स्टंट आणि वेगवेगळ्या भीतींना सामोरे जाऊन काहीतरी हटके करण्याचा रिअॅलिटी शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोचा मेड इन इंडिया या भागाचा विजेता नुकताच जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री निया शर्मा या भागाची विजेती झाली असून रविवारी हा भाग प्रदर्शित करण्यात आला. खतरों के खिलाडी हा शो नेहमी बाहेरच्या देशात शूट करण्यात येतो. पण सध्य परिस्थितीत तो भारतातच शूट करण्यात आला. पण इतर सीझनच्या तुलनेत यावेळी या सीझनला म्हणावी तितकी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे निया शर्माचे कौतुक हे फारच कमी प्रमाणात होताना दिसत आहे.
Unlock चा आणखी एक टप्पा, सप्टेंबरपासून काय सुरु आणि काय बंद
आधीपासूनच शो होता फिक्स
अनेकदा रिअॅलिटी शो हे स्क्रिप्टेट असतात असा गवगवा केला जातो. पण खतरों के खिलाडीच्या बाबतीत असे कधीही झाले नव्हते. हा शो नेहमीच त्याच्या धडाकेबाज स्टंटमुळे प्रसिद्ध होता. त्यामुळेच टीआरपीच्या टॉप 5 च्या यादीत याचा समावेश व्हायचा. पण यंदा तसे झाले नाही. या शोची सुरुवात रोहित शेट्टीच्या ऐवजी फराह खानने केली. त्यामुळे या शोचा पहिलाच भाग चांगला पडला. शिवाय यामध्ये मेड इंडियाचा उल्लेख करत अनेक देसी आणि अस्सल स्टंट असतील असा उल्लेख केला होता. पण प्रत्यक्षात हे सगळे स्टंट आणि त्यावरील स्पर्धकांची रिअॅक्शन स्क्रिप्टेट असल्याचे जाणवले. शिवाय या खेळामध्ये निया शर्माच जिंकणार, असेही अनेकांना माहीत होते. त्यामुळेच सोशल मीडियावर या संदर्भात अशाप्रकारची बोंब आधीच सुरु होती.
इतरांचे स्टंट अधिक चांगले
स्पर्धेतील इतर स्पर्धकांच्या स्टंटचा विचार केला तर करण वाहीनेही उत्तम स्टंट केले होते. पण तरीही नियाचीच तारीफ होताना दिसत होती. याशिवाय जास्मीनही या शो मध्ये फेक वागत असल्याचे दिसत होते. असे असतानाही नियाचे हा शो जिंकणे अनेकांना खटकले. निया हा टीव्ही विश्वातील अत्यंत प्रसिद्ध असा चेहरा आहे. पण या शो नंतर तिचा टीआरपी आणि तिचा फॅन फॉलोविंग कमी होत असल्याचे देखील अनेकांनी म्हटले आहे. या रिअॅलिटी शोची विजेती होऊन नियाला कोणताही फायदा झालेला दिसत नाही. तर नियाच्या विजेता होण्यावरुनच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डकडून धमकी, नेमकं काय घडलं
निया म्हणजे मेकअप आणि स्टायलिंग नाही
निया शर्मा ही तिच्या स्टायलिंगसाठी आणि हटके मेकअप प्रयोगासाठी ओळखली जाते. इन्स्टावर ती अनेकदा वेगवेगळ्या रुपात समोर येताना दिसते. पण हा शो जिंकल्यानंतर तिने एका खासगी वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा शो सुरु झाला. सुरुवातीला जिंकणे हे लक्ष्य नव्हते. पण उत्तम स्टंट करत गेल्यानंतर हा शो जिंकणेच माझ्यासाठी एक लक्ष्य होते. त्यामुळे अत्यंत मन लावून मी हे स्टंट केले. जी लोकं मला केवळ माझ्या मेकअप आणि स्टायलिंगसाठी ओळखतात. त्यांच्यासाठी हा शो जिंकणे म्हणजे एक चपराक आहे. अस सांगायलाही ती विसरली नाही.
पण हा शो जिंकून नियाला किती फायदा भविष्यात होईल माहीत नाही. पण तिला या शोचा विनर बनवल्यामुळे अनेकांना निराशा झाली आहे हे नक्की!
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade