मनोरंजन

गोऱ्या गोऱ्या गालावरी, चढली लाजेची लाली गं पोरी नवरी आली…असा रंगला हळद सोहळा

Dipali Naphade  |  Dec 11, 2021
katrina-kaif-vicky-kaushal-haldi-ceremony-photos

अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे लग्न म्हणजे कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal). #VicKat ने नुकतेच जोधपूरला लग्न केले. अत्यंत जवळच्या माणसांच्या उपस्थितीत या बॉलीवूडमधील जोडप्याने लग्न करत सर्वांनाच सुखद धक्का दिला. मात्र या जोडप्याचे फोटो पाहण्यासाठी सर्वच आतुर होते. लग्न झाल्यानंतर अधिकृतरित्या कतरिना आणि विकी दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्न केल्याचे सांगत फोटो पोस्ट केले. पण इतर सोहळ्याचे फोटो नक्की कसे असतील याचीही चर्चा रंगली होती. तर आता नुकतेच दोघांनीही आपल्या या आनंदाच्या क्षणांचे फोटो पोस्ट केले असून हे फोटो व्हायरल झाले आहेत. 

#vickatwedding #bigfatwedding

अधिक वाचा – कतरिना-विकीनंतर श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बेडीत, पद्मिनी कोल्हापुरेने दिली हिंट

हळदीचा सोहळा रंगला असा

#vickykatrinakishadi

कतरिता आणि विकी गेले दोन वर्ष एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा अनेक वेळा आल्या होत्या. मात्र दोघांनीही कधीच याबाबत काहीही सांगितले नाही. अचानक यावर्षी 9 डिसेंबरला विकी आणि कतरिनाने लग्न (#vickykatrinakishadi #bigfatwedding) करत सर्वांनाच आश्चर्याचा आणि सुखद धक्का दिला. कतरिना आणि विकीने आता आपल्या हळदीच्या सोहळ्याचे फोटो पोस्ट केले असून हे फोटो व्हायरल होत आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण अत्यंत आनंदाने या सोहळ्यात टिपण्यात आले आहेत. घरच्या माणसांच्या उपस्थितीत कतरिना आणि विकी दोघेही अत्यंत आनंदी असल्याचे दिसून येत आहे. तर विकीचा भाऊ, कतरिच्या सर्व बहिणी आणि भाऊ सर्वच या सोहळ्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. विकीच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंदही लपत नाहीये. या लग्नामध्ये सर्वच हळदीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. कतरिना ही मूळची ब्रिटीश असल्यामुळे तिच्या घरच्यांसाठी हा सोहळा नक्कीच वेगळा असून तिच्या घरच्यांनीही या सोहळ्याचा मनापासून आनंद घेतलेला दिसून आहे. कतरिनाची आईदेखील तितकीच आनंदाने सहभागी झाली आहे. 

vicky kaushal haldi ceremony

अधिक वाचा – रॉयल डेस्टिनेशन वेडिंगनंतर विकी-कतरिना या ठिकाणी जाणार हनिमूनला

कतरिना केला अधिक खर्च 

Katrina Kaif Mehndi and Haldi Ceremony

कतरिना आपल्या वयाच्या 14 व्या वर्षापासून मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे विकीशी लग्न करण्याच्या तिच्या निर्णयावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कतरिना कैफ अत्यंत प्रसिद्ध असून तिच्या तुलनेत अजूनही विकीला तितकेसे यश मिळालेले नाही. मात्र विकीनेदेखील कमी वेळात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अनेक वेबसिरीज आणि चित्रपटांमधून विकी हा #mosteligiblebachlor बनला होता. तर आता कतरिनाशी लग्न केल्यामुळे विकीचे आयुष्यच बदलून गेले असल्याचेही म्हटले जात आहे. इतकंच नाही तर लग्नाचा खर्चही कतरिनाने अधिक केला अशीही चर्चा आता होत आहे. मात्र या दोघांकडे पाहता इतर लोकांच्या कोणत्याही बोलण्याकडे लक्ष न देता हे जोडपे आपल्याच आयुष्यात गुंतले आहेत आणि त्यांचा सुखाचा संसार चालू झाला असल्याचेही आता दिसून येत आहे. हळदीच्या या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून दोघांनाही भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. 

कतरिना आणि विकी दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी POPxo मराठीकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

अधिक वाचा – Year Ender: 2021 मध्ये गाजली या सेलिब्रिटींची लग्ने

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन