मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार चित्रपट, नाटकांची भर पडत आहे. अनेक दिग्गज कलाकार आणि इतर प्रॉडक्शन टीम यासाठी अतिशय मेहनत घेत असते. मात्र आजही मराठी कलाकारांना अनेक गैससोयींना सामोरं जावं लागत आहे. कधी मराठी चित्रपटांसाठी सिनेमागृह मिळत नाही तर कधी नाट्यगृहात अपूऱ्या सोयीसुविधांमुळे कलाकारांना सतत गैरसोय सहन करावी लागते. बऱ्याचदा यावर कलाकार उघडपणे भाष्य करतात. नुकतच ठाण्यातील एका नाट्गृहाचा असा गैर कारभार उघड झालाय.
भरत जाधवने व्यक्त केला संताप
ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात अभिनेता भरत जाधवला नुकताच सही रे सही या नाट्यप्रयोगादरम्यान एका त्रासाला सामोरं जावं लागलं. वास्तविक भरत जाधव हा सतत प्रेक्षकांना हसवणारा एक अभिनेता आहे. त्यामुळे त्याला असा संताप व्यक्त करताना पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच खेदजनक आहे. नाटकाच्या प्रयोगासाठी भरत जाधव आणि इतर कलाकारांची टीम शनिवारी नाट्यगृहात पोहचली होती. मात्र नाट्यगृहातील एसी बिघडल्यामुळे सर्व कलाकारांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत होता. या गैससोयीमुळे त्रस्त झाल्यामुळे वैतागून शेवटी भरत जाधवने फेसबूकवर व्हिडिओच्या माध्यमातून ही समस्या चाहत्यांसमोर व्यक्त केली. या व्हिडिओत भरत जाधवने व्यक्त केलं की, “नमस्कार मी भरत जाधव. असा ओला चिंब वाटतोय ना ? घाबरू नका. मी पावसात भिजलेला नाही. सर्वांच्या आर्शीवादाने काशिनाथ घाणेकर या नाट्यगृहात मी एका नाटकाच्या प्रयोगासाठी आलो आहे. मात्र या नाट्यगृहातील एसी व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. नाटकांसाठी हे लोक पूर्ण भाडं घेतात. मात्र सोयीसुविधा देत नाहीत. ही आतापर्यंत दुसरी का तिसरी वेळ आहे असं घडत आहे. आम्ही त्यांना मघापासून एसी सुरू करण्यास सांगत आहोत आणि हे लोक आम्हाला एसी सुरू केला आहे असं सांगत आहेत. मी घामाने पूर्णपणे भिजलो आहे तरी कोणीच काही करत नाही. म्हणून शेवटी मला असं ऑनलाईन यावं लागलं. धन्यवाद.”
आस्ताद काळेलाही आला असाच अनुभव
शनिवारी सोशल मीडियावर भरत जाधवने आपली व्यथा मांडून देखील नाट्यगृह प्रशासनाने याची कोणतीच दखल घेतली नाही. कारण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच नाट्यगृहात अभिनेता आस्ताद काळेलाही असाच अनुभव आला. कारण रविवारी काशिनाथ नाट्यगृहात त्याला पाण्याचा अपव्यय होताना दिसला. आस्तादला नाट्यगृहातील प्रसाधनगृहात वाया जाणारे पाणी पाहुन वाईट वाटले. त्यानेही याबाबत कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली मात्र त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे त्याने याचा व्हिडिओ सोशल मीडियीवर शेअर करत नाट्यगृहाच्या गैरकारभाराबाबत खंत व्यक्त केली होती. वास्तविक मागील वर्षी काशिनाथ नाट्यगृहाचा स्लॅब अचानक कोसळल्यामुळे ते बरेच दिवस बंद होते. नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी बरेच दिवस ते बंद होते. दुरूस्तीसाठी प्रचंड पैसा खर्च करूनही नाट्यगृहातील गैरसोयी काही संपण्याचं नाव घेत नाहीत.ही खर्च खेदाची गोष्ट आहे.
सुमीत राघवनने देखील व्यक्त केली होती खंत
काही दिवसांपूर्वी अभिनेता सुमीत राघवन यानेदेखील अशाच प्रकारची खंत व्यक्त केली होती. सुमीत राघवन काही दिवसांपूर्वी नाशिकमधील काशिनाथ कलामंदिरमध्ये नाटकाच्या प्रयोगासाठी गेला होता. नाटक सुरू असताना अचानक प्रेक्षकांमधून मोबाईलची रिंग टोन वाजू लागली. बराच वेळ असं घडत राहील्यामुळे शेवटी कंटाळुन त्याने प्रयोग थांबवला होता. मराठी कलाकारांना मिळत असलेल्या या वागणुकीमुळे त्यांना त्यांचे काम करणं कठीण जाऊ शकतं. कारण हे कलाकार नेहमी चाहत्यांच्या मनोरंजनासाठी झटत असतात. मात्र प्रशासन आणि प्रेक्षकांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद आणि सहकार्य मिळत नाही.
अधिक वाचा
Confirmed : करण पटेलने सोडली ‘ये है मोहब्बतें’ सीरियल
माँ की रसोई’च्या निमित्ताने एकत्र आले दिग्गज
मुंबईत राहणाऱ्या bollywood सेलिब्रिटींची ही घरं तुम्हाला माहीत आहेत का
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade