मनोरंजन

रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणेंनी पटकावली 11 लाखांची पैठणी

Leenal Gawade  |  Jun 27, 2022
home_minister_fb

 गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे चर्चा सुरु होती ती एका महागड्या पैठणीच्या. तब्बल 11 लाखांची पैठणी कोण पटकावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर या पैठणीचा मान रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी मिळवला आहे. आम्ही बोलत आहोत होम मिनिस्टरच्या (Home Minister) महामिनिस्टर या नव्या पर्वाविषयी. पैठणी मिळवण्याची वहिनींची हक्काची जागा म्हणजे होम मिनिस्टर. या नव्या पर्वामुळे या शोचा टीआरपी इतका वाढला होता की, खूप जणांना याची उत्सुकता होती अखेर याचा निकाल लागला आहे. चला जाणून घेऊया या विषयी अधिक

Exclusive: ‘अहिल्या’ मालिकेतून अभिनेत्री स्नेहलता वसईकरची एक्झिट, चाहत्यांमध्ये नाराजी

११ लाखांच्या पैठणीची उत्सुकता

होम मिनिस्टरचा अगदी कोणताही सीझन असो. त्याची उत्सुकता ही महिलांमध्ये असतेच. मनोरंजक खेळ असलेल्या या शो मध्ये मानाने अशी पैठणी मिळणे हा एक वेगळा आनंद असतो.आतापर्यंत याचे अने सीझन येऊन गेले आहेत. पण हा सीझन खूपच जास्त गाजला तो विजेतीला मिळणाऱ्या पैठणीच्या विशेषणामुळे. सोन्याची जर असलेली आणि हिरे जडवलेली ही पैठणी असल्यामुळे या पैठणीची खूप जोरात चर्चा सुरु होती. ही स्पर्धा 10 शहरांमध्ये रंगली होती. या 10 शहरांमधील वहिनींमध्ये हा मस्त सामना रंगला होता. या सगळ्यांमधून बाजी मारत रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी बाजी मारली आहे. या शोचा निकाल लागायच्या आधीच सोशल मीडियावर या संदर्भातील पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. यात 11 लाखांची ही पैठणी पाहून सगळ्यांनाच आनंद झाला होता.

रॉकेट्री द नंबी इफेक्ट मधील नवे श्री व्यंकटेश सुप्रभातम ऐकले का?

असा रंगला सोहळा

आता 11 लाखांची पैठणीचा सोहळा हा दिमाखदार तर असणारच होता. रविवारी हा ग्रँड असा सोहळा पार पडला. यामध्ये अनेक कलाकारांनी आपल्या नृत्याचे सादरीकरणे केले. याचेही काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे एकूणच हा सोहळा फारच ग्रँड होता असे म्हणायला हवे. या पर्वानंतर आता नव्या पर्वाचीही चर्चा होत आहे. त्यामुळे आता जरी तुमची संधी हुकली असली तरी देखील तुम्हाला लवकरच ही संधी पुन्हा एकदा थोड्या नव्या रुपात आणि नव्या पैठणीसह मिळणार आहे.

नव्या पर्वाची घोषणा

 आता जरी तुमची 11 लाखांची ही खास पैठणी मिळवण्याची संधी हुकली असली तरी वहिनींसाठी हा खेळ असाच सुरु राहणार आहे.  खेळ सख्यांचा चार चौघींचा असे या सीझनचे नाव असून यामध्ये गटाने वहिनींना खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जर तुमचा छानसा गट असेल तर तुम्हाला देखील या मध्ये नक्कीच सहभागी होता येईल. या संदर्भात फारशी माहिती देण्यात आली नसली तरी देखील हे पर्वदेखील मजेदार असणार आहे. यात काही शंका नाही. पण अद्याप यामध्ये बक्षीस स्वरुपात काय देणार आहे या संदर्भात काहीही सांगण्यात आलेले नाही. 

दरम्यान 11 लाखांची ही पैठणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा

Read More From मनोरंजन