तरी देखील या शोचे कलाकार हे दौऱ्यावर जाणारर असल्याचे कळत आहे. यातील कलाकारा काही खास कार्यक्रम करायला अमेरिकेला जाणार आहेत. त्यामुळे ही टीम तुमच्या भेटीला वेगळ्या रुपात मिळेल. पण ती मजा तुम्हाला मिळेल हे काही सांगता येणार नाही. दरम्यान कपिलचे इन्स्टाग्राम फॉलो करावे लागणार आहे. तरच तुम्हाला कपिलचे अपडेट्स मिळणार आहेत.

कपिल शोने घेतला या दिवशी निरोप

कपिल शर्माचा या सीझनचा शेवटचा एपिसोड हा 5 जून रोजी प्रसारित झाला. आता यानंतर कोणताही एपिसोड शूट केला जाणार नाही. काही काळाचा ब्रेक घेऊन ही मालिका पुन्हा परतणार असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत याचे दोन सीझन येऊन गेले आहेत. सध्या सुरु असलेला तिसरा सीझन सुरु होता. आता या पुढे सीझन येईल अशी अपेक्षा आहे. काही काळासाठी ब्रेक घेऊन काही नव्या स्क्रिप्टसह हा शो सुरु होईल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे.

कपिलच्या कॉमेडी सोबत गाजल्या कॉन्ट्राव्हर्सीज  

कपिल शर्माचा शो पहिला काही काळ चांगला गाजला. पण काही काळानंतर त्याची प्रसिद्धी त्याच्या डोक्यात गेली असे दिसू लागले.मत मांडताना तो भान विसरुन आपली मतं मांडू लागला. शिवाय त्याचा बेशिस्तपणा यामुळेही तो सेलिब्रिटींच्या मनातून उतरुन गेला. त्याचा पहिला सीझन याच काही गोष्टीमुळे बंद झाला होता. पण तरीदेखील कपिल काही सुधारला नाही. त्याने ट्विटरवर काही चुकीच्या कमेंट्स करुन आपल्यावर चुकीच्या कॉन्ट्राव्हर्सीज ओढून घेतल्या त्याचा परिणाम असा झाला की, त्याला काही काळ काम मिळणे बंद देखील झाले. 

कपिलचे पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत. असे असताना एका चांगल्या नोटवर हा सीझन थांबवणे नेहमीच चांगले असे म्हणावे लागेल. 

Read More From मनोरंजन