मनोरंजन

‘खिचड़ी’ फेम रिचा भद्रालाही जावं लागलं आहे ‘Me Too’ ला सामोरं

Dipali Naphade  |  Apr 17, 2019
‘खिचड़ी’ फेम रिचा भद्रालाही जावं लागलं आहे ‘Me Too’ ला सामोरं

काही महिन्यांपूर्वी Me Too एक लाट आली होती. त्यानंतर बरेच दिवस पुन्हा याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पण मध्येच कोणीतरी स्टार याबाबत आपबीती सांगत असतात. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अशा खूप अभिनेत्री आहेत, ज्यांना काम मिळवण्यासाठी ‘कॉम्प्रोमाईज’ (compromise) करण्याचा आतापर्यंत सल्ला देण्यात आला होता. इतकंच नाही तर अशा अभिनेत्रींना त्यांच्या फिगर आणि अन्य बाबींवरूनदेखील ऐकवण्यात आलं आहे. एका बाजूला आपण महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलत असतो तर दुसऱ्या बाजूला अशी प्रकरणं खूपच वाढत चालली आहेत. नुकतंच पुन्हा एक अशी बाब बाहेर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही स्टार असणारी रिचा भद्रा (Richa Bhadra) ने देखील आपल्याबरोबर घडलेला एक किस्सा सांगून आपण ही इंडस्ट्री सोडण्यामागे नेमकं काय कारण आहे ते स्पष्ट केलं आहे.

बॉडी शेमिंग आणि कास्टिंग काऊच

तुम्ही जर टीव्ही मालिका ‘खिचड़ी’ (Khichdi) चे चाहते असाल तर तुम्हाला या मालिकेमधील गोलमटोल चक्की पारेख नक्कीच माहीत असेल. चक्की पारेखची ही भूमिका रिचा भद्राने साकारली होती. पण त्यानंतर रिचा कधीही पुन्हा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये दिसली नाही. कारण रिचाने काम करणं सोडून दिलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे तिला आलेला अनुभव.


तिने या मालिकेनंतर पुन्हा मालिकेमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कास्टिंग काऊच (casting couch) आणि बॉडी शेमिंग (body shaming) चा तिला अनुभव आल्यानंतर तिने या इंडस्ट्रीपासून दूर राहणंच योग्य मानलं. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितलं की, लग्नाच्या आधी जेव्हा ती काम करत होती तेव्हा तिला असा अनुभव कधीच आला नाही. मात्र लग्नानंतर जेव्हा ती एका ठिकाणी ऑडिशन द्यायला गेली तेव्हा तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. तिला त्यावेळी कॉम्प्रोमाईज करण्यासाठी विचारण्यात आलं होतं.

कोणाबरोबर कॉम्प्रोमाईज केल्यास होईल काम

रिचा भद्राने कॉमेडी मालिका ‘खिचड़ी’ नंतर ‘बा, बहू और बेबी’, ‘खिचड़ी 2’, ‘मिसेस तेंडुलकर’ आणि ‘गुमराह’ च्या काही भागात काम केलं. 2017 मध्ये तिने लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा तिने पुन्हा काम सुरू करण्याचं ठरवलं. तेव्हाच तिला असा अनुभव आला. आपली चाईल्ड आर्टिस्ट ही ओळख तिला पुसून टाकायची होती. पण असा अनुभव आल्यानंतर तिने ही इंडस्ट्री सोडण्याचं ठरवलं.


रिचाने लहान पडद्यावरील हे डार्क सिक्रेट (dark secret) शेअर करताना सांगितलं, ‘माझं कुटुंब मी कोणताही रोमँटिक सीन केला तर नक्कीच त्यासाठी कम्फर्टेबल नाही. शिवाय मी कधीच बारीक नव्हते आणि आजकाल टीव्ही मालिकेमध्ये जशा मुली हव्या असतात तशी मी नाहीये.’

हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं होतं

रिचा भद्रा आपला नवरा अथवा कुटुंबाच्या विरोधात जाण्यास तयार नाही. तिला असं कोणतंही काम करायचं नाही ज्यामुळे तिच्या कुटुंबाला लाज वाटेल. लग्नानंतर जेव्हा रिचा ऑडिशन द्यायला गेली होती तेव्हा तिला कास्टिंग डायरेक्टरने तिला काम मिळण्यासाठी आपल्याला खुश करावं लागेल असं सांगितलं. इतकंच नाही तर, त्याने त्यासाठी तिला त्यासाठी ऑफिसऐवजी हॉटेलमध्ये आपल्याला मीटिंग करावी लागेल असंही सांगितलं. अशा काही घटनांमुळे रिचाला संपूर्णतः हादरवून टाकलं होतं. त्यामुळे ती या इंडस्ट्रीपासून दूर झाली. रिचाला तिच्या जाडेपणाबद्दलही बोलण्यात आलं. तिला अभिनय करायचा असल्यास, आपलं वजन कमी करावं लागेल असंही सांगण्यात आलं.

फोटो सौजन्य – Instagram

हेदेखील वाचा 

#MeToo Stories India : या १० महिलांनी सांगितली आपल्याबरोबर झालेल्या शोषणाची कथा

MeToo चळवळीवरच थांबली नाही तनुश्री दत्ता, आता दाखवणार शॉर्टफिल्म

नेहा कक्कर नशेमध्ये, जमिनीवर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल

 

 

Read More From मनोरंजन