टीव्हीवर खूप वर्ष चालेल्या काही मालिका ज्यावेळी बंद होतात आणि अचानक त्याचे मीम्स बनून ज्यावेळी समोर येतात.त्यावेळी तुमची नेमकी प्रतिक्रिया काय असते. असंच काहीसं झालं आहे ‘साथी साथ निभाना’ या मालिकेच्या बाबतीत. या मालिकेतील शांत गोपी बहु, न्याय देणारी सासू कोकिलाबेन आणि सतत कट रचणारी राशी… असे काही कॅरेक्टर हे फारच प्रसिद्ध होते. ही मालिका अनेकांच्या आवडीची होती. तर काहींच्या डोक्याला मात्र या मालिकेने ताप केला होता. त्यातीलच एक सीन घेऊन एकाने एक मीम रॅप तयार केले आहे. पहिल्यांदा हे मीम पाहिल्यावर हसू आले. पण ते इतके वायरल होईल असे कधीच वाटले नव्हते. ते इतके वायरल झाले की, चक्क केंद्रिय मंत्री आणि सास-बहू मालिकांमधून कधी काळी काम केलेल्या स्मृती इराणी यांनी देखील ते मीम शेअर केले. पण काही काळातच त्यांनी हे मीम डिलीटही करुन टाकले. जाणून घेऊया या मीमविषयी अधिक माहिती
असे झाले मीम वायरल
यशराज मुखवटे नावाच्या एका म्युजिशिअनने कोकिलाबेनचा एक रागिष्ठ पॅच घेऊन त्यावर एक रापचिक रॅप तयार केले असे तयार करताना त्याने कोकिलाबेनचा डायलॉग रिपीट करण्यात आला आहे. त्यामुळे कोकिलाबेनच्या तोंडी सतत तोचतोच आवाज ऐकायला येतो. या व्हिडिओमध्ये अन्य कोणाचे डायलॉग ऐक येत नाही. तर फक्त कोकिलाबेनचा आवाज ऐकायला येतो. त्यामधील काही डायलॉग म्हणजे….. तुम थी? मैं थी?तुम थी… मैं थी…. ये राशीने कुकरसे चने निकाल दिये और गॅस पै खाली कुकर रख दिया… असे डायलॉग फारच मजेशीर पद्धतीने गुंतण्यात आले. त्यामुळे पाहता पाहता हा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला. इतका की, अनेकांनी या वायरल व्हिडिओतून चांगलीच धूम माजवली. ही मालिका एकेकाळी फारच प्रसिद्ध होती. वर सांगित्याप्रमाणे अनेकांच्या आवडीची तर काहींच्या डोक्यात जाणारी त्यामुळेच की काय हे मीम आल्यानंतर या मालिकेला दुरुनच नमस्कार करणाऱ्यांनी मीम्सचा चांगलाच आनंद लुटला आहे. इतकंच नाही तर मीम्सवरही मीम्स होऊ लागले आहेत.
Class of 83: बॉबी देओल नाही तर यामुळे चित्रपट ठरतो खास
स्मृती इराणींनीही केली स्तुति
आता सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचला. केंद्रियमंत्री स्मृती इराणी यांना देखील हा व्हिडिओ इतका आवडला की, त्यांनी लगेचच तो पोस्ट केला. पण पोस्ट केल्यानंतर काहीच मिनिटांत त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला. तो व्हिडिओ डिलीट करण्यामागे त्यांनी त्यामागील कारण ही सांगितले. ते असे होते की, यशराज मुखवटे याने पुलवामा येथे आपल्या जवानांवर हल्ला झाल्याचे समर्थन केले होते. त्यामुळे देशद्रोही म्हणून अनेकांनी त्याच्याविरुद्ध आवाज पुकारला होता. हे कळल्यानंतर स्मृती इराणी यांनी तातडीने व्हिडिओ काढून त्यावर स्पष्टीकरणही लिहिले.
हेमा मालिनी आणि इशा देओल यंदा असं करणार बाप्पाचं स्वागत
यशराज आला ट्रेंडिगमध्ये
या व्हिडिओमुळे यशराजला चांगलाच फायदा झाला आहे. कारण त्याचा व्हिडिओ गेल्या काही काळापासून खूपच जास्त ट्रेंड होत आहे. त्याचा हा व्हिडिओ अनेकांनी त्यांच्या पेजवरही शेअर केला आहे. त्यामुळे कोकिलाबेन आणि त्यांचा हिट रॅप दिवसेंदिवस सगळ्यांपर्यंत पोहोचू लागला आहे.
तुम्ही चुकून कधीही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला हे मीम नक्कीच हसवून जाईल.
बॉलीवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करण्याची स्टारकिडची ‘प्रक्रिया’ सुरू
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade