आरोग्य

पोट सुटत असेल तर…. तुमच्या दिनचर्येत असे करा बदल

Leenal Gawade  |  Apr 1, 2022
सुटलेले पोट

  आपली दिनचर्या कशी यावर आपले आरोग्य अवलंबून असते. तुम्ही काय खाता? त्यापेक्षा ते कधी खाता? कसं खाता? हे देखील जाणून घेणे फारच गरजेचे असते. त्यावर तुमचे वजन वाढणे आणि कमी होणे हे अवलंबून असते. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात खूप जणांना स्थुलपणा आला. बसून बसून काम करणे यामुळ अनेकांच्या पोटाच्या ढेऱ्या सुटल्या. पण आता लॉकडाऊन संपूनही अवकाश झाला आहे. पण तरी देखील तुमच्या पोटाचा घेर कमी होण्याचे नाव घेत नसेल. तुमचे पोट सुटत असेल तर तुमच्या दिनचर्येत तुम्ही काही साधे साधे बदल करणे अपेक्षित आहे. जाणून घेऊया दिनचर्येतील हे बदल

उठण्याची आणि नाश्त्याची वेळ

सकाळचा पहिला आहार म्हणजे आपला नाश्ता हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. कारण तुम्ही उठल्यानंतर 30 मिनिटांच्या आत तुम्ही तुमचा नाश्ता करायला हवा किंवा काहीतरी खायला हवे. तुम्ही सकाळी जितकं जास्त खाल. तितके तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे तुम्ही शक्य असेल तेवढे जास्तीत जास्त आहार घ्या. सकाळच्या नाश्त्याला तेलकट, तूपकट असे पदार्थ अजिबात नको. त्यापेक्षा तुम्ही धावण, चपाती, फळं, थालिपीठ असा नाश्ता करा. त्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक असे घटक मिळतात.

सतत बसून राहू नका

हल्ली खूप जणांच्या कामाचे स्वरुप हे फक्त बसून आहे. कित्येक तास बसून काम करताना जरा सुद्धा उठून इतर काही करण्याची इच्छा आपल्याला होत नाही. आपण कसे बसतो यावरही आपल्या शरीराची ठेवण अवलंबून असते. तुम्ही पोट आत घेऊन आणि पाठीचा बाक काढून जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या पोटाचा आकार वेगळाच झालेला दिसेल. खूप जणांचे केवळ ओटीपोट बाहेर आलेले असते. यामागील कारण तुमची बसण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही बसताना कसे बसता हे देखील बघा. ताठ बसा. मध्येमध्ये उठून थोडे चालत जा.

खाऊन बसणे

कंटाळा हा तुमच्या दिनचर्येत असेल तर तो तुम्ही आताच काढून टाका. याचे कारण असे की, काह जणांना काहीही करण्याचा कंटाळा असतो. खूप जण जेवतात आणि त्यानंतर पुन्हा कामाला बसतात किंवा झोपतात. अशांचे देखील वजन वाढते इतकेच नाही तर अशावेळी खूप जणांचे पोट देखील वाढते. खूप जणांना असे सतत बसल्यामुळे अपचनाचा देखील त्रास होऊ लागतो. तुम्हाला ही अशी सवय असेल तर त्यामुळे तुम्हाला वजन वाढणे, पोट सुटणे आणि अपचन होणे असे त्रास होऊ शकतो. 

अवेळी झोपणे

झोप ही पूर्ण होणे उत्तम आरोग्यासाठी गरजेचे असते.खूप जणांच्या झोपेचे गणित बदलेले असते. रात्री उशीरा झोपणे, सकाळी उशीरा उठणे, दुपारी झोपणे किंवा वेळ मिळेल तेव्हा झोपणे. या सगळ्याच्या परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. या झोपेमुळे तुमच्या खाण्याच्या वेळा या बदलत असतात. त्यामुळे अवेळी झोपणे चांगले नाही. शक्य असेल तर तुम्ही रात्री 12 च्या आत तुम्ही झोपणे कधीही चांगले असते. तुम्ही झोपेची योग्य वेळ ठेवाल तर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

खाण्याच्या सवयी

दिवसातून तुम्ही कितीही आहार घ्या. एखाद्यावेळी चालू शकेल पण हा आहार तुम्ही योग्य आणि चांगला घ्यायला हवा. अरबटचरबट खाण्याची वेळही योग्य हवी. दिवसातून चार वेळा आहार घेणे खूप गरजेचे असते.  म्हणजे सकाळचा नाश्ता, त्यानंतर स्नॅक, मग दुपारचे जेवण आणि त्यानंतर स्नॅक, रात्रीचे जेवण असे तुम्ही खायला हवे. रात्री जेवणानंतर तुम्ही शक्यतो काही खाऊ नका. त्यामुळेही नाहक तुमचे वजन वाढते. खाताना आहारात असे काही असू द्या त्याचा फायदा होऊ शकेल. प्रोटीन, फायबर, फॅट याचे योग्य प्रमाण असलेले पदार्थ खा

वाढलेले वजन हे सगळ्यात आधी तुमच्या पोटाच्या आकारावरुन दिसते. तुमचा पोटाचा आकार असा वाढत असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार दिनचर्येत करायला हवा.

Read More From आरोग्य