मनोरंजन

कॉफी विथ करणचा नवीन सिझन येणार लवकरच, मे मध्ये सुरु होणार शूटिंग

Vaidehi RajeVaidehi Raje  |  Apr 25, 2022
koffee with karan

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ हा भारतातील सर्वात लोकप्रिय चॅट शो आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्त्वांपासून ते दाक्षिणात्य चित्रपटातील कलाकारांपर्यंत अनेकांनी या प्रसिद्ध आणि वादग्रस्त शो मध्ये येऊन करण जोहर बरोबर गप्पा मारल्या आहेत. अनेकदा या शोमध्ये केल्या गेलेल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादंग देखील निर्माण झाले आहेत. तरीही प्रेक्षक हा शो पुन्हा पुन्हा बघणे पसंत करतात. गेल्या सीझनमध्ये दिग्दर्शक करण जोहरचा हा शो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. त्यामुळे काही काळासाठी तो थांबवण्यात आला होता. करणने त्याच्या या प्रसिद्ध शो मधून थोड्या काळासाठी ब्रेक घेतला होता. परंतु आता बॉलिवूडमध्ये चर्चा होते आहे की करण त्याच्या कॉफी विथ करणच्या नवीन सीझनसह छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

आधीचे चित्रपट पूर्ण केल्यानंतरच चॅट शोचे शूटिंग सुरु करणार करण

Koffee With Karan Season 7

करण मे महिन्यात ‘रॉकी और रानी’ या त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. ही एक लव्ह स्टोरी असेल ज्यात रणवीर सिंग व आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असतील. तसेच जया बच्चन, धर्मेंद्र व शबाना आझमी यांसारखे दिग्गज कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण त्याच्या आगामी जुगजुग जिओ, ब्रह्मास्त्र, लिगर, गोविंदा नाम मेरा यांसारख्या चित्रपटांचीही निर्मिती करण्यात व्यस्त आहे. चित्रपटाचे सध्याचे शेड्यूल पूर्ण केल्यानंतर, करण त्याच्या चॅट शोवर काम सुरू करेल. सध्या कॉफी विथ करणच्या प्री प्रोडक्शनचे काम जोरात सुरू आहे आणि टीम मेच्या मध्यापासून शूटिंग सुरू करेल. एका वृत्तानुसार हा शो जूनमध्ये स्टार नेटवर्कवर प्रसारित होईल.

या सीझनमध्येही प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स लावणार हजेरी 

Koffee With Karan Season 7

मागच्या सीझन्सप्रमाणे या ही सीझनमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स या शोमध्ये हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. अक्षय कुमार, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, नीतू कपूर, अनिल कपूर, कियारा अडवाणी, कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इतर अनेक सेलेब्स या सीझनमध्ये कॉफी विथ करणमध्ये पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा आहे. मिशन मजनू या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेली रश्मिका मंदान्ना देखील या शोमध्ये पाहुणी म्हणून येण्याची शक्यता आहे तर नवविवाहित जोडपे, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये त्यांची पहिली एकमेकांबरोबर ऑन-स्क्रीन हजेरी लावू शकतात. करणबरोबर कॉफी टेबल संभाषणासाठी जवळपास संपूर्ण चित्रपटसृष्टी या शोमध्ये सामील होण्याची वाट बघत असते. नुकत्याच झालेल्या इंस्टाग्राम लाइव्ह सत्रादरम्यान, केजोने त्याच्या चॅट शोचा पुढील सीझन येईल अशी हिंट दिली. हुनरबाजच्या सेटवरून करण इंस्टाग्रामवर लाइव्ह आला होता. इंस्टाग्राम लाइव्हमध्ये करण म्हणाला की, “मी कॉफी विथ करणवर काहीही बोलण्यास अधिकृत व्यक्ती नाही. पण त्या विभागाकडून लवकरच चांगली बातमी येणार आहे.” 

2004 मध्ये लाँच झालेल्या, कॉफी विथ करणचे आतापर्यंत सहा यशस्वी सीझन प्रसारित झाले आहेत.चित्रपट कलाकारांव्यतिरिक्त, या शोमध्ये करणने सानिया मिर्झा, महेश भूपती, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांसारख्या स्पोर्ट्स स्टार्सशी देखील संवाद साधला आहे. आता या सिझनमध्ये कोण कोण चॅट शो मध्ये येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन