मनोरंजन

लवकरच आई होणार किश्वर मर्चंट, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

Trupti Paradkar  |  Jun 24, 2021
लवकरच आई होणार किश्वर मर्चंट, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

टेलिव्हिजन अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि अभिनेता सुयश राय त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.  लग्नाच्या सहा वर्षानंतर किश्वरने वयाच्या चाळीशीत आई होण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ती सध्या खूपच आनंद आणि उत्साहात आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या प्रेगनन्सीच्या बातमीपासून गरोदरपणाचा  संपूर्ण प्रवास सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता तिच्या गरोदरणाची तिसरी तिमाही सुरू झाली असुन नुकतंच तिचं बेबी शॉवर म्हणजेच डोहाळे जेवणही अगदी धूम धडाक्यात करण्यात आलं. 

किश्वरच्या डोहाळे जेवणाचा असा होता थाट

किश्वर मर्चंट  आणि सुयश राय दोघंही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे किश्वरच्या गरोदरपणाचा संपूर्ण प्रवास त्यांनी चाहत्यांसोबत मनमोकळेपणे शेअर केलेला आहे. किश्वर नेहमीच तिच्या  बिनधास्त स्वभावासाठी चर्चेत असते. सध्या मात्र ती  तिच्या आई होण्याच्या या सुखकर प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर किश्वरने तिच्या बेबी शॉवरचे कही खास अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये किश्वरने चक्क पारंपरिक पेहराव आणि हातावर मेंदी काढलेली दिसत आहे. किश्वरने काढलेली मेंदीदेखील नक्कीच खास आहे. कारण यात तिने स्वतःचे गरोदरपण, पोटातील बाळ, बाळासाठी लागणारी दुधाची बाटली, बाळाची दुपटी अशा गोष्टींचे डिझाईन काढून घेतले आहे. यासोबत तिने या फोटोंसोबत शेअर केलं आहे की, “आई होण्यासाठी मी तयार आहे, सोबतच डोहाळे जेवण म्हणजेच बेबी शॉवरसाठीही तयार आहे”  आणखी एका पोस्टमध्ये तिने डोहाळे जेवणाच्या आदल्या दिवशीचे फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने डोहाळ जेवणासाठी केली जाणारी सजावट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सुयशने शेअर केलेल्या फोटोसोबत असं शेअर केलं आहे की, “मी तुझ्या बाळाचा बाबा होणार आहे, ऑगस्टमध्ये आमचे बाळ जन्माला येणार आहे.” सोशल मीडियावर सध्या हे फोटो #sukishkababy या हॅशटॅगने व्हायरल झाले आहेत. 

किश्वर मर्चंटचा बेबी शॉवर लुक

किश्वरने डोहाळे जेवणासाठी खास गुलाबी रंगाचा लेंगा घातला होता आणि तिचे रूप एखाद्या नववधूप्रमाणे खुलून आले होते. मात्र सर्व फोटोंमध्ये चाहत्यांचे लक्ष किश्वरच्या मेंदीवरच खिळून राहिले होते. कारण तिने मेंदीसाठी डोहाळ जेवणाची खास थीम सिलेक्ट केली होती. किश्वरची ही खास मेंदी आता बेबी शॉवरसाठी नक्कीच ट्रेंडमध्ये असणार आहे. किश्वर आणि सुयशने मार्चमध्ये ते आईबाबा होणार असं जाहीर केलं होतं. ऑगस्ट महिन्यात किश्वर आई होणमार आहे. त्यामुळे सध्या ती  तिचे मेटरनिटी शूट करण्यात दंग आहे. किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांनी 2016 मध्ये लग्न केलं होतं. आता सहा वर्षानंतर त्यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोघांमध्ये आठ वर्षांचं अंतर आहे. सुयश किश्वरपेक्षा आठ वर्षांनी लहान आहे.  लग्नाआधी सहा वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. ‘प्यार की यह एक कहानी’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर मैत्री आणि पुढे प्रेमात या नात्याचे रूपांतर झाले. दोघांनीही आतापर्यंत बऱ्याच मालिकांमधून काम केले असून दोघांचा फॅन फॉलोव्हर खूप मोठा आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

#KKK11 Promo: प्रेक्षकांना खिळवून ठेवायला तयार, राहुल वैद्यचा पहिला प्रोमो

साथ निभाना साथिया फेम ‘ही’ अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई

पंधरा वर्षांनी पुन्हा भेटायला येणार लोकप्रिय सुपरहिरो, क्रिश 4 ची घोषणा

Read More From मनोरंजन