लॉकडाऊनमुळे सध्या अनेक सेलिब्रेटीज घरात अडकून पडले आहे. अनेकांच्या घरी सध्या मेड, कूक नसल्यामुळे त्यांना त्यांच्या घरातील कामं स्वतःच करावी लागतं आहेत. सोशल मीडियावरून अनेक सेलिब्रेटीज त्यांच्या या दररोजच्या अॅक्टिव्हिज शेअर करत असतात. कोणी लादी पुसत आहे तर कोणी भांडी घासत आहे. अभिनेत्री सुश्मिता सेनला मात्र स्वयंपाकच करता येत नाही. लॉकडाऊनच्या काळात स्वयंपाक करण्यावरून तिने एक मजेशीर गोष्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सुश्मिता स्वयंपाकात आहे झिरो –
मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री… एवढंच नाही तर खऱ्या आयुष्यातदेखील एखाद्या हिरोप्रमाणे जगणारी सुश्मिता स्वयंपाकात मात्र झिरो आहे. एका मुलाखतीत सुश्मिताने शेअर केलं आहे की, तिला किचनमधील कोणतंच काम येत नाही. ती फक्त अंड्याचं ऑमलेट करू शकते. ते पण ते फक्त ती तिच्या लहान मुलीसाठी म्हणजेच अशीशासाठी ते करण्याचा प्रयत्न करते. तिचा बॉयफ्रेंड रोहमन मात्र याबाबत फारच लकी आहे असं तिचं मत आहे. कारण रोहमनला किचनमधील सर्व कामं उत्तम पद्धतीने करता येतात. रोहमन एक चांगला कूक आहे असं तिचं म्हणणं आहे. रोहमनला एवढं सगळं कसं जमतं याचं सुश्मिताला नेहमीच आश्चर्य वाटतं. तो जगातील सर्वात कमाल कॉफी करू शकतो असंही तिला वाटतं. त्याचसोबत सुश्मिताने तिची मोठी मुलगी रिनीच्याही कुकींग स्कीलचं कौतुक केलं आहे. लहान मुलगी अलिशाला मात्र सध्या स्वयंपाकातील काही करता येत नाही. मात्र जर तिला एखादी संधी मिळाली तर ती तेही उत्तम करू शकेल असं तिचं मत आहे. एवढं सगळं शेअर केल्यावर तिने हे अगदी आवर्जून सांगितलं की, “माझ्याकडे स्वयंपाकापेक्षा अनेक चांगल्या प्रतिभा आहेत मात्र स्वयंपाक करणं मात्र मला नाही जमत “
मग सध्या कोण करतंय सुश्मिताच्या घरी स्वयंपाक
लॉकडाऊनमध्ये सुश्मिता सेन तिचा बॉयफ्रेंड रोहमन, तिच्या मुली रिनी आणि अलिशा यांच्यासोबत एकत्र राहत आहे. सुश्मिता सेन तिच्या इंन्स्टा अकाऊंटवरून घरातील गमती जमती सतत शेअर करत असते. सुश्मिताच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो असूदेत अथवा एकादा मजेशीर किस्सा चाहत्यांना ते फारच आवडतात. काही दिवसांपूर्वीच सुश्मिता सेन रोहमन, रिनी आणि अलिशासोबत लाईव्ह आली होती. ज्यामध्ये तिने या तिघांसोबत घरातील अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या आणि तिच्या चाहत्यांच्या काही प्रश्नांना उत्तरेही दिली होती. आता तिने एका मुलाखतीतून तिच्या घरातील मंडळींचं कुकींग स्कील शेअर केलं आहे. ज्यामुळे सध्या लॉकडाऊनमध्ये सुश्मिताच्या घरात स्वयंपाक नेमकं कोण करतंय हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल.
सुश्मिता आणि रोहमनचं नातं
सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्यामध्ये जवळजवळ पंधरा वर्षांचे अंतर आहे. सुश्मिता रोहमनपेक्षा पंधरा वर्षांनी मोठी आहे. मात्र प्रेमाला वयाचं बंधन नसतं. मागच्या एक – दीड वर्षापासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहे. रोहमन शॉल एक मॉडेल असून तो सध्या सुश्मितासोबतच तिच्या घरात राहत आहे. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेकदा दिसून आलं आहे. दोघांनी याचा खुलासाही वारंवार केला आहे. सुश्मिताची आतापर्यंत अनेक अफेअर्स गाजली आहेत. मात्र तिने नात्यात पुढे जाऊन कधीच कोणासोबत लग्न करण्याचा विचार केला नाही. मात्र बॉयफ्रेंड रोहमनची गोष्ट इतरांपेक्षा वेगळी असावी म्हणूनच ती रोहमनमध्ये इतकी गुंतली आहे. असो… लॉकडाऊनंतर यातील अनेक गोष्टी बदलेल्या असतील. कदाचित या दोघांनी तोपर्यंत लग्न करण्याचा विचारदेखील केलेला असेल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
अधिक वाचा –
टीव्हीवरील या जोड्यांनी केले लपूनछपून लग्न, चाहत्यांना दिला धक्का
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade