मनोरंजन

Khatron Ke Khiladi 12: ग्रँड प्रिमियर होणार लवकरच, प्रोमोला झाली सुरूवात

Dipali Naphade  |  Jun 14, 2022
khatron-ke-khiladi-12-promo-video-out-sriti-jha-tushar-kalia-shivangi-joshi-in-marathi

बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अॅक्शन मास्टर रोहित शेट्टी (Rohit Shetty) पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ‘खतरों के खिलाडी 12’ (Khatron Ke Khiladi 12) अर्थात बारावा सीझन घेऊन तयार आहे. सध्या या सीझनच्या चित्रीकरणाला दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन (South Africa Cape Town) येथे सुरूवात झाली आहे. तर या सीझनमध्ये रूबिना दिलैक (Rubina Dilaik), शिवांगी जोशी (Shivangi Joshi), प्रतिक सहजपाल (Pratik Sehejpal), मोहित मलिक (Mohit Malik) निशांत भट (Nishant Bhat), फैजल शेख (Faisal Shaikh), तुषार कालिया (Tushar Kalia), कनिका मान (Kanika Maan), श्रीती झा (Sriti Zha) यांनी सहभाग घेतला आहे. हा सेलिब्रिंटीचा शो असून हे सर्वच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत आणि आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सध्या फोटो शेअर करताना दिसून येत आहेत. इतकंच नाही तर आता रोहित शेट्टीच्या या कायम नंबर 1 असणाऱ्या शो च्या प्रोमोलादेखील सुरूवात झाली आहे.   

2 जुलैपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

सध्या खतरों के खिलाडी 12 चे अनेक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला सोशल मीडियावरही येत आहेत. या प्रोमोमध्ये दाखविण्यात आल्यानुसार या शो चे ग्रँड प्रिमियर (Grand Premier) 2 जुलै रोजी दाखविण्यात येणार आहे. पहिला भाग या दिवशी टेलिकास्ट होईल. दर शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता हा शो कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. नेहमीप्रमाणे स्टंट पाहून प्रेक्षकांना नक्कीच हैराण व्हायला होणार आहे हे निश्चित. प्रोमोवरूनच याचा अंदाज लावता येत आहे. रोहित शेट्टीचा हेलिकॉप्टरचा प्रोमो सध्या खूपच व्हायरल होतोय. तर या शो च्या फॅनपेजवरही अनेक अपडेट्स मिळत आहेत. मात्र हा शो लवकरच सुरू होणार यामुळे या शो च्या चाहत्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. दरवर्षी या शो ची अनेकजण उत्सुकतेने वाट पाहात असतात. केवळ सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींसाठीच नाही तर रोहित शेट्टीच्या निवेदनासाठी अनेक चाहत्यांना हा शो आवडतो. 

एरिका पॅकर्ड झाली बाहेर असा अंदाज 

पहिल्याच आठवड्यात तुषार कालिया, अनेरी वजानी, जन्नत झुबैर आणि एरिका पॅकर्ड यांना फिअर फंदा मिळाला असून एरिका पॅकर्ड या शो मधून बाहेर गेली आहे अशी अपडेट सध्या येत आहे. मात्र शो चालू झाल्यानंतरच याचा अंदाज येतो. शो सुरू होईपर्यंत अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी कळत असतात. तर यात सहभागी झालेले कलाकार रोज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेगवेगळे फोटो आणि रिल्स (Reels on Instagram) पोस्ट करताना दिसत आहेत. या रिल्स आणि फोटोजनादेखील चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. तर आपल्या आवडत्या कलाकारानेच यावर्षी खतरों के खिलाडीची ट्रॉफी मिळवावी असंही अनेकांना वाटत आहे. मागील वर्षी अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) याने दिव्यांका त्रिपाठी दहिया (Divyanka Tripathi Dahiya) हिला हरवून ही ट्रॉफी मिळवली होती. मात्र दिव्यांकाने आपल्या परफॉर्मन्सने केवळ प्रेक्षकांचेच नाही तर रोहित शेट्टीचेही मन जिंकले होते. यावर्षी रोहित शेट्टीचा हा शो नक्की कोण जिंकणार याचीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन