बॉलीवूड

‘खारी बिस्कीट’ला मिळालेला पुरस्कार संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ

Aaditi Datar  |  Feb 3, 2020
‘खारी बिस्कीट’ला मिळालेला पुरस्कार संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ

मराठीत नेहमीच एकापेक्षा एक चांगल्या कथा असलेले सिनेमा येत असतात. त्यातच छोट्या मुलांची भावस्पर्शी कथा सांगणारा 2019 साली आलेला ‘खारी बिस्कीट’ हा सिनेमा सगळ्यांनाच आवडला. खारी बिस्कीट ही कथा होती भाऊ-बहिणीची. आपल्या बहिणीची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करणारा भाऊ काय काय करतो. त्याची ही रंजक कथा आहे. वेदश्री खाडीलकर आणि आदर्श कदम या दोघाही बालकलाकारांनी केलेलं काम, संजय जाधव यांचं दिग्दर्शन आणि कथा यांचा सुंदर मेळ असलेल्या खारी बिस्कीटला आता प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये अवॉर्ड्स मिळत आहेत.

‘खारी बिस्कीट’वर पुरस्कारांचा पाऊस

नुकत्याच झालेल्या सिटी सिने अवॉर्ड्समध्ये खारी बिस्कीटला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संगीत-दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गीतकार आणि सर्वोत्कृष्ट सिनेमा अशा पाच पुरस्कारांनी खारी बिस्कीट चित्रपटाला गौरवण्यात आलं आहे.

Instagram

खारी बिस्कीटच्या गोड जोडीला चांगला प्रतिसाद

दिपक पांडुरंग राणे निर्मित ‘खारी बिस्कीट’ चित्रपटाला ‘सिटी सिने अवॉर्ड्स’मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. बऱ्याच काळानंतर ‘खारी बिस्कीट’ चित्रपटामुळे मराठी सिनेमासाठी ‘हाऊसफुल’चे बोर्ड सर्वत्र झळकले होते. हा सिनेमा कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आणि आता रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ‘खारी बिस्कीट’ सिनेमावर सिनेसृष्टीतील नामांकित पुरस्कार सोहळ्यांमध्ये पुरस्कारांची बरसात होतेय.

2020 च्या प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात खारी बिस्कीट चित्रपट आपली मोहर उमटवताना दिसतोय. ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ पुरस्कार सोहळ्यातही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट गायिका असे चार पुरस्कार खारी बिस्कीटला मिळाले होते. तर सकाळ प्रिमीयर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार. सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट छायांकन असे पाच पुरस्कार खारी बिस्कीट सिनेमाला मिळाले होते.

निर्माते दिपक पांडुरंग राणे यांची प्रतिक्रिया

‘खारी बिस्कीट’ सिनेमाचे निर्माते दिपक पांडुरंग राणे या सिनेमाचा होत असलेला गौरव अनुभवताना भारावून जात म्हणाले की, “सिनेमाला प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये गौरवलं जात आहे. ही माझ्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार हे तर संपूर्ण टीमच्या मेहनतीचं फळं आहे. रसिकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाचंच हे प्रतिक आहे. सिनेमागृहांच्या बाहेर लागलेल्या हाऊसफुलच्या बोर्ड्सनंतर आता नामांकित पुरस्कार सोहळ्यांमधूनही आमची पाठ थोपटली जातेय. त्यासाठी मी रसिक प्रेक्षकांचा खूप आभारी आणि ऋणी आहे. अशा पुरस्कांमुळे काम करण्याची एक नवीन उर्जा येते.”

प्रेमाने जे मिळतं ते कायम टिकून राहतं. हा या चित्रपटातला डायलॉग अगदी तंतोतंत खरा होत आहे.

दिग्दर्शक संजय जाधव यांचं ‘लकी’ फॅक्टरबाबतचं ‘एक्स्क्लुझिव्ह’ कन्फेशन

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

Read More From बॉलीवूड