मनोरंजन

लतादीदींच्या फॅन्ससाठी खूशखबर…

Aaditi Datar  |  Nov 19, 2019
लतादीदींच्या फॅन्ससाठी खूशखबर…

गेल्या आठवड्यापासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण आता सकारात्मक अपडेट आला आहे की, दिग्दर्शक आणि फिल्म निर्माता मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) ने मंगळवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वर-साम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मधुरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

मधुरची दीदींबाबत सकारात्मक पोस्ट

या पोस्टमध्ये दीदींचा फोटो शेअर करत मधुरने लिहीलं की, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन लता मंगेशकर दीदींना भेटलो. हे सांगताना आनंद होत आहे की, त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा आहे. त्या उपचारांचा सकारात्मक परिणाम त्यांच्या तब्येतीवर दिसून येत आहे. त्या लवकरच बऱ्या होतील यासाठी प्रार्थना करण्याऱ्या प्रत्येकाला धन्यवाद.

मधुरची पोस्ट येताच अनेक जणांनी त्यावर कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे.

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांना ‘व्हायरल चेस्ट कन्जेशन’ मुळे मागच्याच आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. लतादीदींना श्वास घेण्यासही त्रास होत होता. ज्यामुळे त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. एक आठवड्यापासून त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. लता मंगेशकर यांच्या टीमने सांगितलं की, त्यांना छातीत इंफेक्शनची तक्रार होती. सूत्रानुसार, आता लतादीदींनी जेवण घ्यायलाही सुरूवात केली आहे. असंही कळतंय की, तब्येतीत सुधारणा असल्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्जही देण्यात येईल.

90 वर्षांच्या लता मंगेशकर यांचे फॅन्स केवळ भारतातच नाहीतर जगभरात आहेत. त्यामुळे दीदींच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं कळताच आनंदाचं वातावरण आहे. फॅन्सनी दीदींच्या तब्येतीसाठी केलेल्या प्रार्थनेचा आता फायद होत असल्याचं दिसतंय.

28 सप्टेंबर 1929 मध्यप्रदेशमधील इंदोरमध्ये जन्मलेल्या लतादीदींनी हिंदी, मराठी आणि बंगाली म्युझिकमध्ये काम केलं आहे. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त हिंदी गाण्यांना आपला सुरेल आवाज दिला आहे. लताजींना त्यांच्या संगीतातील योगदानासाठी 1969 मध्ये पद्मभूषण, 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 1999 मध्ये पद्मविभूषण, 2001 मध्ये भारतरत्न आणि 2007 मध्ये लिंजड ऑफ ऑनर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

https://marathi.popxo.com/article/best-marathi-lavani-songs-in-marathi

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा –

देशाला तुझी अजूनही गरज आहे धोनी… निवृत्तीचा विचार सोडून दे : लता मंगेशकर

ऐकलीत का गायिका सावनी रविंद्रची नवी म्युझिकल सीरिज

Read More From मनोरंजन