मनोरंजन

प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात, फोटो व्हायरल

Dipali Naphade  |  Dec 10, 2020
प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात, फोटो व्हायरल

गेल्या काही महिन्यांपासून अनेक सेलिब्रिटींची लग्न होताना दिसत आहेत. त्यातच आता भर पडली आहे ती अजून एका सेलिब्रिटीची. कार्तिक गायकवाड हे नाव मराठमोळ्या प्रेक्षकांना नक्कीच नवं नाही. लिटिल चॅम्पचा किताब मिळवणारी कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) ही अनेकांची आवडती गायिका आहे. कार्तिकीचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. याचवर्षी काही महिन्यांपूर्वी रोनित पिसे याच्याशी कार्तिकीने साखरपुडा केला होता. कार्तिकीच्या लग्नाचे फोटो गायिका आर्या आंबेकरने (Aarya Ambekar) पोस्ट केल्यानंतर ते व्हायरल झाले. कोणताही गाजावाजा न करता कार्तिकीचे लग्न मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या उपस्थित पार पडले आहे. 

अबब! आदित्य नारायणचे घर इतके महाग, स्वतः सांगितली घराची किंमत

वडिलांच्या मित्राच्या मुलासह केले लग्न

Instagram

कार्तिकी लहानपणापासून गाणं गात आहे आणि कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाडच तिचे गुरू आहेत. कार्तिकीने नेहमीच आपल्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे केले आहे. आताही कार्तिकीने वडिलांच्या मित्राच्या मुलासह लग्न केले. रोनित पिसे हा तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा असून याचवर्षी जुलै महिन्यात दोघांनी साखरपुडा केला होता. अचानक फोटो पोस्ट करून कार्तिकीने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. तर आताही तिचे लग्नाचे फोटो अचानक समोर आल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. रोनित हा मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याला गाण्याची कोणतीही बॅकराऊंड नाही. पण स्वतःला गाणे येत नसले तरीही त्यांच्या घरी कलेची आवड असून घरातील सर्वच जण कानसेन असल्याचे कार्तिकीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. 

Bigg Boss14 : राहुल, निकी, अली गोनी येणार परत, सुत्रांनी दिली माहिती

रितसर अरेंज मॅरेज

रोनित आणि कार्तिकीचे रितसर अरेंज मॅरेज झाले आहे. अगदी कांदेपोह्याच्या कार्यक्रमापासून ते पत्रिका जुळविण्यापर्यंत सर्व गोष्टी करून मगच या दोघांची पसंती लक्षात घेऊन त्यांचे लग्न लाऊन देण्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. कार्तिकी ही कधीही तिच्या वडिलांच्या शब्दाबाहेर गेली नाही. नेहमीच आपल्या वडिलांचा मान राखत तिने आयुष्य जगल्याचे सर्वांनीच अगदी लहानपणापासून पाहिले आहे. आताही इतकी मोठी झाल्यानंतरही तिने वडिलांचा मान राखतच लग्न केले आहे. लिटिल चॅम्पचा मान मिळवणारी कार्तिकी अजूनही तिच्या सर्व मित्रमैत्रिणींसह संपर्कात आहे. कार्तिकी लग्नामध्ये तिची मैत्रीण आर्या आंबेकरनेही उपस्थिती लावली होती. इतकंच नाही तर कार्तिकीच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. हेच फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

सैफ आणि करिनाच्या दुसऱ्या बाळाचं काय असणार नाव, केला खुलासा

कार्तिकीच्या गाण्याचे शो चालू

कार्तिकी ही मूळची आळंदीची असून तिच्या आवाजाचा जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. विशेषतः भजन, किर्तन आणि उडती गाणी कार्तिकीच्या आवाजामध्ये ऐकायला खूपच मजा येते. कार्तिकीने आपला रियाज कधीही सोडला नाही. आजही कार्तिकी गाण्याचे अनेक शो करत असते. लग्नानंतरही कार्तिकी हे शो करतच राहणार आहे. कार्तिकीने गायकीसह आपण एक उत्तम निवेदिका असल्याचेही दाखवून दिले आहे. ‘गजर किर्तनाचा’ या कार्यक्रमासाठी तिने निवेदन केले होते आणि प्रेक्षकांनाही हा कार्यक्रम खूपच आवडला होता. कार्तिकी आणि रोनिताला पुढच्या वाटचालीसाठी ‘POPxo मराठी’ कडून मनःपूर्वक शुभेच्छा!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

Read More From मनोरंजन