मनोरंजन

सुशांत सिंह राजपूतच्या घरात येणार नवा भाडोत्री, भाडं ऐकून बसेल धक्का

Leenal Gawade  |  Jun 16, 2021
सुशांत सिंह राजपूतच्या घरात येणार नवा भाडोत्री, भाडं ऐकून बसेल धक्का

सुशांत सिंह राजपूतला जाऊन आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण अजूनही अनेकांच्या आठवणीतून तो पूर्णपणे गेलेला नाही. 14 जून 2021 ला त्याचे वर्षश्राद्ध झाले. याच दिवशी त्याच्या फॅन्सनी, जवळच्या व्यक्तींने त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले. पण आता सुशांत संदर्भातील एक खास बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ज्या आलिशान फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूत राहात होता. ते घर आता पुन्हा एकदा राहण्यासाठी सज्ज झाले आहे. फ्लॅटच्या मालकांनी हे घर पुन्हा एकदा भाड्याने राहण्यासाठी जाहिरात केली असून त्याने या आलिशान फ्लॅट जे भाडे सांगितले आहे ते ऐकून तुम्हा सगळ्यांनाही धक्का बसेल. जाणून घेऊया या विषयी अधिक

कौटुंबिक वाद सुरु असतानाही निशा रावलने साजरा केला मुलाचा ग्रँड वाढदिवस

आलिशान फ्लॅटचे भाडे इतके….

सुशांत सिंह राजपूतने  वांद्रे येथील त्याच्या घरात सुसाईड केले होते. तो ज्या आलिशान फ्लॅटमध्ये राहात होता तो फ्लॅट सी फेसिंग असा होता. मुंबईत सी फेसिंग फ्लॅटला जास्त महत्व आहे. अशाच एका सी फेसिंग फ्लॅटमध्ये सुशांत राहात होता. आता या घराला पुन्हा एकदा भाड्यावर द्यायचे आहे. त्यासाठी त्याची जाहिरात केली जात आहे. हे घऱ पाहण्यासाठी अनेक जण येत आहेत. पण अद्याप हे घर अजून कोणालाही देण्यात आलेले नाही. अजूनही हा फ्लॅट पाहण्यासाठी लोक येतं आहे. पण अजून या घरात कोण भाडोत्री येणार हे निश्चित झालेले नाही. कारण या फ्लॅटचे  भाडे हे कमी नाही. याचे भाडे 4 लाख महिना इतके आहे. त्यामुळेच आता इतका आलिशान फ्लॅट सुशांतनंतर भाड्याला कोण घेणार असा प्रश्नच आहे. 

घराची होते चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार या घरापेक्षा लोकांना सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबद्दल लोकांना अधिक जाणून घ्यायचे आहे. घर पाहायला येताना खूप जण सुशांत सिंह राजपूतच्या ट्रॅजेडीबद्दल जास्त विचारतात. त्यामुळे या घरापेक्षा जास्त इंटरेस्ट हा लोकांना या घरात राहणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या या मिस्ट्रीबद्दल आहे. त्यामुळे अजून तरी फक्त या गोष्टीची चर्चा होताना दिसत आहे.

दीपिका पादुकोणची ड्युप्लिकेट आहे ही अभिनेत्री, बोल्डनेसमुळे चर्चेत

एक वर्षापासून पोलिसांच्या ताब्यात फ्लॅट

सुशांत सिंह राजपूतची मर्डर मिस्ट्री इतकी वाढत गेली की त्याचा खुनाचा शोध लागता लागता वर्षभर लागले. त्यामुळे या घऱात पोलिसांचे येणे जाणे होते.  पोलिसांनी हे घर सील केल्यामुळे तपासासाठी खूप वेळा पोलीस या ठिकाणी असायचे. सुशांतची आत्महत्या हत्या होती असे कुटुंबाला आणि चाहत्यांना वाटत होते. त्यामुळे हा तपास खूपच लांबला होता. पण ड्रग्ज संबधाव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती फारसे लागले नाही. त्यामुळे आता एक वर्षानंतर या घरावरुन पोलिसांनी तपास थांबवला आहे. त्यामुळेच हे घर आता पुन्हा एकदा भाड्यावर देण्यात येणार आहे. 

 

सुशांतने दाखवले होते घर

सुशांतच्या या घरात अनेकदा शूट झालेले आहे. त्याने आपले हे घर खूप वेळा मुलाखती दरम्यान दाखवले होते. हे धर त्याने फारच स्वच्छ ठेवले होते. त्याने घराला उत्तम पद्धतीने सजवले होते. पण आता या घरात जी व्यक्ती येईल तो या घरात जे बदल करेल त्यानंतर सुशांतच्या आठवणी या घरातून पुसल्या जातील. 


आता सुशांतच्या या घरात नवा भाडोत्री कोण येणार याची प्रतिक्षा आहे. 

 लिटिल चॅम्प्सचं स्वप्न साकारण्यासाठी सारेगमपचा मंच सज्ज

Read More From मनोरंजन