DIY लाईफ हॅक्स

ऑनलाईन जेवण मागवताय, मग नक्की घ्या या गोष्टींची काळजी

Leenal Gawade  |  Sep 14, 2019
ऑनलाईन जेवण मागवताय, मग नक्की घ्या या गोष्टींची काळजी

हल्ली ऑफिसला डब्बा नेला नसेल किंवा घरी जेवणाचा मूड नसेल तर कसलाही विचार न करता मस्त ऑनलाईन जेवण मागवले जाते. कोणत्याही हॉटेलमधून ऑनलाईन डिलीव्हरी मागवण्यापेक्षा ऑनलाईन अनेक ऑफर्स मिळत असल्यामुळे ऑनलाईन अॅपचा वापर करुन चमचमीत खाद्यपदार्थ मागवले जातात. तुम्हाला ऑनलाईन जेवण मागवायची सवय असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी हमखास घ्यायला हवी.

ऑनलाईन जेवण मागवताय, मग नक्की घ्या या गोष्टींची काळजी

shutterstock

हॉटेलची माहिती (Hotel information)

कोणत्याही अॅपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या हॉटेल आणि फुड सेंटरची नाव दिसतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या हॉटेलला निवडता. पण अशा प्रकारे हॉटेलची निवड करताना तुम्हाला त्या हॉटेलची माहिती असणे फारच आवश्यक असते. हॉटेल कुठे आहे? त्यामध्ये कोणत्या प्रतीचे अन्न मिळते हे तुम्हाला माहीत हवे. कधी-कधी काहींना हॉटेलची काहीही माहिती नसते. केवळ त्या ठिकाणी स्वस्त अन्न मिळते म्हणून काही जण जेवण मागवतात. पण तसे करु नका. तुमच्या परिचयातील हॉटेलमधून जेवण मागवणे हे नेहमी चांगले असते. 

सुंदर त्वचा हवी असेल तर फॉलो करा या 101 टीप्स

रिव्ह्यू (Review)

shutterstock

हल्ली तर सगळ्यांना ऑनलाईन रिव्ह्यू पाहण्याची सवय असते. त्यामुळे जेवणाच्या बाबतीतही तुम्ही अगदी तसेच करायला हवे. तुम्ही एखादे रेस्टॉरंट निवडले असतील तर त्या आधी त्या रेस्टोरंट संदर्भातील रिव्ह्यूज वाचायला विसरु नका. किंवा रेटींग्ज पाहायला विसरु नका. याचा फायदा तुम्हाला ऑर्डर द्यायची की नाही यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे जेवणाच्या बाबतीतही तुम्ही तसेच करायला हवे रिव्ह्यूज वाचून तुम्ही मगच जेवण ऑर्डर करायला हवे.

फोडणीतील चिमूटभर ‘हिंग’ आरोग्यासाठी असतं लाभदायक 

किंमत (Price)

आता सगळ्यात महत्वाची ती म्हणजे किंमत. तुम्हाला कितीही चांगले खायचे असले तरी देखील तुम्ही तुमचे बजेट नेहमीच पाहता. त्यामुळे तुम्ही एखादा पदार्थ पाहताना त्याची किंमत योग्य आहे की नाही ते देखील नक्कीच तपासून पाहा. कधी कधी जेवण ऑर्डर करताना एक किंमत आणि ते मागवताना एक किंमत दिसते. त्यामुळे तुम्हाला कोणते एक्स्ट्रा चार्जेस लागत आहेत ते नीट पाहा. त्यानंतरच तुम्ही तुम्हाला हवा असलेला पदार्थ ऑर्डर करा.

ऑफर्स (Offers)

चांगल्या ऑफर्सच्या नादात तुमची फसवणूक तर होत नाही ना हे नक्की तपासून पाहा. कधी कधी या ऑफर्स अगदी साध्या रेस्टॉरंटमधील असू शकतात. कदाचित या हॉटेल्सचा रिव्ह्यूही चांगला नसू शकतो किंवा असू शकतो. जर तुम्हाला चांगल्या ऑफर्स आणि चांगल्या रेस्टॉरंटमध्ये मिळत असेल तर तुम्ही अगदी बिनधास्त ऑर्डर करु शकता

लागणारा वेळ (Time of delivery)

shutterstock

आता तुम्हाला खूप भूक लागली आहे आणि तुम्ही काहीतरी ऑर्डर करण्याच्या बेतात असाल तर तुम्हाला ती ऑर्डर तुमच्या भुकेच्या वेळेत मिळायला हवी नाही का? भूक लागली असताना जर एखादा पदार्थ जर फार वेळ घेणार असेल तर मात्र तुम्ही या ठिकाणांहून ऑर्डर देणे टाळा. त्यामुळे लागणारा वेळ पाहून तुम्ही जेवण ऑर्डर करा.

दुपारच्या जेवणात या पदार्थांचा समावेश असेल… तर तुम्ही राहाल निरोगी

प्रतिक्रिया द्यायला विसरु नका

तुमच्यासारखे कितीतरी लोक एकाच वेळी ऑनलाईन जेवण पाहत असतात. त्यांनाही चांगलं काहीतरी खायची इच्छा असेल तर तुमचे रिव्ह्यू त्यांना कामी येतील. त्यामुळे तुम्ही अगदी मॅगीसारखा साधा पदार्थ जरी चाखला असेल तरी प्रतिक्रिया द्यायला विसरु नका. 

*मग आता ऑनलाईन जेवण मागवताना या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या जेवणाचा मस्त आनंद घ्या.

Read More From DIY लाईफ हॅक्स