मनोरंजन

टीव्ही स्टार प्रणिता पंडित झाली आई, मुलीला दिला जन्म

Leenal Gawade  |  Aug 9, 2020
टीव्ही स्टार प्रणिता पंडित झाली आई, मुलीला दिला जन्म

बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘कसौटा जिंदगी की 2’, ‘कवच’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रणिता पंडित आई झाली आहे. तिने ही आनंदाची बातमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. लग्नाच्या तब्बल 6 वर्षांनी तिच्या घरी नन्ही परी आल्यामुळे तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. तिची ही Good News अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रणिताच नाही तर अनेक स्मॉल स्क्रिनवरील कलाकार या लॉकडाऊनमध्ये आई झाल्या आहेत. आता या यादीमध्ये प्रणिताचे नावही जोडले गेले आहे.

या अभिनेत्री आहेत एकता कपूरच्या सुपरहिट मालिकेतील इच्छाधारी नागिण

 

मुलगी झाली हो!

Instagram

हल्ली प्रत्येक कलाकार आपल्या आयुष्यातील आनंदवार्ता सांगायला सोशल मीडियाचा आधार घेतात. प्रणितानेही तिच्या आयुष्यातील आनंद सोशल मीडियावरुन सांगितला होता. लग्नाच्या सहावर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात हा आनंद येणार म्हटल्यावर ती फारच उत्साहित होती. तिने हा उत्साह तिच्या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. तिने तिच्या इन्स्टास्टोरीवर आनंदाची ही पोस्ट शेअर करत इतके महिने ज्या गोष्टीची प्रतिक्षा होती तो क्षण आला आहे. आमच्या आयुष्यात आनंद आला आहे. असे म्हणत तिने आनंद व्यक्त केला. तिच्या या आनंदात अनेक जण सहभागी झाले आहेत हे तिच्या इन्स्टा स्टोरीवरुन कळत आहे. 

प्रेग्नंसीमध्ये केले हॉट शूट

Instagram

प्रणिताने तिची प्रेग्नंसी चांगलीच एन्जॉय केलेली दिसते. तिने या काळातही हॉट फोटो शूट केले आहे. बेबी बंपमधील तिचे फोटो खूपच सुंदर आहेत. तिने तिच्या प्रेग्नंसीची बातमीही तिच्या फॅन्सपर्यंत पोहोचवली होती. त्यानंतर तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसत जरी असला तरी तिने त्याची तमा न बाळगता आपले फोटो शेअर केले होते. 

अभिनेत्री नसूनही या आहेत बी टाऊनच्या दमदार सेलिब्रिटी

अनेक हिंदी मालिकांमधून काम

प्रणिता हिंदीमधील एक नावाजलेला चेहरा आहे. तिने अनेक मालिकांमधून काम केले आहेय अनेक मोठ्या मालिकांमध्ये असल्यामुळे तिचा फॅनबेसही बराच मोठा आहे. प्रणिता नुकतीच कसौटी आणि काल्पनिक मालिका ‘कवच’ मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता ती नुकतीच आई झाल्यामुळे ती पुढे मालिकेमध्ये कधी दिसेल या बाबतीत कोणताही खुलासा तिने केला नसला तरी पुन्हा एकदा मालिकांमध्ये दिसेल अशी अपेक्षा तिच्या फॅन्सना आहे. 

भोजपुरी अभिनेत्रीने केली आत्महत्या,मरण्यापूर्वी केले फेसबुक लाईव्ह

लॉकडाऊनमध्ये याही झाल्या आई

Instagram

अभिनेत्री प्रणिताच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार या काळात आई- बाबा झाले आहेत. रुसलान मुमताज, अभिनेता सुमीत व्यास, शिखा सिंह, रुचा गुजराती, स्मृती खन्ना, डिंपी गांगुली आणि मानसी शर्मा यांच्या घरीही नवा पाहुणा आला आहे. त्यांनीही त्यांची आनंदवार्ता सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनीही त्यांचा आनंद या काळात सगळ्यांसोबत शेअर केला आहे. 

2020 मध्ये अनेक गोष्टी बिनसल्या असल्या तरी काही जणांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले आहेत ही गोष्टही थोडकी नाही.याचा आनंद आपणही साजरा करायला हवा.

Read More From मनोरंजन